Prajakta Koli Vrishank Khanal Got Married : ‘मिस्डमॅच’ फेम मराठमोळी प्राजक्ता कोळी विवाह बंधनात अडकली आहे. प्राजक्ताने तिचा बॉयफ्रेंड वृषांक खनाल याच्याशी कर्जतमध्ये आज (२५ फेब्रुवारी) लग्नगाठ बांधली. प्राजक्ताने तिच्या लग्नातील काही सुंदर फोटो शेअर केले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

प्राजक्ता कोळी व वृषांक खनल यांनी कर्जतमध्ये लग्न केलं. मेहंदी, हळदी समारंभ, संगीत नाईटनंतर या दोघांचा विवाह सोहळा पार पडला. लग्नात प्राजक्ता व वृषांकने अनिता डोंगरेने डिझाईन केलेले कपडे घातले होते. प्राजक्ताने लग्नात आयव्हरी रंगाचा पेस्टल रंगाचे वर्क असलेला लेहेंगा घातला होता. तर वृषांकने पांढरी शेरवानी परिधान केली होती. लग्नात प्राजक्ता व वृषांक फारच सुंदर दिसत होते.

प्राजक्ताने लग्नाची तारीख २५.२.२०२५ ही तारीख कॅप्शनमध्ये लिहून फोटो पोस्ट केले आहेत.

पाहा पोस्ट

वृषांक खनाल मूळचा नेपाळचा आहे. प्राजक्ता कोळी आणि वृषांक खनाल १३ वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होते. दोन वर्षांपूर्वी त्यांनी साखरपुडा केला होता. त्यानंतर ते आज लग्न बंधनात अडकले. कर्जतमध्ये दोघांचा लग्न सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला. लग्नात दोघांचे कुटुंबीय व जवळचे मित्र-मैत्रिणी उपस्थित होते.

प्राजक्ता व वृषांकची पहिली भेट

प्राजक्ता अभिनेत्री नव्हती, त्याआधीपासून ती व वृषांक एकत्र आहेत. वृषांक हा काठमांडू, नेपाळचा आहे आणि एका मित्राच्या माध्यमातून त्याची प्राजक्ताशी ओळख झाली होती. गणपती पूजेदरम्यान दोघेही एकमेकांना भेटले होते. इथेच वृषांकने प्राजक्ताला डेटसाठी विचारलं होतं, त्यानंतर दोघांच्या भेटीगाठी वाढल्या आणि ते प्रेमात पडले.

प्राजक्ता कोळी व वृषांक खनाल लग्न

काय करतो वृषांक खनाल?

वृषांक खनाल हा वकील आहे आणि मुंबईत राहतो. त्याचे कुटुंबीय नेपाळमध्ये राहतात. प्राजक्ता बरेचदा वृषांकबरोबर त्याच्या घरी नेपाळला जात असते.

प्राजक्ता ही लोकप्रिय युट्यूबर आहे. युट्यूबवर ‘मोस्टली सेन’ या नावाने ती ओळखली जाते. प्राजक्ताचे लाखो फॉलोअर्स आहेत. युट्यूबवर यश मिळवल्यानंतर ती अभिनयाकडे वळली. तिला नेटफ्लिक्सची सीरिज ‘मिसमॅच्ड’मध्ये डिंपल आहुजा ही भूमिका मिळाली. या भूमिकेने तिला खूप लोकप्रियता मिळाली. ही सीरिजही खूप गाजली. या सीरिजचे आतापर्यंत तीन सीझन आले आहेत. या सीरिजमध्ये रोहित सराफ, रणविजय सिन्हा, विद्या माळवदे, तारुक रैना हे कलाकार आहेत. अभिनेत्री असलेली प्राजक्ता आता लेखिकादेखील झाली आहे. नुकतंच तिचं पहिलं पुस्तक प्रकाशित झालं.