दक्षिण कोरियन सीरिज स्क्विड गेमने (Squid Game) जागतिक स्तरावर प्रसिद्धी मिळवली आहे. ही सीरिज रिलीज झाल्याच्या काही दिवसातच,नेटफ्लिक्सच्या सर्वाधिक पाहिल्या गेलेल्या शोपैकी एक बनली आहे. प्रीमियर झाल्यापासून सीरिज अनेक देशांमध्ये पहिल्या क्रमांकावर ट्रेंड करत होती. या सीरिजच्या दुसऱ्या सीझनची प्रेक्षक गेल्या अनेक दिवसांपासून प्रतिक्षा करत होते. आता या सीरिजचा दुसरा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

सोशल मीडियावर ‘स्क्विड गेम’च्या दुसऱ्या सीझनचा टीझर प्रचंड व्हायरल होत आहे. नुकतंच नेटफ्लिक्सने त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटद्वारे हा टीझर शेअर केला आहे. प्रेक्षकांनी या टीझरला उत्तम प्रतिसाद दिला आहे. या नवीन टीझरमध्ये कथानकाबद्दल फारशी माहिती दिली नसली तरी त्यातून प्रेक्षकांची उत्सुकता ताणून ठेवली आहे.

‘पाटलांचा बैलगाडा…’ गाण्यावर चिमुकल्याने केली ठसकेबाज लावणी, गौतमी पाटीललाही टाकले मागे! नवा Video Viral
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
Netflix announces Squid Game 3 release date here's when and where to watch
पुन्हा एकदा थरारक खेळ मनोरंजनासाठी सज्ज, Squid Game 3च्या प्रदर्शनाची तारीख जाहीर; कधी, कुठे पाहायला मिळणार? जाणून घ्या…
zee marathi new serial promo tula japanar ahe promo announces
तारीख अन् मुहूर्त ठरला! ‘झी मराठी’ची थ्रिलर मालिका ‘या’ दिवशी सुरू होणार; संपूर्ण स्टारकास्ट आली समोर, पाहा जबरदस्त प्रोमो
Muramba
Video: रमाच्या आईला ओळखण्यात माही चूक करणार अन्…; अक्षय सत्य शोधून काढणार? ‘मुरांबा’ मालिकेचा प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला
video shows Monkey And Man ate from one plate
VIDEO : विश्वासच बसेना! जेवताना ताटापुढे येऊन बसले माकड अन्… पुढे जे घडले, ते पाहून तुम्हीही कराल कौतुक
cat rescued By Young Boy
VIDEO: खिडकीवर अडकलेल्या मांजराला ‘त्याने’ असे वाचवले; मांजरीचे थरथरणारे पाय पाहून नेटकरीही भावूक झाले
Video Shows Father And Daughter love
VIDEO: वडिलांजवळ ढसाढसा रडली नवरी, तर दुसरीकडे बाबांच्या कुशीत खेळतेय चिमुकली; बघता क्षणी डोळ्यात पाणी आणेल ‘हा’ क्षण

आणखी वाचा : वयाच्या ४४ व्या वर्षी दारू सोडण्याबद्दल पूजा भट्टचं मोठं वक्तव्य; ‘बिग बॉस ओटीटी २’दरम्यान म्हणाली…

या टीझरच्या माध्यमातून सीरिजमध्ये काही नवीन पात्रंदेखील देखील दिसणार आहेत हे स्पष्ट झालं आहे. अद्याप या नव्या सीझनबद्दल विशेष माहिती टीझरमध्ये दाखवण्यात आलेली नाही, पण तरी हा टीझर पाहून प्रेक्षकांची उत्सुकता वाढली आहे. इतकंच नव्हे तर काही जुने कलाकारसुद्धा यात पुन्हा दिसणार आहेत.

ज्या लोकांची आर्थिक परिस्थिटी वाईट आहे त्यांच्यासाठी या खास ‘स्क्विड गेम’ची रचना करण्यात आली आहे. हा गेम जिंकल्यावर विजेत्याला रग्गड रक्कम मिळणार असते. अशी एकंदरच या सीरिजची कथा आहे अन् याच्या पुढील सीझनमध्ये हा खेळ आणखीनच वेगवेगळी वळणं घेताना दिसणार आहे. स्क्विड गेमचा पहिला सीझन आणण्यासाठी १२ वर्षे लागली. पण ती Netflix ची आतापर्यंतची सर्वात लोकप्रिय मालिका बनण्यासाठी फक्त १२ दिवस लागले. आता याच्या पुढील सीझनची प्रेक्षक वाट बघत आहेत.

Story img Loader