नवीन वर्षाच्या पहिल्या वीकेंडला ओटीटीवर काय पाहायचं? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर तुम्ही २०२४ मध्ये गुगलवर सर्वाधिक सर्च झालेले भारतीय चित्रपट पाहू शकता. या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती. सर्वाधिक सर्च झालेले हे सर्व १० चित्रपट वेगवेगळ्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहेत. या यादीत कोणत्या चित्रपटांचा समावेश आहे, ते जाणून घेऊयात.
स्त्री 2
मागील वर्षी सर्वाधिक कमाई करणारा ब्लॉकबस्टर चित्रपट म्हणजे ‘स्त्री 2’ होय. श्रद्धा कपूर, राजकुमार राव, पंकज त्रिपाठी हे कलाकार असलेल्या सिनेमाने बॉक्स ऑफिस गाजवलं. ‘स्त्री 2’ २०२४ मध्ये गुगलवर सर्वाधिक सर्च झालेल्या सिनेमांच्या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे. तुम्ही हा चित्रपट प्राइम व्हिडीओवर पाहू शकता.
हेही वाचा – “खोटं बोलून, माझं नाव वापरून…”, अंकिता प्रभू वालावलकर भडकली; म्हणाली, “आमच्या लग्नासाठी…”
कल्की 2898 एडी
प्रभास, दीपिका पादुकोण, अमिताभ बच्चन, कमल हासन अशा दिग्ग्ज कलाकारांची मांदियाळी असलेला कल्की 2898 एडी बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर ठरला होता. कल्की 2898 एडी भारतातील सर्वाधिक सर्च झालेला दुसरा चित्रपट आहे. हा चित्रपट प्राइम व्हिडीओ व नेटफ्लिक्सवर तुम्हाला पाहता येईल.
12th फेल
विक्रांत मॅसीच्या 12th फेलला समीक्षक आणि प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. कमी बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवरही चांगली कामगिरी केली होती. डिस्ने प्लस हॉट स्टारवर हा चित्रपट उपलब्ध आहे.
हेही वाचा – ९ वर्षे रखडला, ८ कलाकारांनी नाकारला अन् नंतर ब्लॉकबस्टर ठरला; तुम्ही पाहिलाय का ‘हा’ चित्रपट?
लापता लेडीज
ट्रेनमध्ये बेपत्ता झालेल्या दोन नववधूंच्या प्रवासावर आधारित ‘लापता लेडीज’ या चित्रपटाची २०२४ मध्ये प्रचंड चर्चा झाली होती. आमिर खान निर्मित आणि किरण राव दिग्दर्शित या चित्रपटाला ऑस्करसाठी नामांकनही मिळाले होते. २०२४ मध्ये गुगलवर सर्वाधिक सर्च केलेल्या चित्रपटांमध्ये लापता लेडीज हा चौथ्या क्रमांकावर आहे. तुम्ही तो नेटफ्लिक्सवर पाहू शकता.
हनुमान
तेजा स्टारर हनुमान चित्रपटही प्रेक्षकांना खूप आवडला होता. या चित्रपटानेही बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली होती. गेल्या वर्षी गुगलवर सर्वाधिक सर्च करण्यात आलेला पाचवा चित्रपट हनुमान आहे. तुम्ही हा चित्रपट जिओ सिनमा, ZEE5 आणि डिस्ने प्लस हॉटस्टारवर पाहू शकता.
महाराजा
विजय सेतुपती आणि अनुराग कश्यप यांच्या मुख्य भूमिका असलेला महाराजा २०२४ मध्ये सर्वाधिक सर्च केलेल्या चित्रपटांच्या यादीत सहाव्या क्रमांकावर आहे. या चित्रपटाच्या कथेने प्रेक्षकांची मने जिंकली. तुम्ही तो नेटफ्लिक्सवर पाहू शकता.
मंजुम्मेल बॉईज
मागील वर्षी गुगलवर सर्च केलेल्या चित्रपटांच्या यादीत मंजुम्मेल बॉईज सातव्या क्रमांकावर आहे. तुम्ही हा चित्रपट अजून पाहिला नसेल, तर तो ओटीटीवर पाहू शकता. हा चित्रपट डिस्ने प्लस हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे.
द ग्रेटेस्ट ऑल टाइम
थलपथी विजयची द ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाईममध्ये मुख्य भूमिका आहे. हा चित्रपटही प्रेक्षकांना खूप आवडला होता. २०२४ मध्ये सर्वाधिक सर्च करण्यात आलेल्या चित्रपटांमध्ये हा चित्रपट आठव्या क्रमांकावर आहे. तुम्ही तो नेटफ्लिक्सवर पाहू शकता.
सालार
प्रभास आणि पृथ्वीराज सुकुमारन यांचा ‘सालार’ हा चित्रपट २०२४ च्या सर्वाधिक सर्च केलेल्या चित्रपटांमध्ये नवव्या क्रमांकावर आहे. तुम्ही तो नेटफ्लिक्स किंवा डिस्ने प्लस हॉटस्टारवर पाहू शकता.
आवेशम
फहाद फासिलच्या आवेशम सिनेमाची खूप चर्चा झाली होती. गुगलवर सर्वाधिक सर्च केलेल्या चित्रपटांच्या यादीत या चित्रपटाला १० वे स्थान मिळाले आहे. तुम्ही हा चित्रपट प्राइम व्हिडिओ किंवा हॉटस्टारवर पाहू शकता.