Top Rated Indian Web Series on Inspired by True Incidents: ओटीटी प्लॅटफॉर्म्सवर प्रत्येक आठवड्याला नवीन चित्रपट व सीरिज पाहायला मिळतात. काही सत्य घटनांवर आधारित सीरिजदेखील ओटीटीवर उपलब्ध आहेत. या सीरिज रिलीज झाल्यावर खूप गाजल्या. भारतातील अशातच काही सत्य घटनांवर आधारित सीरिजची यादी पाहुयात.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

स्कॅम १९९२

टॉप रेटेड भारतीय वेब सीरिजच्या यादीत ‘स्कॅम १९९२’ पहिल्या क्रमांकावर आहे. खऱ्या घटनांवर आधारित ही सीरिज सोनी लिव्हवर आहे. प्रतीक गांधी, श्रेया धन्वंतरी आणि हेमंत खेर हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. या सीरिजला आयएमडीबीवर ९.२ रेटिंग मिळाले आहे.

दिल्ली क्राइम

शेफाली शाह व रसिका दुग्गलच्या मुख्य भूमिका असलेली ‘दिल्ली क्राइम’ सीरिज नेटफ्लिक्सवर उपलब्ध आहे. या सीरिजचे दोन सीझन आले आहेत. ही क्राइम, ड्रामा व थ्रिलर वेब सीरीज आहे. या सीरिजला आयएमडीबीवर ८.५ रेटिंग मिळाले आहे.

१५ ऑगस्टमुळे मोठा वीकेंड, पण तुमचा प्लॅन ठरत नाहीये? घरीच OTTवर पाहा या कलाकृती

द रेल्वे मॅन

भोपाळ गॅस दुर्घटनेवर आधारित ‘द रेल्वे मॅन’ ही सीरिज नेटफ्लिक्सवर २०२३ साली प्रदर्शित झाली होती. यामध्ये आर माधवन, केके मेनन आणि दिव्येंदू शर्मा हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. इरफान खानचा मुलगा बाबिलनेही यात काम केले होते. या सीरिजला ८.५ रेटिंग मिळाले आहे.

रणनीती: बालाकोट अँड बियाँड

जिओ सिनेमावरील ही सीरिज सत्य घटनांवर आधारित आहे. यात बालाकोट अटॅक दाखवण्यात आला आहे. आशुतोष राणा, जिम्मी शेरगिल असे कलाकार असलेल्या या सीरिजला आयएमडीबीवर ८.५ रेटिंग मिळाले आहे.

हेडफोनशिवाय बघू नका OTT वरील ‘हे’ चित्रपट, बोल्ड कंटेटचा आहे भडीमार

मुंबई डायरीज

‘मुंबई डायरीज’ मध्ये मुंबईवरील २६/११चा हल्ला दाखवण्यात आला आहे. यामध्ये हल्ल्यानंतरची मुंबईची परिस्थितीही दाखवण्यात आली आहे. या सीरिजला ८.५ आयएमडीबी रेटिंग मिळाले आहे. यामध्ये मोहित रैना, कोंकणा सेन शर्मा आणि टीना देसाई हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.

स्कॅम २००३

सोनी लिव्ह वरील ही सीरिज सत्य घटनेवर आधारित आहे. यात गंगादेव रियार, इरावती हर्षे व किरणदीप कौर श्रान यांच्या मुख्य भूमिका आहेत. ही एक बायोग्राफिकल क्राइम ड्रामा सीरिज आहे. या सीरिजला आयएमडीबीवर ८.१ रेटिंग मिळाले आहे.

धाडस असेल तरच पाहा मन हेलावणारे OTT वरील ‘हे’ तीन चित्रपट, एकावर घालण्यात आली होती बंदी!

स्कूप

‘स्कूप’ ही पत्रकार जिग्ना वोराच्या जिवनावर आधारित सीरिज आहे. यात करिश्मा तन्ना, हरमन बाजवा व मोहम्मद झीशान अय्युब यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. नेटफ्लिक्सवरील या सीरिजला आयएमडीबीवर ७.६ रेटिंग मिळाले आहे.

हाऊस ऑफ सीक्रेट्स: बुरारी डेथ्स

दिल्लीच्या बुरारी येथील एका कुटुंबाच्या मृत्यूची खरी गोष्ट सांगणारी ‘हाऊस ऑफ सिक्रेट्स: द बुरारी डेथ्स’ ही सीरिज नेटफ्लिक्सवर आहे. मनोज कुमार, नरेश भाटिया आणि विशाल आनंद यांच्या महत्त्वाच्या भूमिका असलेल्या या सीरिजला आयएमडीबीवर ७.४ रेटिंग मिळाले आहे.

बोल्ड कंटेंटमुळे प्रदर्शनावर घालण्यात आली बंदी, ‘हे’ चित्रपट ओटीटीवर आहेत उपलब्ध, वाचा यादी

जामतारा: सबका नंबर आएगा

नेटफ्लिक्सवरील ‘जमतारा: सबका नंबर आएगा’मध्ये अमित सियाल, स्पर्श श्रीवास्तव व मोनिका पंवारच्या मुख्य भूमिका आहेत. सीरिजला आयएमडीबीवर ७.३ रेटिंग मिळालंय.

द वर्डिक्ट: स्टेट व्हर्सेस नानावटी

‘द वर्डिक्ट: स्टेट व्हर्सेस नानावटी’ या सीरिजमध्ये मानव कौल, एली अवराम आणि अंगद बेदी यांच्या मुख्य भूमिका आहेत. यात भारतीय नौदल कमांडर नानावटी यांची गोष्ट दाखवण्यात आली आहे. ही एक सस्पेन्स क्राईम वेब सीरीज आहे. आयएमडीबीवर ७ रेटिंग मिळालेली ही सीरिज झी 5 वर आहे.

वयात १४ वर्षांचे अंतर अन् लग्नानंतर ५ वर्षांनी झाले आई-बाबा; सेलिब्रिटी जोडप्याने दाखवले जुळ्या बाळांचे चेहरे, पाहा Photos

द चार्जशीट

ओटीटी प्लॅटफॉर्म झी 5 वरील ‘द चार्जशीट’ या वेब सीरिजला आयएमडीबीवर ६.८ रेटिंग मिळालंय. ही क्राइम, ड्रामा, मिस्ट्री आणि रोमान्सचा मिलाफ असलेली सीरिज आहे. अरुणोदय सिंग, सिकंदर खेर आणि शिव पंडित यांनी यात महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.

द इंद्राणी मुखर्जी स्टोरी

‘द इंद्राणी मुखर्जी स्टोरी’ ही डॉक्युमेंट्री वेब सीरिज आहे. यामध्ये अनुरीता झा, अंश शेखावत आणि सागर संत हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. या सीरिजला आयएमडीबीने १० पैकी ६.२ रेटिंग दिले आहे.

मराठीतील सर्व ओटीटी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai diaries scam 1992 the railway man scoop top rated indian web series on inspired by true incidents hrc