‘मुंबई डायरीज २’ या वेब सीरिजचा थरारक ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. निखिल आडवाणी दिग्दर्शित या सीरिजमध्ये मोहित रैना, टीना देसाई, श्रेया धनवंतरी, सत्यजीत दुबे, कोंकणा सेन अशी तगडी स्टार कास्ट आहे. तसेच या वेब सीरिजमध्ये बरेच मराठी कलाकार झळकणार आहेत.

‘मुंबई डायरीज’च्या पहिल्या सीझनला उत्तम प्रतिसाद मिळाल्यानंतर दुसऱ्या सीझन भेटीला येत आहेत. एका विध्वंसक पुरामुळे मुंबई शहर बुडण्याच्या उंबरठ्यावर असताना बॉम्बे जनरल हॉस्पिटलचे कर्मचारी आव्हानांना कशाप्रकारे तोंड देतात, हे ‘मुंबई डायरीज’ दुसऱ्या सीझनमध्ये पाहायला मिळणार आहे. याचा थरारक ट्रेलर काल प्रदर्शित झाला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा – Video: “आलिया, परिणीतीपेक्षाही छान…” ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम प्रियदर्शनी इंदलकरचं गाणं ऐकून नेटकऱ्यांची प्रतिक्रिया

या ट्रेलरमध्ये बरेच मराठी कलाकार मंडळी पाहायला मिळत आहेत. सुरुवातीलाच अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांची झलक झाली आहे. तसेच काही वेळानंतर शरद पोंक्षे फोनवर “खूप पाऊस होत आहे, संपूर्ण शहर ठप्प झाल्याचं” बोलताना पाहायला मिळत आहे. आणि ट्रेलरच्या शेवटी मृण्मयी देशपांडे झळकली आहे. अशी ही मराठी कलाकारांची मांदियाळी असलेली ‘मुंबई डायरीज २’ वेब सीरिज ६ ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. ओटीटी प्लॅटफॉर्म अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडीओवर ही वेब सीरिज प्रदर्शित होणार आहे.

हेही वाचा – “कुणी बोलायचं नाही” मराठमोळ्या संगीतकाराच्या ‘त्या’ पोस्टनं वेधलं लक्ष; म्हणाला, “दारू पिऊन वर्षभरातील सर्व भावना…”

हेही वाचा – झी मराठीवरील ‘ही’ लोकप्रिय मालिका लवकरच होणार बंद?; ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात प्रेक्षकांचा निरोप घेण्याची शक्यता

यापूर्वी हंसल मेहता यांच्या ‘स्कॅम २००३ – द तेलगी स्टोरी’ या सीरिजमध्ये बरेच मराठी कलाकार मंडळी पाहायला मिळाली होती. अभिनेता शशांक केतकर, निखिल रत्नपारखी, भरत दाभोळकर, समीर धर्माधिकारी आणि भरत जाधव या सीरिजमध्ये महत्त्वाच्या भूमिकेत दिसले.

मराठीतील सर्व ओटीटी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai diaries season 2 trailer out mrunmayee deshpande and sharad ponkshe these marathi stars played role in series pps