Mystery Movies on Jiohotstar : तुम्हाला सस्पेन्स- थ्रिलर चित्रपट पाहायला आवडत असतील तर ओटीटीवर तुमच्यासाठी अनेक दमदार सिनेमांची मेजवाणी आहे. बॉलीवूडबरोबरच दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील अनेक सस्पेन्स- थ्रिलर चित्रपट तुम्हाला खिळवून ठेवतात. असाच एक चित्रपट सध्या चर्चेत आहे. ५ वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेला हा चित्रपट ओटीटीवर खूप गाजतोय.

या चित्रपटाच्या कथेने प्रेक्षकांची मनं जिंकली आहे. दोन उत्तम कलाकार या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहेत, तसेच एका मराठी अभिनेत्यानेही महत्त्वपूर्ण भूमिका साकारली आहे. या चित्रपटातील सस्पेन्स पाहून प्रेक्षकांना आश्चर्याचा धक्का बसला होता. तुम्हीही जर हा चित्रपट पाहिला नसेल तर तो घरबसल्या पाहू शकता.

क्लायमॅक्स पाहून डोकं चक्रावेल

अनेक दाक्षिणात्य चित्रपट आहेत, ज्यांना ओटीटीवर प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळतं. हे चित्रपट तुम्हाला शेवटपर्यंत पडद्यावर खिळवून ठेवतात. यापैकी एक म्हणजे ‘अथिरन’ चित्रपट होय. हा २ तास १६ मिनिटांचा सस्पेन्स थ्रिलर चित्रपट ओटीटीवर मोठ्या प्रमाणात पाहिला गेला आहे. या चित्रपटातील कलाकारांनी दमदार अभिनय केला आहे. याचा सस्पेन्स पाहून तुम्ही चक्रावून जाल.

‘अथिरन’ चित्रपटात अनेक दमदार कलाकार आहेत. तुम्ही साई पल्लवी व फहाद फासिलचे चाहते असाल तर हा चित्रपट अजिबात चुकवू नका. फहाद व साई पल्लवीबरोबरच अतुल कुलकर्णी, रेंजी पणिकर यांच्यासह अनेक कलाकारांनी या चित्रपटात विविध भूमिका साकारल्या आहेत. हा चित्रपट विवेक थॉमस वर्गीस यांनी दिग्दर्शित केला आहे. तर, त्याची कथा पीएफ मॅथ्यूज यांनी लिहिली आहे. हा चित्रपट हॉलिवूड चित्रपट ‘स्टोनहर्स्ट असायलम’ वरून प्रेरित आहे. हा चित्रपट मल्याळम तसेच हिंदीमध्येही पाहता येईल.

काय आहे चित्रपटाची कथा?

‘अथिरन’च्या कथेबद्दल बोलायचं झाल्यास, ही एका मानसोपचारतज्ज्ञाची कथा असल्याचे पाहायला मिळते. यात डॉ. मानसोपचारतज्ज्ञ नायरच्या भूमिकेत फहाद फासिल आहे. तो केरळच्या दुर्गम भागात असलेल्या एका वेड्यांच्या रुग्णालयाला भेट देतो, जिथे तो नित्या (साई पल्लवी) नावाच्या रुग्ण तरुणीला भेटतो. तिथे त्याला तिच्या भूतकाळातील अनेक रहस्ये कळतात. जे पाहून तुम्ही चक्रावून जाल.

कुठे पाहायचा चित्रपट?

हा चित्रपट ओटीटीवर उपलब्ध आहे. तुम्ही तो जिओ हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहू शकता. तसेच हा चित्रपट यूट्युबवर मोफत उपलब्ध आहे. ‘अथिरन’ला आयएमडीबीवर ६.७ रेटिंग मिळाले आहे.