कोविड काळात ओटीटी प्लॅटफॉर्मची चांगलीच चलती झाली. या ओटीटीवर येणाऱ्या कित्येक गोष्टी प्रेक्षक अगदी उत्सुकतेने पाहू लागले आणि हळूहळू तो कंटेंट बघणाऱ्या प्रेक्षकाच्या संख्येत लक्षणीय वाढ झालेली दिसून येत आहे. आंतरराष्ट्रीय कलाकृतींचा आस्वाद घ्यायला प्रेक्षकांनी सुरुवात केली त्याप्रमाणेच चित्रपटगृहात प्रदर्शित होऊ न शकलेले चित्रपटही ओटीटीवर येऊ लागले.

असाच एक चित्रपट लवकरच आता झी५ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. एवढंच नाही तर हा चित्रपट एका मल्याळम चित्रपटाचा रिमेक आहे.नाना पाटेकर अभिनीत ‘तडका’ हा हिंदी चित्रपट लवकरच ‘झी५’वर प्रदर्शित होणार आहे. नुकतंच या चित्रपटाचं पोस्टर सोशल मिडियावर शेअर करण्यात आलं असून नाना पाटेकर या चित्रपटात एका वेगळ्याच भूमिकेत दिसणार आहेत.

Emergency, Kangana Ranaut, Censor Board,
‘इमर्जन्सी’ चित्रपटातील दृश्यांना कात्री लावण्यास सहनिर्माती कंगना राणावत तयार, सेन्सॉर मंडळाची उच्च न्यायालयात माहिती
2nd October Rashi Bhavishya & Panchang
२ ऑक्टोबर पंचांग: सर्वपित्री अमावस्या कोणासाठी ठरणार शुभ?…
50 crore turnover of re-release films in two months
पुनःप्रदर्शित चित्रपटांची दोन महिन्यांत ५० कोटींची उलाढाल
vivek agnihotri instagram
मॅनेजर उद्धट वागल्याने मुख्य अभिनेत्याला चित्रपटातून काढलं, विवेक अग्निहोत्रींचा खुलासा; म्हणाले, “स्टार किडच्या…”
Festival of Italian films at the Regal movie theater Cinema Paradiso
‘रीगल’मध्ये इटालियन चित्रपटांचा महोत्सव; रसिकांना विनामूल्य पाहण्याची संधि
National Film Day, Navra Maza Navsacha 2,
‘राष्ट्रीय चित्रपट दिना’चा मुहूर्त फळला, ‘नवरा माझा नवसाचा २’सह सगळ्याच चित्रपटांचे शो ८० ते ९० टक्के हाऊसफुल
Kareena Kapoor Khan taimur ali khan
Video : “मी लोकप्रिय आहे का?” तैमूर आई करीनाला विचारतो प्रश्न, ती काय उत्तर देते? जाणून घ्या
Navra Maza Navsacha 2 loksatta latest news
पुन्हा एकदा मनोरंजनाचा प्रवास, ‘नवरा माझा नवसाचा २’ चित्रपटातील कलावंत ‘लोकसत्ता’ कार्यालयात

आणखी वाचा : ‘शार्क टँक इंडिया सीझन २’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला; अशनीर ग्रोव्हरऐवजी लागली या शार्कची वर्णी

हा चित्रपट ११ वर्षांपूर्वी आलेल्या ‘सॉल्ट अँड पेपर’ या मल्याळम चित्रपटाचा रिमेक आहे. केवळ चित्रपटगृहच नव्हे तर आता ओटीटीवरही दाक्षिणात्य चित्रपट आणि त्यांचे रिमेक बाजी मारताना दिसत आहेत. मूळ मल्याळम चित्रपट चांगलाच गाजला होता. त्यामध्ये असिफ अली, श्वेता मेनन, लाल अशा कलाकारांनी मुख्य भूमिका साकारली होती.

याच्या या हिंदी रिमेकमध्ये नाना पाटेकर यांच्यासह तापसी पन्नू, श्रीया सरन, अली फजल हे कलाकार मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. शिवाय दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेते प्रकाश राज यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. येत्या ४ नोव्हेंबरला हा चित्रपट ‘झी५’ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.