सोनी लिव्ह वरील ‘चार्ली चोप्रा आणि द मिस्ट्री ऑफ सोलांग व्हॅली’ ही बहुप्रतिक्षित थ्रिलर वेब सीरिज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक विशाल भारद्वाज सर्व चाहत्यांना एका रोमांचक प्रवासावर घेऊन जाणार आहेत. या सीरिजचा ट्रेलर नुकताच लाँच झाला आहे. हा ट्रेलर कलाकारांबद्दल प्रेक्षकांच्या उत्कंठा वाढवणारा आहे.
प्रेम विवाह करूनही पत्नीपासून वेगळे का राहतात नाना पाटेकर? कोण आहेत त्यांच्या पत्नी? वाचा
ट्रेलर लाँच झाल्यानंतर लक्षात आलं की दिग्गज अभिनेते नसीरुद्दीन शाह ‘चार्ली चोप्रा आणि द मिस्ट्री ऑफ सोलांग व्हॅली’मध्ये पहिल्यांदाच त्यांच्या कुटुंबीयांसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. सोनी लिव्हच्या या सिरीजमध्ये नसीरुद्दीन शाह, त्यांच्या पत्नी रत्ना पाठक शाह आणि त्यांचे दोन सुपुत्र, विवान शाह आणि इमाद शाह यांच्यासोबत दिसणार आहे. या सीरीजमध्ये शाह कुटुंबाव्यतिरिक्त, स्टार-स्टडेड कास्ट नीना गुप्ता, लारा दत्ता, गुलशन ग्रोव्हर, वामिका गब्बी, प्रियांशू पैन्युली, चंदन रॉय सन्याल आणि पाओली दाम महत्त्वपूर्ण भूमिका साकारताना दिसणार आहेत.
हिमाचल प्रदेशातील बर्फाच्छादित पर्वतांमध्ये शूट केलेली ही सीरिज चार्ली चोप्राचा प्रवास आणि एका डार्क सिक्रेटचा उलगडा करण्यावर आधारित आहे. विशाल भारद्वाज पिक्चर्स आणि प्रिती शहानी यांच्या टस्क टेल फिल्म्सने आणि अगाथा क्रिस्टी लिमिटेडच्या सहकार्याने या सीरिजची निर्मिती केली आहे. भारद्वाज सोबत या शोचे लेखन अंजुम राजाबली आणि ज्योत्स्ना हरिहरन यांनी केले आहे.