Natasa Stankovic with Elvish Yadav: भारताचा क्रिकेटपटू हार्दिक पंड्याचा घटस्फोट झाल्यानंतरचा त्याचा पहिलाच वाढदिवस काल (दि. ११ ऑक्टोबर) पार पडला. घटस्फोटाची घोषणा केल्यानंतर तो आणि त्याची पत्नी नताशा स्टॅनकोविक वेगळे राहत आहते. विशेष म्हणजे हार्दिकच्या वाढदिवसाच्या दिवशीच नताशा युट्यूबर आणि बिग बॉस ओटीटीचा विजेता एल्विश यादवबरोबर दिसून आली. मुंबईमधील एका हॉटेलमध्ये डिनर डेटनिमित्त दोघे एकत्र दिसले. या भेटीचे व्हिडीओ विरल भयानी यांनी आपल्या इस्टाग्राम अकाऊंटवर टाकले आहेत. तसेच एल्विश आणि नताशा यांनी कालच एक रील तयार करून त्यांच्या इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहे. यानंतर आता नताशा आणि एल्विशवर अनेक नेटिझन्स तुटून पडले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नताशा आणि एल्विशचा व्हिडीओ आता व्हायरल होत आहे. नताशाने हा व्हिडीओ पोस्ट करताना त्यावर कॅप्शन लिहून पुढे लाल रंगाच्या हार्टचे इमोजी टाकल्यामुळे अनेक तर्कवितर्क लढविले जात आहेत. “Vibin’ On A Whole New Level “❤️ असे कॅप्शन दोघांनीही या रीलसह पोस्ट केले आहे. नताशा लवकरच पंजाबी अल्बम ‘तेरे करके’ मध्ये दिसणार आहे. त्यामुळेच या रिलसाठी हे गाणे पार्श्वसंगीत म्हणून लावलेले आहे. या गाण्याची प्रसिद्धी करण्यासाठीच एल्विश यादवशी टीम अप केल्याचे बोलले जात आहे.

हे वाचा >> Natasa Stankovic: हार्दिकपासून विभक्त झाल्यानंतर नताशा दिसली ‘या’ मॉडेलबरोबर, सोशल मीडियावर शेअर केला VIDEO

इन्स्टाग्रामवर या व्हिडीओला काही तासांतच २५ लाखांहून अधिक लाईक्स तर कोट्यवधी व्ह्यूज मिळाल्या आहेत.

मात्र नताशा आणि एल्विश दोघांनाही ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. स्टायलिश अभिषेक नावाच्या युजरने म्हटले, “भाई वाढदिवसाच्या दिवशी तरी असे करायला नको होते.” या कमेंटला ४० हजार लोकांनी लाईक केले आहे. तर फरीदाबाद रॉकर्स नावाच्या अकाऊंटवर ‘अनपेक्षित’ एवढी एकाच शब्दाची कमेंट करण्यात आली. त्यालाही १३ हजार लोकांनी लाईक केले आहे.

हार्दिकपासून विभक्त झाल्यानंतर नताशा दिसली ‘या’ मॉडेलबरोबर (फोटो-नताशा स्टॅनकोविक इन्स्टाग्राम)

काही जणांनी एल्विशला सल्ला दिला आहे की, आताच तुझी सर्व संपत्ती आईच्या नावावर करून ठेव. तर या छपरी पेक्षा हार्दिक पंड्या कितीतरी चांगला होता, असेही एका युजरने म्हटले आहे.

मराठीतील सर्व ओटीटी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Natasa stankovic dinner date with elvish yadav video viral on hardik pandyas first bday after divorce softnews kvg