सध्या ओटीटी हा एक उत्तम पर्याय असला तरी चित्रपट निर्माते आणि चित्रपटगृहाचे मालक यांच्यासाठी तो एक शापच आहे. सध्या बॉलिवूडचे चित्रपट थिएटरच नव्हे तर ओटीटी प्लॅटफॉर्मसुद्धा घ्यायला तयार नाहीत त्यामुळे याचा फटका बॉलिवूडला बसला आहे. या सगळ्यात अभिनेता नवाजुद्दीन सिद्दिकी याचे तब्बल ७ चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज आहेत, पण ‘बॉलिवूड हंगामा’च्या वृत्तानुसार ते चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्म विकत घ्यायला तयार नसल्याचं समोर येत आहे.

सध्या ओटीटी प्लॅटफॉर्म यांनी थेट चित्रपट प्रदर्शनासाठी नकार दिला असल्याचं बॉलिवूड हंगामाच्या वृत्तानुसार स्पष्ट झालं आहे. ओटीटी प्लॅटफॉर्म चित्रपटनिर्मात्यांना चित्रपट थेट चित्रपटगृहात प्रदर्शित करण्यासाठी प्रोत्साहन देत आहेत. मध्यंतरी ओटीटीवर अत्यंत निकृष्ट दर्जाचे चित्रपट प्रदर्शित केल्याने ओटीटीच्या प्रेक्षकांमध्ये बदल झाला असल्याने हा निर्णय घेतला असल्याचं स्पष्ट होत आहे.

आणखी वाचा : “मला हा चित्रपट…” ‘कांतारा’ पाहिल्यानंतर विवेक अग्निहोत्रींनी केला रिव्ह्यू

ओटीटीने घेतलेल्या या निर्णयामुळे छोट्या चित्रपटांना याचा चांगलाच फटका बसला आहे. नवाजचे ‘जोगीरा सारा रा रा’. ‘नूरानी चेहरा’, ‘अद्भुत’, ‘संगीन’, ‘रोम रोम में’, ‘नो मॅन्स लँड’ असे चित्रपट तयार असूनही कुठेच प्रदर्शित होत नाही आहेत. हे छोटे चित्रपट असल्याने चित्रपटगृहात यांना तितका चांगला प्रतिसाद मिळणार नाही त्यामुळे ते ओटीटीवर प्रदर्शित व्हावे अशी निर्मात्यांची इच्छा आहे.

जुलै २०२२ च्या एका मुलाखतीमध्ये खुद्द नवाजने याबद्दल खुलासा केला. तो म्हणाला, “असे बरेच चित्रपट आहेत जे ओटीटीवर प्रदर्शित व्हायच्याही लायकीचे नाहीत, केवळ फिल्म फेस्टिव्हल्समध्ये त्यांची चर्चा होते. आता ओटीटी माध्यमांनाही सुपरस्टार्स हवे आहेत, पण ओटीटीची सुरुवात अभिनेत्यांपासूनच झाली होती, पण आज याच माध्यमांना अभिनेते नको आहेत. नावाजुद्दीनचा ‘हड्डी’ या चित्रपटाची आता सगळे आतुरतेने वाट पाहत आहेत. यातील त्याच्या स्त्रीवेशातील भूमिकेची आणि लूकची सगळीकडेच चर्चा आहे.

Story img Loader