सध्या ओटीटी हा एक उत्तम पर्याय असला तरी चित्रपट निर्माते आणि चित्रपटगृहाचे मालक यांच्यासाठी तो एक शापच आहे. बॉलिवूडचे चित्रपट थिएटरच नव्हे तर ओटीटी प्लॅटफॉर्मसुद्धा घ्यायला तयार नाहीत अशी चर्चा मध्यंतरी चांगलीच रंगली होती. शिवाय अभिनेता नवाजुद्दीन सिद्दिकी याचे तब्बल ७ चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज आहेत, पण ते चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्म विकत घ्यायला तयार नसल्याचं वृत्तदेखील समोर आलं होतं.
नवाजने मध्यंतरी ओटीटीवर काम करण्याचं बंद करायचं विधानही केलं होतं. त्यानंतर त्याचे चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्म स्वीकारत नसल्याचंही वृत्त समोर आलं होतं. नुकतंच नवाजुद्दीनने यावर मौन सोडलं असून असं काही होत नसल्याचा दावा त्याने केला. शिवाय या सगळ्या अफवा असल्याचंही त्याने स्पष्ट केलं.
आणखी वाचा : मलायकाच्या वेबशोवर बॉलिवूडकडून कौतुकाचा वर्षाव; बॉयफ्रेंड अर्जुन कपूर म्हणाला “तुझा अभिमान…”
‘हिंदुस्तान टाईम्स’च्या वृत्तानुसार नवाज म्हणतो, “माझे चित्रपट अजूनही प्रदर्शनासाठी तयारच नाहीयेत, मला नाहीत माहीत या अफवा नेमकं कोण पसरवतं? ‘हड्डी’चं चित्रीकरण अजून सुरू आहे, ‘अफवाह’ या चित्रपटाचा शूटिंग पूर्ण झालं असून पोस्ट प्रोडक्शन काम सुरू आहे. त्यात बहुतेक आठ महीने ते वर्षभर वेळ जाईल. माझ्या सगळ्या चित्रपटांचं डबिंगचं काम अजून शिल्लक आहे. माझे चित्रपट हे आघाडीच्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर येणार आहेत, कधी ते मी आत्ता नाही सांगू शकत. माझा कोणता चित्रपट स्वीकारायला ओटीटी नकार देत आहे, मला माहीत नाही.”
आणखी वाचा : KBC 14 : “गंभीर सीनच्यावेळी काजोल…” बिग बींनी सांगितला ‘कभी खुशी कभी गम’च्या सेटवरील ‘तो’ किस्सा
जुलै २०२२ च्या एका मुलाखतीमध्ये नवाजने ओटीटीवरील चित्रपटांच्या दर्जाबद्दल भाष्य केलं होतं. तो म्हणाला, “असे बरेच चित्रपट आहेत जे ओटीटीवर प्रदर्शित व्हायच्याही लायकीचे नाहीत, केवळ फिल्म फेस्टिव्हल्समध्ये त्यांची चर्चा होते. आता ओटीटी माध्यमांनाही सुपरस्टार्स हवे आहेत, पण ओटीटीची सुरुवात अभिनेत्यांपासूनच झाली होती, पण आज याच माध्यमांना अभिनेते नको आहेत. नावाजुद्दीनचा ‘हड्डी’ या चित्रपटाची आता सगळे आतुरतेने वाट पाहत आहेत. यातील त्याच्या स्त्रीवेशातील भूमिकेची आणि लूकची सगळीकडेच चर्चा आहे.