गेल्या काही वर्षात ओटीटी हे मनोरंजनाचे नवीन माध्यम म्हणून उदयास आले. गेली अनेक दिवस ओटीटीवरचा कंटेन्ट हा कसा नसावा यावरून वाद सुरु आहे. ओटीटी हा एक उत्तम पर्याय असला तरी चित्रपट निर्माते आणि चित्रपटगृहाचे मालक यांच्यासाठी तो एक शापच आहे. पण सध्या बॉलिवूडचे चित्रपट थिएटरच नव्हे तर ओटीटी प्लॅटफॉर्मसुद्धा घ्यायला तयार नाहीत. अभिनेता नवाजुद्दीन सिद्दिकीचे तब्बल ७ चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज आहेत, पण ते चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्म विकत घ्यायला तयार नसल्याचं मध्यंतरी समोर आलं होतं. आता अखेर नवाजुद्दीनने यावर त्याचं मत मांडलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

आणखी वाचा : Video: क्रिती सेनॉननंतर आता समांथा रूथ प्रभू साकारणार सरोगेट आईची भूमिका, ‘यशोदा’चा चित्तथरारक ट्रेलर प्रदर्शित

नवाजचे ‘जोगीरा सारा रा रा’. ‘नूरानी चेहरा’, ‘अद्भुत’, ‘संगीन’, ‘रोम रोम में’, ‘नो मॅन्स लँड’ असे चित्रपट तयार असूनही कुठेच प्रदर्शित होत नाही आहेत. हे छोटे चित्रपट असल्याने चित्रपटगृहात यांना तितका चांगला प्रतिसाद मिळणार नाही त्यामुळे ते ओटीटीवर प्रदर्शित व्हावे अशी निर्मात्यांची इच्छा आहे. पण ओटीटी प्लॅटफॉर्सनी चित्रपट प्रदर्शनासाठी थेट नकार दिला होता. ओटीटी प्लॅटफॉर्म चित्रपटनिर्मात्यांना चित्रपट थेट चित्रपटगृहात प्रदर्शित करण्यासाठी प्रोत्साहन देत आहेत. मध्यंतरी ओटीटीवर अत्यंत निकृष्ट दर्जाचे चित्रपट प्रदर्शित केल्याने ओटीटीच्या प्रेक्षकांमध्ये बदल झाला असल्याने हा निर्णय घेतला असल्याचं स्पष्ट झालं होतं.

यावर नवाजुद्दिन सिद्दीकीने त्याची बाजू मांडली आहे. ‘बॉलिवूड हंगामा’शी संवाद साधताना तो म्हणाला, “मी एखाद्या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केल्यावर तो चित्रपट कधी, कुठे प्रदर्शित होणार, त्याच्या पोस्ट प्रोडक्शनचे काम कसे सुरु आहे याकडे लक्ष देत नाही. मी अभिनेता आहे, माझं काम आहे अभिनय करणे. यापुढे मला काही माहित नाही.”

पुढे तो म्हणाला, “माझा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होवो किंवा चित्रपटगृहात, मी माझ्या प्रत्येक चित्रपटाच्या रिलीजसाठी तेवढाच उत्सुक असतो. माझ्यासाठी हे दोन्ही अनुभव वेगळे नाहीत.”

हेही वाचा : “महिला व्हॅनिटी व्हॅनमध्ये…” नवाजुद्दीन सिद्दीकीने सांगितला स्त्री पात्र साकारण्याचा अनुभव

दरम्यान, या सात चित्रपटांव्यतिरिक्त नवाजुद्दीनचा ‘हड्डी’ या चित्रपटाची आता सगळे आतुरतेने वाट पाहत आहेत. यातील त्याच्या स्त्रीवेशातील भूमिकेची आणि लूकची सगळीकडेच चर्चा आहे.