नवाजुद्दीन सिद्दीकी याचे नाव बॉलिवूडमधील बहुआयामी कलाकारांच्या यादीत घेतले जाते. त्याने आतापर्यंत अनेक वैविध्यपूर्ण विषयांवर चित्रपट केले. तसंच अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये त्याने त्याच्या अभिनयाची चुणूक दाखवली आहे. त्याच्या अत्यंत गाजलेल्या कलाकृतींपैकी एक कलाकृती म्हणजे ‘सेक्रेड गेम्स.’ या वेब सिरीजमधील त्याच्या कामाचे सर्वत्र प्रचंड कौतुक झाले. पण त्याला या वेब सिरीजमध्ये काम करायचे नव्हते असा खुलासा त्याने नुकताच केला.

इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडिया (इफ्फी) २०२२ च्या मास्टर क्लास सत्रादरम्यान त्याने स्वतःबद्दल अनेक मनोरंजक गोष्टी सांगितल्या. यादरम्यान नवाजुद्दीनने ‘सेक्रेड गेम्स’ या सिरिजची ऑफर सुरुवातीला नाकारली होती आणि त्याला या सिरीजमध्ये अजिबात काम करायचं नव्हतं असे त्याने सांगितले.

आणखी वाचा : करण जोहरच्या चित्रपटातून पदार्पण केल्याचा जान्हवी कपूरला पश्चाताप? म्हणाली, “त्यावेळी मला…”

तो म्हणाला, “जेव्हा मला या वेब सीरिजसाठी पहिल्यांदा विचारण्यात आलं तेव्हा मी ती करण्यास नकार दिला. मला वाटलं की ही एक टीव्ही मालिका आहे. त्यावेळी मला OTT बद्दल माहिती नव्हती. जेव्हा मी त्यांना ओटीटी काय आहे हे विचारलं, तेव्हा त्यांनी मला सांगितलं की हा शो एकाच वेळी १९० देशांमध्ये पाहिला जाईल. मात्र, त्यानंतरही त्यात काम करण्याचा विचार माझ्या डोक्यात नव्हता.”

हेही वाचा : ‘हड्डी’ चित्रपटात नवाजुद्दीन सिद्दीकीबरोबर महत्वपूर्ण भूमिकेत झळकणार ‘ही’ मराठी अभिनेत्री

पुढे तो म्हणाला, “मी या सिरीजला नकार दिला. पण यानंतरही अनुराग कश्यपने माझी पाठ सोडली नाही आणि या वेब सिरिजमध्ये का काम करावं हे त्याने मला पटवून दिलं.” ‘सेक्रेड गेम्स’ ही वेब सीरिज नवाजुद्दीनच्या करिअरमध्ये अत्यंत महत्वाची ठरली आहे. या सिरिजचे कथानक तर प्रेक्षकांना आवडलेच पण यातील नवाजुद्दीनच्या कामाने सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं.

Story img Loader