‘सेक्रेड गेम्स’ फेम नवाजुद्दिन सिद्दिकीने बॉलीवूडमध्ये आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. अभिनेता त्याच्या आगामी चित्रपटात अभिनेत्री अवनीत कौरबरोबर पहिल्यांदाच स्क्रीन शेअर करणार आहे. या दोघांचा ‘टिकू वेड्स शेरू’ हा चित्रपट गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत होता. आधी हा सिनेमा चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार होता परंतु, काही कारणास्तव आता हा चित्रपट निर्मात्यांनी ओटीटीवर प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला आहे. बुधवारी (१४ जून) या चित्रपटाचा ट्रेलर अ‍ॅमेझॉन प्राइमवर रिलीज करण्यात आला.

हेही वाचा : “‘कहो ना प्यार है’ चित्रपट करताना…” हृतिक रोशनने सांगितला ‘तो’ किस्सा, सलमान खानशी आहे खास कनेक्शन

Shraddha Kapoor unveils the Express Group Screen magazine
दिमाखदार कार्यक्रमात ‘स्क्रीन’ पुन्हा वाचकांच्या भेटीला
Zeeshan Siddique slams Uddhav Thackeray
झिशान सिद्दिकींच्या मतदारसंघात उद्धव ठाकरेंनी दिला उमेदवार; खोचक…
Paresh Mokashi, Prashant Damle as Hitler,
प्रसिद्ध अभिनेते प्रशांत दामले हिटलरच्या भूमिकेत, परेश मोकाशी यांच्या मु. पो. बोंबिलवाडीला हिटलर सापडला
Movie on Drama Mukkam post Bombilvadi
Prashant Damle : ‘मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी’ सिनेमात प्रशांत दामले ‘हिटलर’च्या भूमिकेत, परेश मोकाशींचा नवा सिनेमा
The AI dharma Story 25 October in cinemas
‘दि ए आय धर्मा स्टोरी’चे २५ ऑक्टोबरला प्रदर्शन
compromise between the producers and the censor board regarding the release of the emergency film mumbai news
‘इमर्जन्सी’ चित्रपट पुढील महिन्यात प्रदर्शित होणार; निर्माते- सेन्सॉर मंडळातील तडजोडीनंतर प्रकरण उच्च न्यायालयाकडून निकाली
Phulvanti Marathi movie based on the novel
कादंबरीवर आधारित ‘फुलवंती’
The team of Manawat Murders web series at Loksatta addaa
देशाला हादरवून सोडणाऱ्या हत्यासत्राचा थरार; ‘मानवत मर्डर्स’ वेबमालिकेचा चमू ‘लोकसत्ता’ कार्यालयात

४९ वर्षीय शेरू आणि २१ वर्षीय टिकूची अनोखी प्रेमकहाणी येत्या २३ जूनला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात शेरू कसा टिकूच्या प्रेमात कसा पडतो आणि त्यानंतर दोघेही अंडरवर्ल्ड, ड्रग्ज आणि रोमान्समध्ये कसे अडकतात हे या ट्रेलरमध्ये दाखवण्यात आले आहे. ‘टिकू वेड्स शेरू’ चित्रपटाची निर्मिती कंगना राणौतच्या मणिकर्णिका फिल्म्सने केली आहे.

हेही वाचा : द आर्चीज’ चित्रपटाचे पोस्टर पाहून करण जोहरने शेअर केली भावुक पोस्ट, म्हणाला “मुलं किती लवकर…”

‘टिकू वेड्स शेरू’मधील शेरू अभिनेता होण्यासाठी मुंबईत संघर्ष करीत असतो पण, दुसरीकडे त्याचे कुटुंबीय त्याच्यासाठी लग्नाचे बेत आखत असतात, याचवेळी शेरू आणि टिकूची भेट होते. टिकू भोपाळमधून बाहेर पडून मुंबईतील चित्रपटसृष्टीत अभिनेत्री होण्याचे स्वप्न पाहत असते, म्हणूनच ती या लग्नासाठी होकार देते असे या ट्रेलरमध्ये दाखवण्यात आले आहे. ‘टिकू वेड्स शेरू’ हा एक कॉमेडी-ड्रामा चित्रपट असून टिकू आणि शेरू ही दोन्ही पात्र एकमेकांपासून खूप वेगळी आहेत, पण दोघांचेही स्वप्न स्टार होण्याचे आहे.

दरम्यान, अभिनेता नवाजुद्दिन सिद्दिकीचा ‘जोगीरा सा रा रा’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करू शकला नाही. आता ‘टिकू वेड्स शेरू’ मध्ये अभिनेता पहिल्यांदाच अवनीत कौरबरोबर काम करणार आहे. हा चित्रपट २३ जूनला अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडीओवर प्रदर्शित करण्यात येणार आहे.