‘बिग बॉस ओटीटी’च्या यशानंतर दोन आठवड्यांपूर्वी ‘बिग बॉस ओटीटी’चे दुसरे पर्व सुरू झाले. हे पर्व सुरू होताच खूप चर्चेत आले आहे. या पर्वातील स्पर्धक शो हिट करण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करताना दिसत आहेत. सध्या या शोमधून अभिनेता नवाजुद्दीन सिद्दिकीची पत्नी आलिया सिद्दिकी बाहेर पडली आहे. पण, शोमधून बाहेर येताच आलिया सिद्दिकीने अभिनेता सलमान खानवर गंभीर आरोप केला आहे. सलमान खान पूर्णपणे पक्षपाती असून त्यानं नवाजुद्दीन सिद्दिकीला पाठिंबा दिल्याचा आरोप आलियाने केला.

‘इंडियन एक्सप्रेस’शी बोलताना आलिया म्हणाली, “सलमान खान पूर्णपणे पक्षपाती होऊन बोलले. तिथे एका स्टारनं दुसऱ्या स्टारला पाठिंबा दिला होता. एखादी व्यक्ती आपली शक्ती इतर लोकांसाठी कशी वापरते, हे त्यावरून दिसून आलं. मला याबद्दल बोलायला अजिबात भीती वाटत नाही. कारण, मी चुकीची नाही हे मला माहीत आहे. प्रत्येक जण या शोमध्ये भूतकाळाविषयी बोलत आहे. पूजा भट्ट बोलत आहे. फलक आपला भाऊ आणि त्याच्या जेलविषयी बोलली आहे. “माझं अभिषेकबरोबर चांगलं बॉण्ड होतं आणि तो माझ्याविषयी जाणून घेऊ इच्छित होता. मी कधी कोणाशी चुकीचं बोलली नाही.”

salman khan did not select in vivah movie
‘विवाह’मध्ये सलमान खानऐवजी शाहिद कपूरला का घेतलं होतं? दिग्दर्शक म्हणाले, “त्या भूमिकेसाठी निरागसपणा…”
Mulund renamed new Dharavi Dharavi redevelopment rehabilitation Mulund residents agitated boards
‘मुलुंडचे लवकरच नवीन धारावी नामांतर’, संतप्त मुलुंडवासियांकडून मुलुंडमध्ये…
mohammed siraj mahira sharma
क्रिकेटपटू मोहम्मद सिराज Bigg Boss फेम अभिनेत्रीला करतोय डेट? तिच्या आईने दिली प्रतिक्रिया, म्हणाली, “माझी मुलगी सेलिब्रिटी…”
kareena kapoor
हल्ल्यानंतर सैफ अली खान आणि करीनाने मुलांसाठी घेतला मोठा निर्णय; पापाराझींना केली ‘ही’ विनंती
Urvashi Rautela
उर्वशी रौतेलाने ट्रोल करणाऱ्यांना दिलं उत्तर; म्हणाली, “लोक सलमान खान आणि शाहरूख खानला सोडत नाहीत तर…”
Sridevi
श्रीदेवीची एक झलक पाहण्यासाठी न्यायाधीशांनी तिला कोर्टात…, ज्येष्ठ वकिलांनी सांगितला ‘तो’ किस्सा
Fatima Sana Shaikh News
Fatima Sana Shaikh : फातिमा सना शेखने सांगितला कास्टिंग काऊचचा अनुभव; “तो माणूस मला म्हणाला, तुला…”
Junaid Khan sat outside at Ira Khan wedding
बहिणीच्या लग्नात कुटुंबाने दिली नाही कोणतीच जबाबदारी, बाहेर बसला होता जुनैद खान, कारण…

हेही वाचा – Video : पापाराझींना पाहताच कथित बॉयफ्रेंडपासून दूर झाली भूमी पेडणेकर अन् त्यानंतर…; व्हिडीओ व्हायरल

हेही वाचा – महेश भट्ट यांच्याशी लग्न करण्याचा आलिया भट्टच्या आईला होता पश्चाताप, सावत्र लेक पूजाचा मोठा खुलासा

दरम्यान, पूजा भट्टनं आलियावर ती व्हिक्टिम कार्ड खेळत असल्याचा आरोपावर केला होता. त्याविषयी आलिया म्हणाली, “पूजा भट्ट स्वतः वडील महेश भट्ट यांच्या नावाचा वापर करते. तिनं माझ्याविषयी खूप मोठं विधान केलं. पण जेव्हा मी माझा बचाव केला, तर, ती म्हणाली, ‘मी महेश भट्टची मुलगी आहे.’ पूजा भट्टला हे करण्याची काय गरज होती? ती स्वतः एक अभिनेत्री व दिग्दर्शिका आहे. एकेकाळी पूजा भट्ट एक स्टार राहिली आहे. ती आपल्या योग्यतेच्या आधारे का खेळत नाही?”

हेही वाचा – अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणी देवेंद्र फडणवीसांची मोठी अपडेट; म्हणाले, “पुरावे विश्वासार्ह…”

तसेच आलियाला दुसऱ्या लग्नाविषयी विचारलं असता, ती म्हणाली, “नवाजबरोबर घटस्फोट घेण्याची प्रक्रिया सुरू आहे; पण दुसरं लग्न करणार नाही”, असं तिनं स्पष्टच सांगितलं.

Story img Loader