अभिनेत्री नीना गुप्ता यांनी तीन दशकांपासून आपल्या अभिनयाने प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. २०१८ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘मुल्क’, ‘वीरे दी वेडिंग’, ‘बधाई हो ‘ या चित्रपटांद्वारे त्यांनी पुन्हा हिंदी सिनेसृष्टीत पुनरागमन केलं.

नीना गुप्ता यांच्या ‘पंचायत’ या टीव्ही सीरिजचा तिसरा भाग नुकताच प्रदर्शित झाला. त्यानिमित्ताने नीना गुप्ता यांनी बॉलीवूड लाईफच्या युट्यूब चॅनलला मुलाखत दिली.

हेही वाचा… चिन्मय मांडलेकरच्या मुलाचं नाव जहांगीर ठेवल्याने झालेल्या ट्रोलिंगबद्दल आस्ताद काळेने व्यक्त केलं मत; म्हणाला, “मी त्याला विरोध…”

या मुलाखतीदरम्यान जेव्हा नीना यांना एका मुलाखतदाराने विचारलं की, नीना गुप्ता तुम्ही खूप सार्या भूमिका केल्या आहेत आणि जेव्हा तुम्ही त्या भूमिकेत असता तेव्हा असचं वाटतं की ती भूमिका तुम्ही जगताय आणि तुम्हीच त्या आहात की कीय असं वाटू लागत. तर हे सगळं तुम्ही कसं करताृ? भूमिकांना जिवंत कसं ठेवता? यावर नीना गुप्ता म्हणाल्या, “माझा एक फायदा आहे जो म्हणजे माझा चेहरा अगदी सामान्य प्रकारचा आहे. मला खूपजण येऊन बोलतात की तू माझ्या बहिणीसारखी दिसतेस, माझ्या काकीसारखी दिसतेस, माझ्या आईसारखी वाटतेस आणि हे खूप आधीपासून मला बोलतात.”

नीना गुप्ता पुढे म्हणाल्या, “मी बंगाली, साउथ इंडियन, बिहारी, पंजाबी दिसू शकते. कारण देवाने मला असा चेहरा दिलाय की ज्याचा मला फायदा होतो. त्याचा तोटा पण होतो, जेव्हा मला एका वेळेस मला टाईपकास्ट केलं नाही जायचं आणि मग मला भूमिका मिळायच्या नाहीत.

हेही वाचा… अवनीत कौरने केला साखरपुडा? अभिनेत्रीच्या पोस्टमुळे सोशल मीडियावर चर्चांना उधाण

“दुसरी गोष्ट म्हणजे, एकाग्रता असायला हवी. तुम्हाला तुमचे डायलॉग्स माहित असायला हवेत. ज्या भाषा मला नाही येत त्याही मी शिकले. मला जर कोणती भाषा समजायला अवघड जायची तर मी आमच्या लेखकांना सांगायची की व्हॉईस नोट मला पाठवा. तुमच्या सहकलाकारांचेही डायलॉग्स तुम्ही ऐकले पाहिजेत. अनेकदा आपण त्याचा विचार नाही करत. या गोष्टी खरंतर खूप कठीण आहेत. कारण आपल्या डोक्यात दिवसभर वेगवेगळे विचार सुरू असतात.” असं नीना गुप्ता यांनी नमूद केलं.

हेही वाचा… पूजा सावंत-सिद्धेश चव्हाणच्या लग्नाला तीन महिने पूर्ण, अभिनेत्रीने शेअर केली खास पोस्ट; म्हणाली, “मिसेस झाल्यानंतर…”

दरम्यान, नीना गुप्ता यांच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर, वी. के. प्रकाश दिग्दर्शित ‘कागझ-२’ या चित्रपटात नीना गुप्ता शेवटच्या झळकल्या होत्या. लवकरच त्यांच्या ‘पंचायत’ या टीव्ही सीरिजचा तिसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दिपक कुमार मिश्रा यांची ही टीव्ही सीरिज ॲमेझॉन प्राईम व्हिडीओवर प्रदर्शित होणार आहे.