सध्या आपल्याकडे ओटीटी प्लॅटफॉर्मचा चांगलाच सुळसुळाट झालेला आहे. या ओटीटी प्लॅटफॉर्मवर अनेक प्रकारच्या वेबसीरिज आणि शोज दाखवले जातात. वेगवेगळे प्रेक्षक हे कार्यक्रम फार चवीने बघतात. टेलिव्हिजन मालिकांपासून ते चित्रपट आणि रिअॅलिटी शो या प्लॅटफॉर्मवर दाखवले जातात. नेटफ्लिक्सवर नुकताच प्रदर्शित झालेला असाच एक ‘इन रियल लव्ह’ हा शो जो एका वादामुळे चांगलाच चर्चेत आला आहे.

‘इन रिअल लव्ह’ या शोचं रणविजय सिंह आणि गौहर खान सूत्रसंचालन करतात. नेटफ्लिक्सवरील हा एक लोकप्रिय डेटिंग शो आहे. या शोमध्ये स्पर्धकांची एक जोडी तयार करण्यात येते, जी ऑनलाइन डेटिंगबरोबरच एकमेकांच्या सहवासात वेळ घालवतात. नुकतंच या शोमध्ये एका स्पर्धकावर आरोप केल्याने याची चर्चा होत आहे. साक्षी गुप्ता नावाच्या एका मॉडेल तरुणीने हा आरोप केला आहे. या शोदरम्यान तिचे विना परवानगी चुंबन घेण्यात आल्याचा आरोप तिने केला आहे.

Maharashtrachi Hasyajatra Fame shivali Parab dance on uyi amma song
Video: ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम शिवाली परबचा Uyi Amma गाण्यावर भन्नाट डान्स, नेटकरी कौतुक करत म्हणाले…
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
lakhat ek amcha dada fame isha sanjay and juee tanpure dance on uyi amma
Video : सूर्या दादाच्या बहि‍णींचा जबरदस्त डान्स! सुपरहिट ‘उई अम्मा’ गाण्यावर थिरकल्या, नेटकऱ्यांकडून कमेंट्सचा पाऊस
amit bhanushali birthday on set villain priya new look grabs attention
Video : ‘ठरलं तर मग’च्या सेटवर अर्जुनच्या वाढदिवसाची धमाल! खलनायिका प्रियाच्या नव्या लूकने वेधलं लक्ष, मिळाली मोठी हिंट
person Arrested, robbing, businessman ,
‘डेटिंग ॲप’वरील ओळखीतून व्यावसायिकाला लुटणारा अटकेत
tharla tar mag wedding sequence who will arjun marry sayali or priya
‘ठरलं तर मग’ मालिकेत लगीनघाई! सायली अन् प्रिया दोघींच्या हातावर सजणार मेहंदी…; अर्जुनचं लग्न कोणाशी होणार?
nikki tamboli and usha nadkarni will visit maharashtrachi hasya jatra
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मध्ये पोहोचल्या निक्की तांबोळी अन् उषा नाडकर्णी! कोकणातील पारंपरिक गाण्यावर धरला ठेका, पाहा प्रोमो
Marathi Actor Abhishek Rahalkar Wedding
आधी गुपचूप साखरपुडा, आता लग्नाचा फोटो आला समोर! मराठी अभिनेता अडकला विवाहबंधनात, ‘स्टार प्रवाह’च्या ‘या’ मालिकेत केलंय काम

आणखी वाचा : ठरलं! तब्बल ६ महिन्यांनंतर ‘विक्रम वेधा’ व ‘भेडिया’ होणार ओटीटीवर रिलीज; वाचा कुठे पाहता येणार?

वीरेंद्र नावाच्या एका स्पर्धकाने तिच्यासोबत हे गैरवर्तन केल्याचा साक्षी गुप्ताने दावा केला आहे. तिच्या संमतीशिवाय तिच्या खांद्यावर जबरदस्तीने किस करण्यात आल्याचे साक्षीने म्हटले आहे. वास्तविक पाहता साक्षी आणि वीरेंद्र एकमेकांसोबत वेळ घालवणार हे या शोच्या नियमांनुसार ठरले होते. दोघांचे बॉन्डिंग चांगले झाले तर ते आपले नाते पुढे नेतील. याचसाठी हे दोघे एका पूल पार्टीत सहभागी झाले होते.

पूल पार्टीमध्ये दोघांनी मद्यपान केले, एकमेकांबरोबर वेळ घालवला, धमाल केली काही वेळाने ही घटना घडल्याचं स्पष्ट झालं आहे. साक्षीने सांगितले की, वीरेंद्रने न विचारता तिच्या खांद्यावर थोपटले आणि तिला ते आवडले नाही. शिवाय ती मद्यधुंद अवस्थेत होती, आणि म्हणून तिला जास्त काही आठवत नसल्याचं साक्षीने सांगितलं.

आणखी वाचा : YRF च्या सर्वात महागड्या अशा ‘Tiger Vs Pathaan’ चं बजेट ठाऊक आहे का? सलमान-शाहरुख घेणार ‘एवढी’ रक्कम

त्याचबरोबर साक्षीच्या आरोपानंतर वीरेंद्रची प्रतिक्रियाही समोर आली आहे. साक्षीला प्रत्युत्तर देताना तो म्हणाला, “तुम्ही कितीही नशेत असलात तरी त्या वेळी तुमचा मूड बदलू शकत नाही. त्यावेळी तुम्ही एका विशिष्ट प्रकारच्या मूडमध्ये असता. तुमचा हावभाव खूप काही सांगून जातो. या सगळ्यातून मला चुकीच्या पद्धतीने दाखवले जात आहे.”

Story img Loader