नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेल्या ‘लस्ट स्टोरी’ चित्रपट प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीस पडला. स्त्रियांकडे फक्त शारीरिक गरज म्हणून न पाहता तिच्या इच्छा व अपेक्षांचं भान राखावं हे सांगणारा हा चित्रपट. या चित्रपटाची सगळीकडे जोरदार चर्चा रंगली. आता ‘लस्ट स्टोरी’ला मिळालेला प्रतिसाद पाहता चित्रपटाचा दुसरा भाग लवकरच प्रदर्शित होणार आहे. ‘लस्ट स्टोरी २’चा बहुचर्चित ट्रेलर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘लस्ट स्टोरी’मधल्या बोल्ड सीन्स तसेच संवादांची बरीच चर्चा रंगली होती. चित्रपटाच्या दुसऱ्या भागातही इंटिमेट सीन्स पाहायला मिळणार असल्याचं ट्रेलरवरुन लक्षात येत आहे. या ट्रेलरमध्ये तमन्न भाटिया व विजय वर्मा यांचा इंटिमेट सीन पाहायला मिळत आहे. तर नीना गुप्ता यांचे बोल्ड संवाद विशेष लक्ष वेधून घेणारे आहेत. जवळपास दिड मिनिटांच्या या ट्रेलरला काही मिनिटांमध्येच लाखो व्ह्युज मिळाले आहेत.

आणखी वाचा – Video : एकाच वेळी १०८ सुर्यनमस्कार, तरीही दमली नाही प्राजक्ता माळी, व्हिडीओ शेअर करत म्हणाली, “हा पुरावा…”

काजोल, मृणाल ठाकुर, अमृता सुभाष या अभिनेत्रींची झलकही ट्रेलरमध्ये आहे. ‘लस्ट स्टोरी २’च्या ट्रेलरला मिळणारा प्रतिसाद पाहता हा चित्रपटही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरणार असल्याचं चित्र दिसत आहे. ट्रेलरमध्ये काजोल तिच्या पतीच्या वागण्यामुळे कंटाळते आणि घरात घरकाम करणाऱ्या महिलेले कामावरुन काढून टाकते.

आणखी वाचा – Video : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम निखिल बनेचा राहत्या चाळीतील ‘तो’ व्हिडीओ चर्चेत, नेटकरी म्हणतात, “तुझीही वेळ येईल आणि…”

ट्रेलरपूर्वी चित्रपटाचा टीझर सोशल मीडियावर बराच चर्चेचा विषय ठरला होता. ट्रेलरची तर प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते. काजोल, नीना गुप्ता, तिलोत्तमा शोम, मृणाल ठाकूर, तमन्ना भाटिया, अमृता सुभाष, विजय वर्मा, कुमुद मिश्रा, अंगद बेदी अशी तगडी स्टारकास्ट या चित्रपटात उत्तम काम करताना दिसेल. येत्या १९ जूनला हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होईल.

मराठीतील सर्व ओटीटी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Netflix lust stories 2 movie trailer relase kajol tamannaah bhatia vijat varma neena gupta role see details kmd