सध्या ओटीटी प्लॅटफॉर्ममुळे सगळ्यांना कोरियन चित्रपट आणि वेबसीरिज बघायला प्रचंड आवडत आहे. असाच एक कोरियन शो ‘स्क्विड गेम’ लोकांमध्ये खूप प्रसिद्ध आहे. आपल्या कथा आणि आशयामुळे चर्चेत असलेला हा शो आजकाल त्यातील एका अभिनेत्यामुळे प्रसिद्धीच्या झोतात आला होता. या प्रसिद्ध कोरियन ड्रामा शोमध्ये काम करणारा ७८ वर्षीय अभिनेता ओ येओंग सु यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप करण्यात आला असून त्यांच्यावर गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.
ओ येओंग सु ने ‘स्क्विड गेम’ या लोकप्रिय मालिकेत महत्त्वाची भूमिका साकारली होती. प्रेक्षकांना ती भूमिका पसंत पडली होती. पण मीडिया रिपोर्ट्सनुसार, एका महिलेने ७८ वर्षीय ओ येओंग-सूवर तिला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केल्याचा आरोप केला आहे. महिलेचे म्हणणे आहे की, २०१७ साली अभिनेत्याने तिचे लैंगिक शोषण केले होते. मात्र, ओ येओंग सू यानेयांनी आपल्यावर लावण्यात आलेले सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.
या महिलेने डिसेंबर २०२१ मध्ये ओ येओंग सूवर आरोप केले होते. परंतु पुराव्याअभावी एप्रिल २०२२ मध्ये खटला मागे घेण्यात आला. एवढेच नाही तर अभिनेत्यावर कोणत्याही प्रकारचा आरोप लावण्यात आला नव्हता. मात्र आता पीडितेने केस पुन्हा सुरू करण्यासाठी विनंती केली. यासाठी झालेल्या सुनावणीत अभिनेत्याच्या वकिलांनी त्याच्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.
ओ येओंग सू हा खूप लोकप्रिय अभिनेता आहे. दक्षिण कोरियाच्या चित्रपटक्षेत्रात त्याचं मोठं योगदान आहे. कोरियन चित्रपटसृष्टीतील तो पहिलाच प्रतिष्ठित अभिनेता आहे, ज्याला ‘गोल्डन ग्लोब’ पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले आहे. नेटफ्लिक्सच्या ‘स्क्विड गेम’ या लोकप्रिय मालिकेतून त्याला जगभरात ओळख मिळाली. या मालिकेत आल्यापासून, त्याची लोकप्रियता खूप वाढली आहे.