लोकप्रिय नेटफ्लिक्स सीरिज ‘ब्लडहाउंड्स’मधील भूमिकेसाठी ओळखली जाणारी दक्षिण कोरियाची अभिनेत्री किम से रॉन (Actress Kim Sae Ron found dead) हिचे निधन झाले आहे. ती अवघ्या २४ वर्षांची होती. किमचा मृतदेह तिच्या घरी सापडला आहे. पोलीस अधिकारी आता तिच्या निधनाचे कारण शोधण्यासाठी तपास करत आहेत. किम से रॉनच्या निधनानंतर चाहत्यांवर शोककळा पसरली आहे. तिचे चाहते सोशल मीडियावर पोस्ट करून तिला श्रद्धांजली वाहत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अभिनेत्री किम से रॉन सियोल येथे तिच्या राहत्या घरी मृतावस्थेत आढळली. तिच्या मृत्यूबद्दल सर्वात आधी तिच्या एका मित्राने पोलिसांना कळवलं. तिच्या मृत्यू प्रकरणाचा तपास सुरू आहे; पण तिची हत्या झाली असावी, असा कोणताही संशयास्पद पुरावा आतापर्यंत आढळला नाही, असं पोलिसांनी सांगितलं आहे. हिंदुस्थान टाइम्सने हे वृत्त दिलं आहे.

किम से-रॉन ही लोकप्रिय कोरियन अभिनेत्री होती. तिने अवघ्या नऊ वर्षांची असताना करिअरची सुरुवात केली होती. अ ब्रँड न्यू लाइफ (२००९) आणि द मॅन फ्रॉम नोव्हेअर (२०१०) यासारख्या चित्रपटांमधील तिच्या अभिनयामुळे किम से रॉनने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले. २०१६ मध्ये तिने ‘सिक्रेट हीलर’मध्ये मुख्य भूमिका साकारली. नंतर तिने वायजी एंटरटेनमेंटबरोबर करार केला.

किम से-रॉनने चार वर्षांनी २०२० मध्ये वायजी एंटरटेनमेंट सोडले. कोरियातील आघाडीची अभिनेत्री असलेल्या किमने ‘द ग्रेट शमन गा डू शिम’ या वेब सीरिजमध्ये महत्त्वाची भूमिका केली. नंतर ती एसबीएस ड्रामा ‘ट्रॉली’मध्ये झळकली होती.

किम से-रॉन मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवल्याने वादात अडकली होती. यामुळे तिच्या हातातून काही प्रोजेक्ट गेले. पण नंतर तिच्या प्रवक्त्याने याबद्दल स्पष्टीकरण दिलं होतं. किमला तिच्या चुकांची जाणीव झाली आहे, तसेच ती अपघातामुळे झालेल्या नुकसानीची शक्य तितकी भरपाई करणार असल्याचं म्हटलं होतं.