Netflix Top 10 Trending Movies: नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर तुम्हाला थिएटरमध्ये रिलीज झालेल्या चित्रपटांसह नवीन चित्रपट आणि वेब सीरिज घरबसल्या पाहायला मिळतात. नेटफ्लिक्सने त्यांच्या टॉप 10 ट्रेंडिंग चित्रपटांची यादी जारी केली आहे. या यादीतील तुम्ही न पाहिलेले चित्रपट पाहू शकता.
थंडेल
Thandel on Netflix : नेटफ्लिक्सने जाहीर केलेल्या यादीत पहिले नाव ‘थंडेल’चे आहे. या दाक्षिणात्य चित्रपटात नागा चैतन्य आणि साई पल्लवी मुख्य भूमिकेत आहेत. तुम्ही हा चित्रपट अजून पाहिला नसेल तर घरबसल्या पाहू शकता. हा चित्रपट सध्या नंबर 1 वर ट्रेंड करत आहे.
नादानियां
Nadaaniyan on Netflix : इब्राहिम अली खानचा पदार्पणाचा चित्रपट ‘नादानियां’ नेटफ्लिक्सवर दुसऱ्या क्रमांकावर ट्रेंड करतोय. यामध्ये खुशी कपूरदेखील आहे. खुशी व इब्राहिमच्या अभिनयावर टीका होत असली तरी चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळतोय.
इमर्जन्सी
Emergency on OTT : १७ जानेवारीला थिएटरमध्ये प्रदर्शित झालेल्या ‘इमर्जन्सी’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई केली नाही. पण कंगना रणौतच्या सिनेमाला ओटीटीवर चांगला प्रतिसाद मिळतोय. १७ मार्चला ओटीटीवर रिलीज झालेला सिनेमा तिसऱ्या क्रमांकावर ट्रेंड करतोय. यात कंगनाने माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची भूमिका साकारली आहे.
विदामुयार्ची
Vidaamuyarchi on Netflix : ‘विदामुयार्ची’ दाक्षिणात्य चित्रपट आहे. यात अजित कुमार, अर्जुन सरजा, रेजिना कैसांद्रा, त्रिशा, आरव व विजय राम्यासह अनेक कलाकार आहेत. हा चित्रपट तुम्ही थिएटरमध्ये पाहिला नसेल तर आता नेटफ्लिक्सवर पाहू शकता. हा चित्रपट चौथ्या क्रमांकावर ट्रेंड करतोय.
आजाद
Azaad on Netflix : रवीना टंडनची मुलगी राशा थडानी आणि अजय देवगणचा भाचा अमन देवगन यांचा पदार्पणाचा ‘आझाद’ चित्रपटही याच वर्षी जानेवारीमध्ये प्रदर्शित झाला होता. पण चित्रपट फ्लॉप ठरला. हा सिनेमा नेटफ्लिक्सवर पाचव्या क्रमांकावर ट्रेंड करत आहे.
धूम धाम
Dhoom Dhaam on Netflix : यामी गौतम व प्रतीक गांधी यांचा ‘धूम धाम’ १४ फेब्रुवारीला ओटीटीवर प्रदर्शित झाला होता. या सिनेमात नवविवाहित जोडपं कोयल व वीरची कथा पाहायला मिळाली. हा कॉमेडी ड्रामा प्रेक्षकांना आवडला असून तो नेटफ्लिक्सवर सहाव्या क्रमांकावर ट्रेंड करत आहे.
डाकू महाराज
Daku Maharaj on Netflix : नंदामुरी बालकृष्ण, बॉबी देओल आणि उर्वशी रौतेला यांचा ‘डाकू महाराज’ या वर्षी जानेवारीमध्ये थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता आणि हा चित्रपट फेब्रुवारीमध्ये ओटीटीवर प्रदर्शित झाला होता. जवळपास महिनाभरानंतरही हा सिनेमा डिजिटल प्लॅटफॉर्मवर ट्रेंड करत आहे.
पुष्पा 2
Pushpa 2 : अल्लू अर्जुन व रश्मिका मंदानाच्या ‘पुष्पा 2’ थिएटरमध्ये धुमाकूळ घातला. सिनेमाने कमाईचे अनेक रेकॉर्ड्स मोडले. ओटीटीवरही या चित्रपटाने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. हा चित्रपट नेटफ्लिक्सवर ८ व्या नंबरला ट्रेंड करतोय.
द इलेक्ट्रिक स्टेट
The Electric State on OTT : नेटफ्लिक्सवरील ट्रेंडिंग चित्रपटांच्या यादीत हॉलीवूड फिल्म ‘द इलेक्ट्रिक स्टेट’चाही समावेश आहे. हा अमेरिन सायन्स फिक्शन चित्रपट प्रेक्षकांना भावला आहे. हा नवव्या क्रमांकावर ट्रेंड करतोय.
लकी भास्कर
दुलकर सलमानची मुख्य भूमिका असलेला ‘लकी भास्कर’ २८ नोव्हेंबर २०२४ रोजी नेटफ्लिक्सवर रिलीज झाला होता. हा चित्रपट अजूनही प्रेक्षकांचं मनोरंजन करतोय. ‘लकी भास्कर’ १० व्या क्रमांकावर ट्रेंड करतोय.