सिनेविश्वातील अनेक कलाकार वेळेत एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहोचण्यासाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था वापरतात. बरेच कलाकार मुंबईची लाइफलाइन असलेल्या लोकलने किंवा मेट्रोने प्रवास करतात. नेटफ्लिक्सवर सध्या ट्रेंडिंग असलेल्या सीरिजच्या मराठमोळ्या अभिनेत्रीने लोकलमध्ये प्रवास करतानाचा एक व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.
ही अभिनेत्री नुकतीच लेखिका झाली असून तिचं पहिलं पुस्तक प्रकाशित झालं आहे. इन्स्टाग्रामवर व्हिडीओ शेअर केल्यानंतर रिकामी लोकल पाहून चाहत्यांनी तिला प्रश्न विचारले आहेत. तसेच तिचा साधेपणापाहून चाहते तिचं कौतुक करत आहे. तर फोटोतील या अभिनेत्रीला तुम्ही ओळखलंत का?
फोटोतील अभिनेत्री ही मराठमोळी प्राजक्ता कोळी आहे. प्राजक्ताने इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे, ज्यात ती लोकलमध्ये बसलेली दिसत आहे. तर दुसऱ्या व्हिडीओमध्ये ती लोकलच्या दारात उभी राहतेय. प्राजक्ताने प्रवासात हिरव्या रंगाचा चिकनकारी कुर्ता घातला आहे. प्राजक्ताने ‘मुंबई’ असं लिहून त्याबरोबर कॅप्शनमध्ये लाल रंगाचा हार्ट इमोजी वापरला आहे. प्राजक्ताच्या या व्हिडीओवर चाहते लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.
पाहा पोस्ट –
प्राजक्ता कोळी सध्या तिच्या ‘मिसमॅच्ड’ सीरिजच्या तिसऱ्या सीझनमुळे चर्चेत आहे. ही रोमँटिक ड्रामा सीरिज नेटफ्लिक्सवर ट्रेंड करत आहे. आधीच्या दोन सीझनप्रमाणेच तिसऱ्या सीझनलादेखील प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. १३ डिसेंबर रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेल्या ‘मिसमॅच्ड’च्या तिसऱ्या सीझनमध्ये प्राजक्ता कोळीबरोबर कलाकारांची मांदियाळी आहे. रोहित सराफ, रणविजय सिन्हा, विद्या माळवदे, तारुक रैना, एहसास चन्ना, मुस्कान जाफरी, अभिनव शर्मा, दिपन्निता शर्मा, लॉरेन रॉबिन्सन, अक्षत सिंह हे कलाकार आहेत. या सीझनमध्येही रोहित म्हणजे ऋषी शेखावत व प्राजक्ता कोळी म्हणजेच डिंपल आहुजा यांचा रोमान्स, त्यांच्या नात्यातील चढ-उतार पाहायला मिळत आहे.