सध्या जगभरात ओटीटीचा गवगवा खूप मोठ्या प्रमाणात वाढला आहे आणि यातलंच एक प्रख्यात नाव म्हणजे ‘नेटफ्लिक्स.’ आजकाल घराघरात नेटफ्लिक्स वापरलं जातंय. ओटीटीचं प्रमाण एवढं वाढलंय की आता कोणतेही शोज, चित्रपट घरबसल्या प्रेक्षकांना आरामात पाहता येत आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून नेटफ्लिक्सद्वारे करोडो प्रेक्षक मनोरंजनाचा आनंद लुटतायत.
१० वर्षे चाचणी केल्यानंतर आता याच अॅप्लिकेशनमध्ये काही महत्त्वाचे आणि मोठे बदल होणार आहेत. नेटफ्लिक्स एक नवीन डिझाईन घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नेटफ्लिक्स त्यांच्या अॅपमध्ये मोठी सुधारणा घडवून आणणार आहे आणि यामुळे वापरकर्त्यांना त्याचा मोठा फायदा अनुभवायला मिळणार आहे.
हेही वाचा… नुकतेच आई-बाबा झालेले वरुण धवन-नताशा दलाल पहिल्यांदाच दिसले लेकीबरोबर, व्हिडीओ व्हायरल
नेटफ्लिक्सवरील कोणताही कॉन्टेन्ट शोधण्याची प्रक्रिया सोप्पी करण्यासाठी हा बदल घडवण्यात येणार आहे. या बदलामुळे नेटफ्लिक्स नव्या सबस्क्रायबर्सना आकर्षित करण्याच्या प्रयत्नात आहे.
नेटफ्लिक्सच्या संशोधनातून असं दिसून आलं आहे की, वापरकर्ते होम स्क्रीन स्कॅन करण्यात बराच वेळ घालवत आहेत. या प्रक्रियेला त्यांनी ‘आय जिम्नॅस्टिक्स’असं नाव दिलंय. टायटल, ट्रेंडिंग सेक्शन, आर्टवर्क, ट्रेलर्स यांच्यामध्ये दर्शक आपला जास्त वेळ घालवत आहेत.
हेही वाचा… “मी बोल्ड सीन करायला अगदीच तयार…”, ‘माझिया प्रियाला प्रीत कळेना’ फेम मृणाल दुसानिसचं वक्तव्य
याबद्दल सांगताना सदस्य उत्पादनाचे वरिष्ठ संचालक पॅट्रिक फ्लेमिंग रॉयटर्सला म्हणाले, “आम्हाला खरंतर ते अधिक सोप्प आणि नेव्हिगेट करायलाही सहज असं बनवायचं होतं.”
नेटफ्लिक्स रीडिझाइन करताना कोणते मोठे बदल होणार आहेत जाणून घेऊ
मोठे शीर्षक कार्ड : शो आणि चित्रपटांचे थंबनेल आता मोठे दिसणार आहेत. याद्वारे शीर्षक पाहणे सोपे होईल आणि युजर त्यावर लगेच क्लिक करतील.
माहितीची पुनर्रचना : माहिती अधिक सुव्यवस्थित पद्धतीने सादर केली जाणार आहे. मुख्य तपशील हायलाइट केले जातील.
माझं नेटफ्लिक्स टॅब (My Netflix Tab) : वापरकर्त्यांसाठी एक नवीन सेक्शन तयार करण्यात येणार आहे, जिथे त्यांनी आधी पाहिलेले सिनेमे, शोज सेव्ह राहतील.
नेव्हिगेशन होणार सोप्प : डाव्या बाजूचा मेन्यू स्क्रिनच्या वरच्या बाजूला हलवण्यात येणार आहे, जेणेकरून “होम,” “शो,” “चित्रपट” आणि “माय नेटफ्लिक्स”सारखे मुख्य पर्याय लगेच दिसतील.
वापरकर्त्यांसाठी रीडिझाइन कधी लाइव्ह होणार आहे
नेटफ्लिक्स रीडिझाइनची सध्या चाचणी केली जात आहे. यात कंपनीच्या जवळपास २७० दशलक्ष सदस्यांच्या मर्यादित गटांचा समावेश आहे. वापरकर्त्यांसमोर हे रीडिझाइन आणण्यापूर्वी या चाचणीचा फीडबॅक वापरण्याची कंपनीची योजना आहे.