करोना काळामध्ये लोक घरी बसून कंटाळले होते. तेव्हा त्यांना ओटीटी प्लॅटफॉर्मवर सीरिज आणि चित्रपट पाहायची सवय लागली. बऱ्याच लोकांचीही सवय तशीच टिकून आहे. हे लोक रविवारी किंवा सुट्टीच्या दिवशी बाहेर न जाता घरी बसून वेब सीरिज बिंज व्हॉच करतात. अशाच ओटीटीप्रेमी रसिकांसाठी आनंदाची बातमी आहे. ऑगस्ट महिन्यात अनेक नवे चित्रपट, वेब शो आणि सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. तर मग जाणून घेऊयात या आठवड्यामध्ये ओटीटीवर काय प्रदर्शित होणार आहे.

अभिनेत्री तापसी पन्नूचा ‘दोबारा’ हा चित्रपट येत्या शनिवारी १५ ऑक्टोबर रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट ऑगस्ट महिन्यामध्ये चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाला प्रेक्षकांचा संमिश्र प्रतिसाद मिळाला होता. अनुराग कश्यप यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे. हा चित्रपट ‘मिराज’ या स्पॅनिश चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे.

chris evans back to marvel films
‘कॅप्टन अमेरिका’ फेम अभिनेता क्रिस एव्हान्सचं मार्व्हल सिनेमात पुनरागमन; ‘या’ चित्रपटात दिसणार महत्त्वाच्या भूमिकेत
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Lakhat Ek Aamcha Dada
Video : “…तसा सूर्या तुमचा जावई”, तुळजाने केली डॅडींकडे ‘ही’ मागणी; मालिकेत पुढे काय होणार? पाहा प्रोमो
Pushpa 2 Movie News
Pushpa 2 : ‘पुष्पा 2’ हजार कोटींच्या क्लबमध्ये, इतकी बक्कळ कमाई करणारे आणखी सहा चित्रपट कुठले?
Bhoot Bangla Release Date
भीती आणि हास्याचा दुहेरी डोस घेऊन येतोय अक्षय कुमार; ‘या’ तारखेला ‘भूत बंगला’ चित्रपट होणार प्रदर्शित
upendra limaye first telugu film director praises him
उपेंद्र लिमयेंचा पहिला तेलुगू चित्रपट! थेट दाक्षिणात्य दिग्दर्शकाकडून कौतुक; म्हणाला, “सर कोणतीही भूमिका…”
pune video : 80 years old lady selling panipuri
पुण्यातील ८० वर्षांची आज्जी विकते पाणी पुरी, Viral Video एकदा पाहाच
cinema hall Ulhasnagar, Ulhasnagar Parking ,
उल्हासनगरात चित्रपटगृहाशेजारील रहिवाशांची कोंडी, प्रेक्षकसंख्या वाढल्याने रहिवासी क्षेत्रात पार्कींग

आणखी वाचा – कतरिनाला आहे हॉरर चित्रपटांची ॲलर्जी; ‘या’ दिग्दर्शकाबरोबर काम करायची व्यक्त केली इच्छा

या आठवड्यामध्ये यूट्यूबर प्राजक्ता कोळीच्या ‘मिसमॅच्ड’ (Mismatched) या लोकप्रिय सीरिजचा दुसरा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. २०२० मध्ये या सीरिजचा पहिला सीझन आला होता. या सीरिजला मिळालेला प्रतिसाद पाहून निर्मात्यांनी याचा दुसरा सीझन बनवण्याचा निर्णय घेतला. या सीरिजमध्ये प्राजक्तासह रोहित सराफ, रणविजय सिंह, सुहासिनी मुळे, निधी सिंह अशा कलाकारांनी काम केले आहे. शुक्रवारी १४ ऑक्टोबर रोजी हा सीझन नेटफ्लिक्सवर प्रदर्शित केला जाणार आहे.

आणखी वाचा – खुर्चीला खिळवून ठेवणाऱ्या थरारक ‘दुरंगा’च्या पुढील सीझनची घोषणा; लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला

याव्यतिरिक्त हिंदीमध्ये ‘गुड बॅड गर्ल’ (सोनी लाइव्ह) ही सीरिज आणि ‘कहानी रबरबँड की’ (झी5) हा चित्रपट १४ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणार आहेत. तर होली फॅमिली (Holy family), समवन बॉरोड (Someone borrowed), द प्लेलिस्ट (The playlist), टेक १ (Take 1) या काही सीरिज बिंज व्हॉच करता येणार आहेत. ज्यांना चित्रपटगृहांमध्ये मोठ्या पडद्यावर चित्रपट पाहायची आवड आहे असे लोक ऑस्कर २०२२ मध्ये भारताकडून पाठवला गेलेला ‘छेल्लो शो’ (Chhello show) हा चित्रपट पाहू शकतात.

Story img Loader