गेल्या काही वर्षात सस्पेन्स थ्रिलर आणि गुन्हेगारीवर आधारित अनेक वेब सिरीज प्रेक्षकांच्या भेटीला आल्या. त्या सिरीजना प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला. काही दिवसांपूर्वीच नेटफ्लिक्सवर ‘दिल्ली क्राईम २’ ही सिरीज दाखल झाली. या सिरीजच्या पहिल्या भागाप्रमाणेच याचा दुसरा सिझनही गाजला. या सिरीजच्या यशानंतर नेटफ्लिक्सने गुन्हेगारीवर आधारित एका नव्या सिरीजची घोषणा केली आहे.

आणखी वाचा : Video : “आता खूप झालं…” अयान मुखर्जीवर वैतागला रणबीर कपूर, व्हिडीओ व्हायरल

govinda and krushna abhishek reunite
८ वर्षांचं भांडण मिटलं! अखेर गोविंदा व भाचा कृष्णा अभिषेक दिसणार एकत्र; कॉमेडियन म्हणाला, “आता मी तुम्हाला…”
Kanguva OTT Release
३५० कोटींचे बजेट, १० दिवसांत कमावले फक्त ६५…
psychological, romatic thriller movies
गूढ कथा अन् खिळवून ठेवणारे थरारक सीन्स; OTT वरील ‘हे’ सिनेमे पाहिलेत का? यातील एक चित्रपट आहे सत्य घटनेवर आधारित
pushpa 2 digital rights
प्रदर्शनाआधीच अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा २’ने कमावले ‘इतके’ कोटी! पठाण आणि टायगरला सुद्धा टाकलं मागे
55th iffi festival lampan directed by nipun dharmadhikari in best web series competition
५५ वा इफ्फी महोत्सव : सर्वोत्कृष्ट वेब मालिकांच्या स्पर्धेत निपुण धर्माधिकारी दिग्दर्शित ‘लंपन’
Crime Thriller Web Series On Prime Video
‘मिर्झापूर’पेक्षाही दमदार ‘या’ सीरिज प्राइम व्हिडीओवर आहेत उपलब्ध, तुम्ही पाहिल्यात का?
samay raina deepika padukone mental health joke
भर कार्यक्रमात दीपिका पादुकोणच्या डिप्रेशन अन् मातृत्वावर केला विनोद; नेटकऱ्यांनी सुनावल्यावर कॉमेडियन म्हणाला, “माझ्या कमेंट…”
Salman Khan denies association with The Great Indian Kapil Show
“कुठे थांबायचं याचा विसर…”, भावना दुखावल्याने कपिल शर्माच्या शोमुळे सलमान खानला कायदेशीर नोटीस? अभिनेत्याने दिलं स्पष्टीकरण

‘स्पेशल ऑप्स’, ‘अय्यारी’, ‘एम एस धोनी: द अनटोल्ड स्टोरी’ यासारख्या उत्तमोत्तम कलाकृती बनवणारा दिग्दर्शक नीरज पांडे आता एक सस्पेन्स आणि गुन्हेगारीने भरलेली सिरीज नेटफ्लिक्सवर घेऊन येत आहे. या सिरीजचं नाव आहे ‘खाकी: द बिहार चॅप्टर.’ भाऊबीजेच्या मुहूर्तावर या सिरीजचा एक टीझर व्हिडीओ नेटफ्लिक्सने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटबरून शेअर केला आहे. या सिरीजची कथा बिहारची असून एक जमीनदार आणि एक पोलिस अधिकारी यांच्यातील संघर्षावर आधारीत आहे. आधारित आहे. ही सिरीज ‘विक्रम वेधा’ या चित्रपटाच्या आधारे बनवली जाणार असल्याचेही बोलले जाते.

हेही वाचा : आयुष्मान खुरानाचा ‘डॉक्टर जी’ थिएटरनंतर आता ओटीटी प्लॅटफॉर्मवर नशीब आजमावण्यासाठी सज्ज

नेटफ्लिक्सने शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये ही सिरीज शूट करतानाचे बिहाईंड द सीन्स दिसत आहेत. या सिरीजमध्ये करण टैकर, अविनाश तिवारी, आशुतोष राणा, रवि किशन, अनूप सोनी, जतिन सरना, निकिता दत्ता, अभिमन्यु सिंह, ऐश्वर्य सुष्मिता, विनय पाठक या कलाकारांच्या महत्वपूर्ण भूमिका आहेत. या सिरीजचे काम सध्या सुरु असून लवकरच ही वेब सिरीज नेटफ्लक्सवरून प्रेक्षकांच्या भेटीला येईल.