जेव्हा स्मार्टफोन्स आणि प्लेस्टेशन हा प्रकार फारसा प्रचलित नव्हता तेव्हा आणि खासकरून ९० च्या दशकातील तरूणांसाठी या गोष्टी फार चैनीच्या मानल्या जायच्या त्यांच्यासाठी विंडोज कॉम्प्युटर आणि त्यातील भन्नाट गेम्स हेच ९० च्या दशकातील मुलांचं विश्व होतं. अगदी ‘वूल्फ’, ‘रोडरॅश’, ‘डेव्ह’पासून ‘निड फॉर स्पीड’, ‘क्रिकेट २००७’ अन् ‘काउंटर स्ट्राइक’पर्यंत बरेच गेम्स आजही कित्येकांचे अगदी फेव्हरेट आहेत.

खासकरून ९० च्या दशकात वाढलेल्या अन् स्मार्टफोन्स येण्याआधी लहानाच्या मोठ्या झालेल्या या पिढीला या गेम्सचं फारच अप्रूप. याच काळात आणखी एका गेमची प्रचंड क्रेझ पाहायला मिळाली तो म्हणजे ‘जीटीए – व्हाईस सिटी’ (Grand Theft Auto – vice city). हा गेम आजही प्रत्येकाच्या अगदी चांगलाच स्मरणात आहे. गुन्हेगारी विश्वावर बेतलेला, एक काल्पनिक शहर उभं केलेल्या या गेममध्ये वेगवेगळी मिशन पूर्ण करायची असत. शहरातील ‘Organised crime’ या थीमलाईनवर तयार केलेला हा गेम प्रचंड लोकप्रिय झाला.

black warrant the sabarmati report on OTT
या आठवड्यात OTT वर रिलीज होणाऱ्या कलाकृतींची यादी, वाचा…
pataal lok season 2 trailer
Pataal Lok 2 Trailer: जबरदस्त गूढ, अ‍ॅक्शन आणि…
actor gurmeet choudhary diet plan
दीड वर्षापासून भात, पोळी, साखर काहीच खाल्लं नाही; बॉलीवूड अभिनेत्याचा खुलासा, म्हणाला…
most google searched indian movies on ott
वीकेंडला पाहता येतील गुगलवर सर्वाधिक सर्च झालेले ‘हे’ १० चित्रपट, ओटीटीवर आहेत उपलब्ध
OTT Release in January First Week
जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात OTT वर काय पाहायचं? वाचा दमदार कलाकृतींची यादी!
The Sabarmati Report OTT Release on Zee5 on January 10, 2025
The Sabarmati Report OTT Release: आता विक्रांत मेस्सीचा ‘द साबरमती रिपोर्ट’ चित्रपट ओटीटीवर पाहता येणार; कुठे, कधीपासून जाणून घ्या…
best indian web series 2024
Year Ender 2024: क्राईम थ्रिलरपासून ते कॉमेडीपर्यंत, यंदा ओटीटीवर गाजल्या ‘या’ वेब सीरिज; तुम्ही पहिल्यात का?
the secret of shiledar trailer
Video : छत्रपती शिवाजी महाराजांचा खजिना आणि १७ व्या शतकातील रहस्य, ‘द सिक्रेट ऑफ शिलेदार’चा टीझर झाला प्रदर्शित; कुठे बघता येईल सीरिज?
All We Imagine As Light OTT release
जगभर गाजलेला All We Imagine As Light ओटीटीवर रिलीज होणार; कधी, कुठे पाहता येणार सिनेमा? वाचा

बरीच मुलं हा गेम केवळ त्या शहरात महागड्या ऊंची गाड्या तसेच बाईक चालवण्यासाठी, टँक घेऊन संपूर्ण शहरात धुमाकूळ घालण्यासाठी, टॅक्सी ड्रायव्हर बनून शहर फिरण्यासाठी तर वेगवेगळे स्टंट करून पैसे कमावण्यासाठी खेळत असत. या गेममधील मिशन्स फार कमी मंडळी पूर्ण करत असत. कित्येकांसाठी हा गेम म्हणजे एक मनोरंजनाचं उत्तम साधन होता. जसजशी तंत्रज्ञानाची प्रगती झाली तसतसे कॉम्प्युटर्स आणि त्यातले हे भन्नाट गेम्स मागे पडू लागले अन् त्यांची जागा स्मार्टफोन्सच्या ‘बॅटलग्राऊंड पब-जी’ आणि ‘फ्री-फायर’सारख्या गेम्सनी घेतली. परंतु आता चिंता करायची गरज नाही, कारण आता पुन्हा तुम्हाला हाच ‘जीटीए’ मोबाइलवर खेळायला मिळणार आहे.

नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मच्या कृपेमुळे ९० च्या दशकातील पिढीला हा ‘GTA: The Trilogy’मध्ये येणारे तीनही गेम्स आपल्या स्मार्टफोन्स, लॅपटॉप तसेच टॅब्लेटवर खेळता येणार आहे. ज्यांच्याकडे ‘नेटफ्लिक्स’ची मेंबरशिप आहे त्यांना आता ‘Grand Theft Auto III’, ‘GTA Vice City’, and ‘GTA San Andreas’ हे तीनही गेम्स खेळायला मिळणार आहेत अन् त्यासाठी कोणतेही अतिरिक्त पैसे किंवा फी भरायची गरज नाहीये. तुमच्याकडे नेटफ्लिक्सची मेंबरशिप असेल तर त्यातून तुम्ही हा गेम अगदी सहजरित्या प्लेस्टोर किंवा एपस्टोअरवरुन डाउनलोड करता येणार आहे. ‘जीटीए’च्या चाहत्यांसाठी ही एक खूप आनंदाची बातमी आहे. अगदी जुन्या कम्प्युटरप्रमाणेच ग्राफीक या मोबाइल गेममध्येही पाहायला मिळत आहे.

आणखी वाचा : “बाहुबलीसुद्धा हिंसक चित्रपट…” ‘सालार’बद्दल भाष्य करणाऱ्या प्रभासचं ‘ते’ वक्तव्य चर्चेत

नेटफ्लिक्सने आत्तापर्यंत ८६ गेम्स प्रेक्षकांसाठी आणले आहेत आणि अजून ९० गेम्सवर काम सुरू असून लवकरच तेदेखील प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. ९० च्या दशकातील मुलांचे बालपण अधिक मनोरंजक बनवणाऱ्या ‘जीटीए’ची मजा पुन्हा एकदा नेटफ्लिक्सच्या माध्यमातून अनुभवता येणार आहे.

Story img Loader