‘आदिपुरुष’ चित्रपट १६ जून २०२३ रोजी बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित झाला. चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर यातील संवाद, व्हिएफएक्स तसेच प्रभास, सैफ अली खान व क्रिती सेनॉन यांच्या लुकवरून सोशल मीडियावर बरेच वाद निर्माण झाले होते. चित्रपटाने पहिल्या दिवशी चांगली कमाई केली होती. मात्र, त्यानंतर ‘आदिपुरुष’च्या कलेक्शनमध्ये सातत्याने घट पाहायला मिळाली होती.
हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरला असला तरी, चित्रपट रसिक अजूनही डिजिटल प्लॅटफॉर्मवर प्रभास स्टारर चित्रपटाच्या प्रदर्शनाची प्रतीक्षा करत होते. या चित्रपटामुळे निर्माण झालेला वाद पाहता प्रथम कोणताही ओटीटी प्लॅटफॉर्म हा चित्रपट घेण्यास तयार नव्हता असं वृत्त समोर आलं होतं, पण आता प्रेक्षकांना हा चित्रपट ओटीटीवर पाहता येणार आहे.
आणखी वाचा : Gadar 2 Review : जुन्या आठवणींना उजाळा देणारा बहुचर्चित ‘गदर २’ पाहायलाच हवा का? एकदा वाचा
ओम राऊत दिग्दर्शित ‘आदिपुरुष’ हा चित्रपट नुकताच नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर उपलब्ध करण्यात आला आहे. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर त्याच्या ओटीटी प्रदर्शनाचीसुद्धा चांगलीच हवा असते, पण हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकल्याने कोणतंही प्रमोशन न करताच नेटफ्लिक्सवर हा चित्रपट उपलब्ध करून देण्यात आला आहे.
‘आदिपुरुष’ हा चित्रपट महाकाव्य रामायणावर आधारित आहे. या चित्रपटात सुपरस्टार प्रभासने रामाची भूमिका, क्रिती सेननने सीतेची, सनी सिंगने लक्ष्मणची, सैफ अली खानने रावणाची आणि देवदत्त नागेने हनुमानाची भूमिका साकारली होती. या चित्रपटाचे लेखन मनोज मुंतशीर यांनी केले होते. चित्रपटातील काही आक्षेपहार्य सीन्स आणि संवादांमुळे यावर प्रचंड टीकाही झाली. ऑल इंडिया सिने वर्कर्स असोसिएशनने सुद्धा चित्रपटाच्या टीमविरुद्ध कारवाईची मागणी केली होती.