OTT Release This Week : फेब्रुवारीचा तिसरा आठवडा चित्रपट आणि मालिका रसिकांसाठी खूप मजेशीर असणार आहे. या आठवड्यात ओटीटीवर मनोरंजन करणाऱ्या अनेक कलाकृती रिलीज होणार आहेत. १७ फेब्रुवारी ते २३ फेब्रुवारी दरम्यान, नेटफ्लिक्स, प्राइम व्हिडीओ आणि जिओ हॉटस्टारसह विविध ओटीटी प्लॅटफॉर्मवर अनेक उत्कृष्ट चित्रपट आणि वेब सीरिज रिलीज होणार आहेत. या यादीत ‘क्राइम बीट’पासून ‘डाकू महाराज’पर्यंत अनेक नावं आहेत. या यादीबद्दल जाणून घेऊयात.

उप्स अब क्या

Oops Ab Kya on OTT : ‘उप्स अब क्या’ ही वेब सीरिज असून त्यात श्वेता बसू प्रसाद, आशिम गुलाटी, जावेद जाफरी, सोनाली कुलकर्णी, अभय महाजन आणि अपरा मेहता यांच्यासह अनेक स्टार्स दिसणार आहेत. ही सीरिज २० फेब्रुवारी रोजी जिओ हॉटस्टारवर प्रदर्शित होणार आहे.

रीचर सीजन 3

Reacher Season 3 on OTT : ‘रीचर’ ही देखील एक सीरिज आहे. आधीचे दोन सीझन हिट ठरल्यानंतर आता तिचा तिसरा सीझन येत आहे. यामध्ये रीचरची कथा पाहायला मिळणार आहे. ही सीरिज २० फेब्रुवारीपासून प्राइम व्हिडीओवर पाहता येईल.

क्राइम बीट

Crime Beat on OTT : ‘क्राइम बीट’ ही एक वेब सीरिज आहे, ज्यामध्ये क्राईम आणि अॅक्शन पाहायला मिळणार आहे. यात एका पत्रकाराची कहाणी दाखवण्यात आली आहे जो आपल्या करिअरमध्ये संघर्ष करत आहे आणि नंतर त्याला एका मोठ्या प्रोजेक्टवर काम करण्याची संधी मिळते. ही सीरिज फेब्रुवारी रोजी ZEE5 वर रिलीज होणार आहे.

डाकू महाराज

Daaku Maharaaj OTT Release : नंदामुरी बालकृष्ण, बॉबी देओल आणि उर्वशी रौतेला स्टारर चित्रपट ‘डाकू महाराज’ जानेवारीमध्ये थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. आता हा चित्रपट OTT वर येणार आहे. २१ फेब्रुवारीपासून हा चित्रपट नेटफ्लिक्सवर पाहता येईल. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती, त्यामुळे आता या चित्रपटाला ओटीटीवर कसा प्रतिसाद मिळतो, ते पाहणं महत्त्वाचं ठरेल.

ऑफिस

Office on OTT : ‘ऑफिस’ हा तमिळ शो आहे, जो २१ फेब्रुवारीला हॉटस्टारवर प्रसारित होणार आहे. यात प्रेक्षकांना भरपूर ड्रामा आणि कॉमेडी पाहायला मिळणार आहे.

Story img Loader