मार्व्हल स्टुडिओने एमसीयू (MCU) म्हणजेच मार्व्हल सिनेमॅटीक यूनिव्हर्सच्या माध्यमातून आत्तापर्यंत अनेक दर्जेदार कलाकृतींची निर्मिती केली आहे. सध्या एमसीयू मल्टीव्हर्स सागा’ (Multiverse saga) या चौथ्या फेजमध्ये आहे. ‘थॉर: लव्ह अ‍ॅन्ड थंडर’, ‘डॉक्टर स्ट्रेंज इन द मल्टीव्हर्स ऑफ मॅडनेस’, ‘शांग ची’ असे आणि यापुढे प्रदर्शित होणारे चित्रपट मल्टीव्हर्स सागामध्ये मोडतात. या फेजमध्ये काही वेब सीरिजची निर्मिती सुद्धा करण्यात आली. यापैकी एक लोकप्रिय वेब सीरिज म्हणजे ‘मून नाईट’ (Moon knight) होय. ही सीरिज हॉटस्टारवर उपलब्ध आहे.

‘मून नाईट’ हा मार्व्हल कॉमिक्सचा प्रसिद्ध सुपरहिरो आहे. या सुपरहिरोवर आधारित वेब सीरिज तयार करण्याचा निर्णय निर्मात्यांनी तिसऱ्या फेजमध्ये असताना घेतला होता. मार्क स्पेक्टर हे या वेब सीरिजमधील प्रमुख पात्र आहे. मार्कला डीआयडी (Dissociative identity disorder) हा आजार असतो. या आजाराने पीडित असलेल्या व्यक्तीमध्ये एकापेक्षा जास्त व्यक्तिमत्वांचा वावर असतो. बऱ्याच वेळेस पीडित व्यक्ती स्वत:हून या व्यक्तिमत्वांना जन्म देते. मून नाईटमध्ये मार्कची भूमिका ऑस्कर आयझॅकने (Oscar Isaac) साकारली आहे. या वेब सीरिजमध्ये त्यांच्यासह इथन हॉक (Ethan Hawke) , मे कॅलमावी (May Calamawy) अशा कलाकारांनी काम केले आहे.

आणखी वाचा – ‘बेला चाओ’ हे गाणं, खिळवून ठेवणारा थरार पुन्हा अनुभवायला मिळणार? ‘मनी हाईस्ट’च्या चाहत्यांसाठी खुशखबर

काही महिन्यांपूर्वी प्रदर्शित झालेल्या या सीरिजला प्रेक्षकांना खूप पसंत केले. सहा भागांच्या या छोट्या सीरिजच्या शेवटी मून नाईटचा दुसरा सीझन येणार असल्याचे अस्पष्टपणे नमूद करण्यात आले होते. दरम्यान ऑस्कर आयझॅकने एका कॉमिक कॉनला हजेरी लावली होती. या कॉमिक कॅनमध्ये त्याला एका चाहत्याने ‘मून नाईटचा दुसरा सीझन येणार आहे का?’ असा प्रश्न विचारला. त्यावर ऑस्करने ‘मी एवढेच म्हणू शकतो की, मून नाईटचा शेवट झाल्याचे माझ्या ऐकण्यात आले नाही’ असे उत्तर दिले. ऑस्कर व्यतिरिक्त या सीरिजचे मुख्य लेखक जेरेमी स्लेटर यांनीही मून नाईटच्या २ सीझन येणार असल्याचे संकेत दिले आहेत.

आणखी वाचा – बहुचर्चित ‘फोर मोर शॉट्स प्लीज’चा तिसरा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला; या दिवशी होणार प्रदर्शित

मून नाईट हा सुपरहिरो त्याच्या स्वतंत्र वेब सीरिज सोडून मार्व्हलच्या अन्य सीरिजमध्ये दिसू शकतो अशी शक्यता वर्तवली जात आहे. एमसीयूच्या ‘ब्लेड’ या आगामी सीरिजमध्ये तो कॅमिओ करणार असल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरु आहे.

Story img Loader