सध्या दिवाळीचा आठवडा सुरू आहे आणि या वीकेंडसह दिवाळीच्या सुट्ट्याही आल्या आहेत. या मोठ्या वीकेंडला तुम्ही OTT वर बिंज-वॉचचा आनंद घेऊ शकता. OTT प्लॅटफॉर्मवर वेगवेगळ्या प्रकारचे आशय उपलब्ध आहेत, ज्यामध्ये प्रत्येक प्रेक्षक आपल्या आवडीनुसार विविध कलाकृती निवडून पाहू शकतात. काहींना थ्रिलर आवडते, तर काहींना कॉमेडी. आज आम्ही तुमच्यासाठी थ्रिलर, सस्पेन्स आणि डार्क कॉमेडीने भरलेल्या काही खास वेब सीरिजची माहिती घेऊन आलो आहोत, या वेब सीरिज तुम्ही नेटफ्लिक्सवर पाहू शकता.

१३ रिझन्स व्हाय (13 Reasons Why)

जर तुम्हाला सस्पेंस आणि ड्रामा आवडत असेल तर ‘१३ रिझन्स व्हाय’ ही वेब सीरिज तुमच्यासाठी योग्य आहे. या वेब सीरिजची कथा काही कॉलेजवयीन विद्यार्थ्यांभोवती फिरते. यातील कॉलेजला जाणाऱ्या विद्यार्थ्यांपैकी एक विद्यार्थिनी आत्महत्या करते. आत्महत्येपूर्वी ती १३ कॅसेट्स बनवते. या कॅसेट्स १३ वेगवेगळ्या लोकांना पाठवल्या जातात. या कॅसेट्समध्ये काय आहे आणि त्या मुलीने आत्महत्या का केली, हे जाणून घेण्यासाठी ही वेब सीरिज नक्कीच पाहता येईल. ही सीरिज नेटफ्लिक्सवर हिंदीतही उपलब्ध आहे.

Best Movies On Prime Video
दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये घरबसल्या पाहता येतील ‘हे’ चित्रपट; प्राइम व्हिडीओवरील उत्तम सिनेमांची यादी
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Psychological Thriller Films On Hotstar
‘दृश्यम’ पाहिलाय? त्याहूनही भयंकर आहेत हॉटस्टारवरील ‘हे’ चित्रपट, पाहा हादरवून सोडणाऱ्या सिनेमांची यादी
darlings badla merry christmas ott thriller movies
सस्पेन्स-थ्रिलर चित्रपट पाहायला आवडतात? मग नक्की पाहा नेटफ्लिक्सवरील हे सिनेमे
Underrated Thriller Movies on OTT
‘अंधाधुन’ पाहिलाय? त्यापेक्षाही जबरदस्त ट्विस्ट असलेले ‘हे’ चित्रपट आहेत OTT वर, वाचा यादी
Woman driving BMW steals flower pot from outside Noida shop, video goes viral
“अशा श्रीमंतीचा काय उपयोग?” आलिशान बीएमडब्ल्यूमधून आलेल्या महिलेचं रात्री १२ वाजता लाजीरवाणं कृत्य; VIDEO व्हायरल
Phullwanti on OTT
घरबसल्या पाहा प्राजक्ता माळीचा ‘फुलवंती’ सिनेमा; ‘या’ OTT प्लॅटफॉर्मवर आहे उपलब्ध
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट नावच सांगितलं; म्हणाले…

हेही वाचा…सस्पेन्स-थ्रिलर चित्रपट पाहायला आवडतात? मग नक्की पाहा नेटफ्लिक्सवरील हे सिनेमे

डेड बॉय डिटेक्टिव्हस (Dead Boy Detectives)

जर तुम्हाला हॉरर-डिटेक्टिव्ह प्रकाराच्या कथेसह कॉमेडी-ड्रामा पाहायचा असेल, तर ही मालिका तुमच्यासाठी योग्य आहे. जर तुम्ही ‘सँडमॅन’ पाहिला असेल, तर ही सीरिज त्याच सिनेमाच्या विषयासारखी आहे.

बेबी रीइनडिअर (Baby Reindeer)

ब्लॅक कॉमेडीच्या चाहत्यांसाठी ‘बेबी रीइनडिअर’ ही मालिका उत्तम पर्याय ठरू शकते. ही मालिका स्टॉकिंग या विषयावर आधारित आहे; समीक्षकांनीही या मालिकेला चांगला प्रतिसाद दिला आहे.

हेही वाचा…OTT वर उपलब्ध आहेत ‘हे’ भयंकर भयपट, एकटं बसून पाहायची वाटेल भीती; पाहा यादी…

बॉडीज (Bodies)

२०२३ मध्ये प्रदर्शित झालेली ही मालिका चार वेगवेगळ्या टाइमलाईनमध्ये घडणाऱ्या कथेसोबत प्रेक्षकांना भुरळ घालते. या चारही कालखंडात एक मृतदेह सापडतो आणि त्या कालखंडातील चार गुप्तहेरांना त्या खुन्याचा शोध घ्यायचा असतो. टाइम ट्रॅव्हलची एक अद्भुत संकल्पना असलेली ही वेब सीरिज प्रेक्षकांना खिळवून ठेवते.

हेलबाऊंड (Hellbound)

या मालिकेत एका भविष्यवाणीनुसार माणसाच्या मृत्यूची तारीख आणि वेळ सांगितली जाते. त्यानंतर पुढे काय होतं हे जाणून घेण्यासाठी ही वेब सीरिज पाहायला हवी. रहस्यमय थ्रिलर आवडणाऱ्यांसाठी हेलबाऊंड ही सीरिज एक उत्तम निवड आहे, विशेषतः या वेब सीरिजचा दुसरा सीझन २५ ऑक्टोबर २०२४ ला प्रदर्शित झाला आहे.

या सर्व मालिका तुम्हाला नेटफ्लिक्सवर पाहायला मिळतील, ज्यामुळे तुमचा वीकेंड मनोरंजक होईल.

Story img Loader