ओटीटीवर अनेक थ्रिलर चित्रपट आहेत. पण, थ्रिलर चित्रपटांमध्ये सायकोलॉजिकल थ्रिलर, रोमँटिक थ्रिलर, सस्पेन्स थ्रिलर असे अनेक प्रकार असतात. या अनेक प्रकारात ओटीटीवर कोणते चांगले सिनेमे आहेत हा प्रश्न निर्माण होतो. आज आम्ही तुम्हाला ओटीटीवरील सायकोलॉजिकल, रोमॅंटिक , सस्पेन्स अशा अनेक प्रकारांतील उत्तम थ्रिलर चित्रपटांची माहिती देणार आहोत. यातील काही चित्रपट सत्य घटनेवर आधारित आहेत. हे सिनेमे तुम्हाला खिळवून ठेवतील, तर काही सिनेमातील सीन्स बघून तुमच्या अंगावर काटा येईल.
बरोट हाउस
Barot House On Ott : ‘बरोट हाउस’ हा २०१९ मध्ये प्रदर्शित झालेला सायकोलॉजिकल थ्रिलर चित्रपट आहे. या चित्रपटात अमित साध आणि मंजिरी फडणीस मुख्य भूमिकेत आहेत. यात अमित बरोट नावाचे पात्र असून त्याला तीन मुली आणि एक मुलगा असतो. अचानक त्याच्या मुलींची हत्या होऊ लागते आणि संपूर्ण कुटुंब हादरून जाते. संशयाच्या भोवऱ्यात त्याचा मुलगा मल्हार सापडतो, यामुळे वडील अमित स्वतः त्याला पोलिसांच्या स्वाधीन करतो. पण, खरोखरच मल्हार गुन्हेगार आहे का? या प्रश्नाचे उत्तर चित्रपटात मिळेल. ‘बरोट हाउस’ हा सिनेमा ‘झी ५’ वर पाहता येईल.
हेही वाचा…प्रदर्शनाआधीच अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा २’ने कमावले ‘इतके’ कोटी! पठाण आणि टायगरला सुद्धा टाकलं मागे
कूमन
Kooman On Ott : मल्याळम चित्रपटसृष्टीत अनेक सस्पेन्स थ्रिलर चित्रपट बनले आहेत, त्यापैकीच एक आहे ‘कूमन.’ २०२२ मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन जीतू जोसेफ यांनी केले आहे. हा चित्रपट केरळ-तमिळनाडू सीमेवरील एका गावातील पोलिस अधिकाऱ्याच्या जीवनाभोवती फिरतो. हा थ्रिलर चित्रपट ‘प्राईम व्हिडीओ’वर पाहता येईल.
‘पोशम पा’
Posham Pa On Ott : ‘पोशम पा’ हा २०१९ मध्ये आलेला सायकोलॉजिकल थ्रिलर आहे, ज्याचे दिग्दर्शन सुमन मुखोपाध्याय यांनी केले आहे. या चित्रपटात माही गिल, सयानी गुप्ता आणि रागिणी खन्ना प्रमुख भूमिकेत आहेत. चित्रपट सत्यघटनेवर आधारित असून १९९६ मध्ये घडलेल्या एका भीषण प्रकरणाची कथा सांगतो. अंजना नावाची महिला आणि तिच्या दोन मुलींनी ४० पेक्षा अधिक मुलांचे अपहरण केले आणि १२ मुलांची हत्या केली. ही कथा पाहताना तुमच्या अंगावर काटा येईल. ‘पोशम पा’ झी ५ वर पाहता येईल.
इराइवन
Iraivan On Ott : ‘इराइवन’ हा सायकोलॉजिकल थ्रिलर चित्रपट आहे, जो एका सायको किलरवर आधारित आहे. यात किलर तरुण मुलींची हत्या करतो. जयराम रवी आणि नयनतारा यांनी या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. या चित्रपटाचा क्लायमॅक्स जबरदस्त आहे. हा चित्रपट ‘नेटफ्लिक्स’वर उपलब्ध आहे. चित्रपटात सस्पेन्स, ॲक्शन आणि रोमॅन्सचा उत्तम तडका पाहायला मिळतो.
हसीना दिलरुबा
Haseena Dilruba On Ott : तापसी पन्नू आणि विक्रांत मेस्सी यांची प्रमुख भूमिका असलेला ‘हसीना दिलरुबा’ हा रोमँटिक थ्रिलर चित्रपट आहे. चित्रपटात सस्पेन्स, प्रेम आणि ट्विस्टचा जबरदस्त मेळ आहे. या चित्रपटाचा सिक्वल ‘फिर आई हसीना दिलरुबा’देखील प्रेक्षकांच्या भेटीला आला असून दोन्ही चित्रपट ‘नेटफ्लिक्स’वर पाहता येतील.