psychological thrillers on Jio Cinema : सध्याच्या काळात प्रेक्षक कॉमेडी, अॅक्शन आणि हॉरर चित्रपटांबरोबरच सायकोलॉजिकल थ्रिलर चित्रपट आणि सीरीजला सुद्धा पसंती देत आहेत. ‘एक व्हिलन’ असो किंवा ‘मर्डर २’ अशा सायकोलॉजिकल थ्रिलर चित्रपटांची क्रेझ वाढतच चालली आहे.

२०११ मध्ये आलेला ‘मर्डर २’ मध्ये मुलींच अपहरण होऊन होणारा खून त्यामागे असणारा सायको सिरीयल किलर अशा आशयाची कथा असणारा हा सिनेमा खूप गाजला. जर तुम्हालाही या प्रकारातले चित्रपट बघायला आवडत असतील, तर आम्ही तुमच्यासाठी ५ उत्तम चित्रपटांची यादी घेऊन आलो आहोत, हे चित्रपट तुम्ही ‘जिओ सिनेमा’ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर सहजपणे पाहू शकता.

Phullwanti on OTT
घरबसल्या पाहा प्राजक्ता माळीचा ‘फुलवंती’ सिनेमा; ‘या’ OTT प्लॅटफॉर्मवर आहे उपलब्ध
Daily Horoscope 12th November 2024 in Marathi
१२ नोव्हेंबर पंचांग: देवउठनी एकादशीला १२ पैकी ‘या’…
new ott release november
थिएटरमध्ये गाजलेले ‘हे’ सिनेमे OTT वर होणार प्रदर्शित, काही याच वीकेंडला पाहता येणार, वाचा यादी
korean spy and zombie movies ott a hard day
झॉम्बीजचा भयानक थरार ते गुप्तहेरांच्या गूढ कथा, OTT वरील ‘या’ वेब सीरिज पाहून उडेल थरकाप
Navjot Singh Sidhu returns to Kapil Sharma Show
तब्बल ५ वर्षांनी नवज्योत सिंग सिद्धू यांची कपिल शर्माच्या शोमध्ये पुन्हा एन्ट्री; अर्चना म्हणाली, “माझ्या खुर्चीवर कब्जा…”
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार पडला विवाहसोहळा, फोटो आले समोर
Underrated Thriller Movies on OTT
‘अंधाधुन’ पाहिलाय? त्यापेक्षाही जबरदस्त ट्विस्ट असलेले ‘हे’ चित्रपट आहेत OTT वर, वाचा यादी
Pranav Mohanlal is working on a farm in Spain for food
वडील सुपरस्टार, स्वतःही केले हिट चित्रपट; आता जग फिरतोय ‘हा’ अभिनेता, लोकांच्या शेतातही करतो काम

‘टेबल नंबर २१’

Table No 21 On OTT :२०१३ साली प्रदर्शित झालेल्या ‘टेबल नंबर २१’मध्ये परेश रावल, टीना देसाई व राजीव खंडेलवाल यांसारख्या कलाकारांनी भूमिका साकारल्या आहेत. या चित्रपटाचं कथानक एका जोडप्यावर आधारित आहे. हे जोडपं सुट्टी साजरी करण्यासाठी परदेशात जातं. त्यांना तिथं एका गेममध्ये सहभागी होण्याची संधी मिळते. हा गेम जिंकल्यास मोठी रक्कम जिंकू शकू या शक्यतेने ते या गेममध्ये भाग घेतात. पण खेळ सुरू झाल्यावर जे घडतं, ते चकित करणारं असतं. हा चित्रपट तुम्ही ‘जिओ सिनेमा’वर पाहू शकता.

हेही वाचा…नेटफ्लिक्सचं सबस्क्रिप्शन आहे? रविवारी पाहा ‘या’ जबरदस्त सस्पेन्स-थ्रिलर वेब सीरिज, वाचा यादी

जोकर

Joker On OTT : या यादीतील दुसरं नाव आहे हॉलीवूड चित्रपट ‘जोकर’. या चित्रपटात जोक्विन फिनिक्सने मुख्य भूमिका साकारली आहे. या चित्रपटाचं कथानक एका मानसिक आजारानं त्रस्त असलेल्या कॉमेडियनवर आधारित आहे. हा कॉमेडियन लोकांमध्ये आपली ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न करतो. जेव्हा तो आपल्यावर झालेले अत्याचार सहन न करता, त्यास प्रत्युत्तर देतो, तेव्हा त्याच्या आयुष्यात एक हिंसक वळण येतं. हा चित्रपटसुद्धा तुम्ही ‘जिओ सिनेमा’वर पाहू शकता.

स्प्लिट

Split On OTT : २०१६ साली प्रदर्शित झालेला हा चित्रपट प्रेक्षकांना खूप आवडला होता. चित्रपटात एक असा व्यक्ती दाखवला आहे, ज्याला मल्टीपल पर्सनॅलिटी डिसऑर्डर आहे आणि तो तीन किशोरवयीन मुलींचं अपहरण करतो. त्या मुलींना त्याच्या तावडीतून सुटण्याचा मार्ग शोधावा लागतो. हा चित्रपट ‘जिओ सिनेमा’वर उपलब्ध आहे.

हेही वाचा…थिएटरमध्ये गाजलेले ‘हे’ सिनेमे OTT वर होणार प्रदर्शित, काही याच वीकेंडला पाहता येणार, वाचा यादी

ब्लाइंड

Blind On OTT : सोनम कपूरची मुख्य भूमिका असलेला हा थ्रिलर चित्रपट २०२३ साली प्रदर्शित झाला. या चित्रपटाची कथा एका अंध महिलेभोवती फिरते. एक सिरीयल किलर तिला त्रास देतो आणि ती तिच्या सिक्स सेन्सने त्याच्यापर्यंत कस पोहोचते हा प्रवास या चित्रपटात दाखवण्यात आला आहे. चित्रपटातील सस्पेन्सचा अनुभव घेण्यासाठी तुम्ही ‘ब्लाइंड’ हा चित्रपट ‘जिओ सिनेमा’ वर पाहू शकता.

हेही वाचा…“पत्नीने मला एकदा रंगेहात पकडलं होतं…”, शत्रुघ्न सिन्हांनी स्वतःच केलेला खुलासा, म्हणाले होते…

दीवानगी

Deewangi On OTT : २००२ साली प्रदर्शित झालेल्या थ्रिलर चित्रपटात अजय देवगण, अक्षय खन्ना यांसारखे स्टार्स आहेत. या चित्रपटात अजय देवगन व्हीलन म्हणून प्रेक्षकांसमोर येतो. या चित्रपटाची कथा आणि त्यातले ट्विस्ट तुम्हाला थक्क करून सोडतील. हा चित्रपट ‘जिओ सिनेमा’वर उपलब्ध आहे.