OTT releases to watch this week: ओटीटीवर थ्रिलर, हॉरर कॉमेडी अशा प्रकारांतील अनेक सिनेमे आणि वेब सीरिज उपलब्ध असतात. दर आठवड्याला ओटीटीवर नव्या कलाकृती प्रेक्षकांच्या भेटीस येत असतात. याही आठवड्यात नव्या वेब सीरिज आणि चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आले असून, त्यात या वर्षी सर्वाधिक लोकप्रिय झालेला सिनेमा आणि एका ऐतिहासिक वेब सीरिजचासुद्धा समावेश आहे. या वीकेंडला प्रेक्षकांना ओटीटीवरील आशयात विविधता मिळणार असून, त्यात हॉलीवूड, बॉलीवूडसह अगदी जपानच्या वेब सीरिजसुद्धा पाहायला मिळणार आहेत. चला तर, या आठवड्यात कुठल्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर कुठला नवा सिनेमा आणि वेब सीरिज पाहायची याची माहिती जाणून घेऊ.

डेडपूल ॲण्ड वूल्व्हरीन

Deadpool & Wolverine On Ott : डेडपूलचं आयुष्य पुन्हा एकदा संकटात सापडतं, जेव्हा टाइम व्हेरियन्स अथॉरिटी त्याला मल्टीवर्स वाचवण्यासाठी भरती करतं. या मिशनमध्ये त्याला मदत करण्यासाठी वूल्व्हरीनला एका युनिव्हर्समधून आणण्यात येतं. रायन रेनॉल्ड्स आणि ह्यु जॅकमॅन यांनी या सिनेमात मुख्य भूमिका साकारल्या आहेत. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर १.३३८ अब्ज डॉलर्स इतकी कमाई केली आहे. हा चित्रपट १२ नोव्हेंबर २०२४ ला डिज्नी प्लस हॉटस्टारवर प्रदर्शित झाला आहे.

neetu kapoor ridhhima kapoor sahni dance on jamal kadu
Video : आई अन् लेकीचा ‘जमाल कुडू’ गाण्यावर डान्स, रिद्धिमा कपूर साहनीबरोबर नीतू कपूर यांनी धरला ठेका; पाहा व्हिडीओ
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Actor Makarand Anaspure Directed movie rajkaran gela mishit marathi movie roles
दिवाळीनंतर मकरंद अनासपुरेंचा नवरंगी धमाका
Director Nikhil Advani believes that artistic films will never disappear
‘कलात्मक चित्रपट कधीच लोप पावणार नाहीत…’; दिग्दर्शक निखिल अडवाणी
Musical dance drama Urmilayan Aryans Group of Companies Kamesh Modi
सांगीतिक नृत्यनाट्य ‘ऊर्मिलायन’
Star Pravah New Serial Lagnanantar Hoilach Prem
Video : ठरलं! मृणाल दुसानिसची नवीन मालिका ‘या’ दिवशी सुरू होणार, ‘लग्नानंतर होईलच प्रेम’मध्ये झळकणार ‘हे’ दमदार कलाकार
new ott release november
थिएटरमध्ये गाजलेले ‘हे’ सिनेमे OTT वर होणार प्रदर्शित, काही याच वीकेंडला पाहता येणार, वाचा यादी
Phullwanti on OTT
घरबसल्या पाहा प्राजक्ता माळीचा ‘फुलवंती’ सिनेमा; ‘या’ OTT प्लॅटफॉर्मवर आहे उपलब्ध

हेही वाचा…फक्त सात कोटींचे बजेट, कमावले तब्बल ‘इतके’ कोटी; OTT वर रिलीज होतोय ‘हा’ सुपरहिट चित्रपट

फ्रीडम ॲट मिडनाईट

Freedom at Midnight On Ott : डोमिनिक लॅपिएरे व लॅरी कॉलिन्स यांच्या ‘फ्रीडम ॲट मिडनाईट’ या पुस्तकावर आधारित ही ऐतिहासिक वेब सीरिज भारत आणि पाकिस्तानच्या विभाजनावर प्रकाश टाकते. या मालिकेत सिद्धांत गुप्ता (पंडित जवाहरलाल नेहरू), चिराग व्होरा (महात्मा गांधी) व राजेंद्र चावला (सरदार वल्लभभाई पटेल) यांच्या प्रमुख भूमिका आहेत. निखिल अडवाणी यांनी या सीरिजच दिग्दर्शन केलं आहे. ही सीरिज आज (१५ नोव्हेंबर) ‘सोनी लिव्ह’वर प्रदर्शित झाली आहे.

क्रॉस

Cross On Ott : जेम्स पॅटर्सन यांच्या ‘अ‍ॅलेक्स क्रॉस’ पुस्तकावर ही वेब सीरिज आधारित आहे. एक डिटेक्टिव्ह, फॉरेन्सिक सायकॉलिजिस्ट आणि एक वडील असणाऱ्या व्यक्तींवर ही सीरिज प्रकाश टाकते. या सीरिजमधील डिटेक्टिव्हला गुन्हेगार आणि एखाद्या गुन्ह्यातील पीडित (व्हिक्टीम) यांच्या मानसिकतेचे आकर्षण असते. ही सीरिज डिटेक्टिव्ह क्रॉस याच्या जीवनात आलेल्या गुन्हेगारांच्या मानसिकतेवर प्रकाश टाकते. त्यात डिटेक्टिह क्रॉसच्या व्यावसायिक आयुष्याचा त्याच्या खासगी आयुष्यावर होणारा परिणाम या सीरिजमधू दाखविण्यात आला आहे. त्यात आल्डिस हॉज, इसायाह मुस्तफा व जुआनिता जेनिंग्ज यांच्या प्रमुख भूमिका आहेत. ही सीरिज १४ नोव्हेंबर २०२४ ला प्राईम व्हिडीओवर स्ट्रीम झाली आहे.

हेही वाचा…झॉम्बीजचा भयानक थरार ते गुप्तहेरांच्या गूढ कथा, OTT वरील ‘या’ वेब सीरिज पाहून उडेल थरकाप

बियॉण्ड गुड बाय

Beyond Goodbye On Ott : १४ नोव्हेंबर २०२४ पासून नेटफ्लिक्सवर स्ट्रीम होत असलेली ही जपानी वेब सीरिज एका हृदयस्पर्शी कथेवर आधारित आहे. त्यातील नायिकेच्या प्रियकराचा अपघातात मृत्यू होतो. त्यानंतर ती एका व्यक्तीच्या प्रेमात पडते. लवकरच तिला कळतं की, या अनोळखी व्यक्तीला तिच्या प्रियकराचं हृदय मिळालं आहे. त्यात कासुमी अरिमुरा व केंटारो साकागुची यांच्या भूमिका आहेत.

हेही वाचा…‘मर्डर २’ पाहिलाय? त्याहूनही भयानक आहेत जिओ सिनेमावरील ‘हे’ सायकॉलिजल थ्रिलर चित्रपट; पाहा यादी

युध्रा

Yudhra On Ott : युध्रा हा एक तरुण आहे; जो आपल्या पालकांच्या खुनाचा बदला घेण्याचा निर्धार करून वाटचाल करीत असतो. परंतु, या प्रवासात त्याला आपल्या भूतकाळातील अनेक गोष्टींचा उलगडा होतो. सिद्धांत चतुर्वेदी, मालविका मोहनन व राघव जुयाल यांच्या भूमिका असलेला हा चित्रपट आजपासून ( १५ नोव्हेंबर २०२४) प्राईम व्हिडीओवर प्रदर्शित झाला आहे.