New OTT Release : नोव्हेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रेक्षकांसाठी भरपूर मनोरंजनाचा धमाका आहे. कारण- या काळात अनेक नवीन चित्रपट आणि वेब सीरिज प्रदर्शित होणार आहेत. २०२४ मध्ये थिएटरमध्ये गाजलेले सिनेमे या आठवड्यात OTT वर प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. त्यात दाक्षिणात्य चित्रपटांबरोबर हॉलीवूड आणि बॉलीवूडचा तडकादेखील बघायला मिळणार आहे. चला, पाहूया यातील काही खास चित्रपटांबद्दल.

देवरा पार्ट १

Devara part 1 On OTT : ज्युनियर एनटीआर, जान्हवी कपूर व सैफ अली खान यांच्या मुख्य भूमिका असलेला ‘देवरा पार्ट १’ हा चित्रपट ८ नोव्हेंबर रोजी ओटीटीवर रिलीज झाला आहे. कोरताला शिवा दिग्दर्शित हा चित्रपट तेलुगू, तमीळ, मल्याळम, कन्नड व हिंदी भाषांमध्ये उपलब्ध आहे. हा सिनेमा ‘नेटफ्लिक्स’वर हिंदी भाषेत २२ नोव्हेंबरपासून उपलब्ध होणार आहे.

Phullwanti on OTT
घरबसल्या पाहा प्राजक्ता माळीचा ‘फुलवंती’ सिनेमा; ‘या’ OTT प्लॅटफॉर्मवर आहे उपलब्ध
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Sachin Pilgaonkar ashok saraf starr navra maza navsacha 2 release on amazon prime
५० दिवसांनंतर ‘नवरा माझा नवसाचा २’ चित्रपट आता ओटीटीवर, कोणत्या प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला? जाणून घ्या…
Underrated Thriller Movies on OTT
‘अंधाधुन’ पाहिलाय? त्यापेक्षाही जबरदस्त ट्विस्ट असलेले ‘हे’ चित्रपट आहेत OTT वर, वाचा यादी
thangalaan buchingham murders agent ott release novembar
थिएटरमध्ये रिलीज झाले, पण ओटीटीवर रखडलं प्रदर्शन; अखेर घरबसल्या पाहता येणार ‘हे’ गाजलेले चित्रपट
biggest Flop bollywood Movie of 2024
बॉलीवूड कलाकारांची फौज, तब्बल ३५० कोटींचे बजेट; मात्र चित्रपट ठरला सुपरफ्लॉप, कमावले फक्त…
yek number OTT release update
तेजस्विनी पंडित निर्मित ‘येक नंबर’ घरबसल्या पाहता येणार, ‘या’ OTT प्लॅटफॉर्मवर होणार प्रदर्शित
My Name The Night Agent Vincenzo The Glory
नेटफ्लिक्सचं सबस्क्रिप्शन आहे? रविवारी पाहा ‘या’ जबरदस्त सस्पेन्स-थ्रिलर वेब सीरिज, वाचा यादी

हेही वाचा…या आठवड्यात OTT वर पाहा जबरदस्त अ‍ॅक्शन असलेल्या स्पाय सीरिज, खिळवून ठेवणाऱ्या कथेसह मिळेल रोमांचक अनुभव; वाचा यादी

वेट्टैयन

Vettaiyan On OTT : रजनीकांत आणि अमिताभ बच्चन यांच्या मुख्य भूमिका असलेला ‘वेट्टैयन’ हा चित्रपट ८ नोव्हेंबर रोजी ‘प्राइम व्हिडीओ’वर प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट एका सुपरकॉपच्या कथेवर आधारित आहे.

द बकिंगहॅम मर्डर्स

The Buckingham Murders On OTT : दिग्दर्शक हंसल मेहता यांच्या ‘द बकिंगहॅम मर्डर्स’ या चित्रपटात करीना कपूर खान मुख्य भूमिकेत आहे. हा चित्रपट आता नेटफ्लिक्सवर ८ नोव्हेंबरपासून स्ट्रीम होत आहे. त्यामुळे चाहत्यांना वीकेंडला हा सिनेमा पाहण्याची उत्तम संधी आहे.

हेही वाचा…‘अंधाधुन’ पाहिलाय? त्यापेक्षाही जबरदस्त ट्विस्ट असलेले ‘हे’ चित्रपट आहेत OTT वर, वाचा यादी

विजय ६९

Vijay 69 On OTT : अनुपम खेर यांच्या अभिनयाने सजलेला ‘विजय ६९’ हा चित्रपटही ८ नोव्हेंबरपासून नेटफ्लिक्सवर उपलब्ध आहे. त्यात अनुपम खेर यांनी ६९ वर्षांच्या एका व्यक्तीची भूमिका साकारली आहे; ज्यामुळे प्रेक्षकांना हटके कथानक अनुभवता येणार आहे.

हेही वाचा…थिएटरमध्ये रिलीज झाले, पण ओटीटीवर रखडलं प्रदर्शन; अखेर घरबसल्या पाहता येणार ‘हे’ गाजलेले चित्रपट

इट एंड्स विद अस

It Ends With Us On OTT : ‘इट एंड्स विद अस’ हा एक हॉलीवूड चित्रपट असून, तो ९ नोव्हेंबरपासून ‘नेटफ्लिक्स’वर स्ट्रीम होणार आहे. हॉलीवूड चित्रपट पाहण्याची आवड असणाऱ्यांसाठी हा चित्रपट लिस्टमध्ये समाविष्ट करण्यासाठी एक उत्तम पर्याय आहे.

हेही वाचा..‘सिंघम अगेन’ कोणत्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार? जाणून घ्या.

डेडपूल आणि वूल्वरिन

Deadpool & Wolverine On OTT : सिनेमाघरांत धुमाकूळ घालणारा ‘डेडपूल व वूल्वरिन’ हा हॉलीवूडचा चित्रपट आता ओटीटीवर येत आहे. मार्व्हल युनिव्हर्सचा हा चित्रपट १२ नोव्हेंबर रोजी ‘डिज्नी प्लस हॉटस्टार’वर उपलब्ध होणार आहे. या सिनेमात रायन रेनॉल्ड्स आणि ह्युज जॅकमॅन यांच्या मुख्य भूमिका आहेत.

Story img Loader