OTT Release In February: जानेवारी महिना संपत आला आहे. २०२५ चा दुसरा महिना म्हणजेच फेब्रुवारीमध्ये प्रेक्षकांना ओटीटीवर भरपूर कलाकृती पाहता येणार आहे. फेब्रुवारीत मनोरंजक चित्रपट व वेब सीरिज ओटीटीवर रिलीज होणार आहे. जानेवारीमध्ये ‘पुष्पा 2’ पासून ‘पाताल लोक 2’ पर्यंत अनेक उत्कृष्ट चित्रपट आणि सीरिज प्रदर्शित झाल्या होत्या. त्याचप्रमाणे फेब्रुवारीमध्ये चित्रपट आणि सीरिज पाहायला मिळणार आहे. फेब्रुवारीमध्ये ओटीटीवर कोणते चित्रपट आणि सीरिज रिलीज होणार आहेत ते जाणून घेऊयात.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

साले आशिक

Saale Aashiq on OTT : चंकी पांडे, ताहिर राज भसीन आणि मिथिला पालकर यांचा चित्रपट ‘साले आशिक’ १ फेब्रुवारी रोजी डिजिटल प्लॅटफॉर्म सोनी लिव्हवर प्रदर्शित होणार आहे. द्वेषाचे राजकारण, जुन्या परंपरा आणि शेवटी मृत्यूच्या धमक्यांविरुद्ध उभे राहण्यावर आधारित हा चित्रपट आहे.

Sky Force ने एका आठवड्यात कमावले तब्बल ‘इतके’ कोटी, महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्यांच्या नातवाने केलंय पदार्पण

मिसेस

Mrs on OTT : ‘मिसेस’ हा आरती कडव दिग्दर्शित चित्रपट आहे. यात सान्या मल्होत्रा, निशांत दहिया, कंवलजीत सिंग आणि लवलीन मिश्रा यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट ७ फेब्रुवारीला ZEE5 वर प्रदर्शित होणार आहे.

बड़ा नाम करेंगे

Bada Naam Karenge on OTT : ऋतिक घनशानी आणि आयेशा कडूसकर यांची ही वेब सीरिज ७ फेब्रुवारी रोजी ओटीटी प्लॅटफॉर्म सोनी लिव्हवर प्रदर्शित होणार आहे. या सीरिजमधून सूरज बडजात्या ओटीटीवर पदार्पण करणार आहेत.

हाडं मोडली, ओठ चिरला अन्…; बॉलीवूड अभिनेत्रीचा भीषण अपघात, फोटो पाहून चाहते काळजीत

द मेहता बॉईज

The Mehta Boys : अविनाश तिवारी, श्रेया चौधरी आणि बोमन इराणी यांच्या भूमिका असलेला हा चित्रपट ७ फेब्रुवारी रोजी प्राइम व्हिडिओवर प्रदर्शित होणार आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन बोमन इराणी यांनी केले आहे. या चित्रपटात मुलगा आणि वडील यांच्यातील तणावपूर्ण नात्याची गोष्ट लोकांना पाहायला मिळणार आहे.

Video: गंगेत डुबकी मारणाऱ्या रामदेव बाबांनी केलं असं काही की…; हेमा मालिनींना हसू आवरेना, व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल

धूम धाम

Dhoom Dhaam on Netflix : ‘धूम धाम’ हा ऋषभ शेट्टी दिग्दर्शित चित्रपट आहे. यात यामी गौतम आणि प्रतीक गांधी यांची जोडी पाहायला मिळणार आहे आणि एजाज खानही या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत आहे. हा चित्रपट मोठ्या पडद्यावर नाही तर ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाची खूप चर्चा होत आहे. हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर व्हॅलेंटाईन डे म्हणजेच १४ फेब्रुवारी रोजी रिलीज होईल.

उप्स अब क्या

Oops Ab Kya on OTT : ‘उप्स अब क्या’ ही वेब सीरिज आहे. यात श्वेता बसू प्रसाद, आशिम गुलाटी, जावेद जाफरी यांच्यासह अनेक स्टार्स दिसणार आहेत. ही सीरिज ओटीटी प्लॅटफॉर्म डिस्ने प्लस हॉटस्टारवर रिलीज होईल. या सीरिजची कथा एका चुकीमुळे गरोदर राहणाऱ्या महिलेची आहे.

मराठीतील सर्व ओटीटी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ott release in february first week saale aashiq sanya malhotra mrs on ott bada naam karenge dhoom dhaam on netflix oops ab kya hrc