OTT Release in January First Week: नवीन वर्ष सुरू व्हायला अवघे काही तास बाकी आहेत, त्यानंतर २०२५ ची सुरुवा होईल. या नवीन वर्षातही लोकांना मनोरंजनाची कमतरता अजिबात भासणार नाही. कारण जानेवारीच्या पहिल्या आठवड्यातच प्रेक्षकांना एकापेक्षा एक दमदार चित्रपट व वेब सीरिज व डॉक्युमेंटरीज पाहायला मिळणार आहेत. तुम्हीही नवीन वर्षाच्या पहिल्या आठवड्यात ओटीटीवर काय पाहायला मिळणार याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. यामध्ये जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणाऱ्या कलाकृतींची यादी दिली आहे.

डोंट डाय

Don’t Die on OTT: ख्रिस स्मिथची ‘डोंट डाय’ ही डॉक्युमेंटरीदेखील नवीन वर्षात प्रदर्शित होणार आहे. यात लोकांना ब्रायन जॉन्सनच्या आयुष्याबद्दल बऱ्याच गोष्टी पाहायला मिळतील. ही डॉक्युमेंटरी १ जानेवारी रोजी नेटफ्लिक्सवर रिलीज होईल.

Which festival will be celebrated in February
February Festival 2025: फेब्रुवारी महिन्यात कोणते सण कोणत्या दिवशी साजरे केले जाणार? जाणून घ्या गणेश जयंती, महाशिवरात्री अन् एकादशीची तारीख; पाहा संपूर्ण यादी…
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
OTT Release In February first week
या वीकेंडला ओटीटीवर काय पाहायचं? वाचा वेब सीरिज व चित्रपटांची यादी!
All-party meetings in Parliament
अर्थअधिवेशन आजपासून, पहिला टप्पा १३ फेब्रुवारीपर्यंत; अर्थसंकल्पाबाबत उत्सुकता
Controversy About These Movies
Controversy : ‘छावा’च नव्हे ‘या’ चित्रपटांमधल्या दृश्यांवरही जोरदार आक्षेप; वादाचं ग्रहण लागलेले चित्रपट कुठले?
Manohar joshi Sushil Modi Bhulai bhai
मनोहर जोशी ते सुशील मोदी; भाजपा व एनडीएशी संबंधित कोणकोणत्या नेत्यांना मिळाला पद्म पुरस्कार?
Padma Awards 2025 R Ashwin Honoured with Padma Shri Padma Bhushan for PR Sreejesh
Padma Awards 2025: आर अश्विनला पद्मश्री पुरस्कार, पीआर श्रीजेशला पद्मविभूषण जाहीर; पाहा संपूर्ण भारतीय खेळाडूंची यादी
Padma Award 2025
Padma Award 2025 : केंद्र सरकारकडून पद्म पुरस्कारांची घोषणा; महाराष्ट्रातील दिग्गजांचा समावेश

हेही वाचा – सुकन्या मोनेंच्या लेकीची कमाल! परदेशात ‘या’ विषयात मिळवली मास्टर्स डिग्री; जुलियावर होतोय कौतुकाचा वर्षाव

मिसिंग यू

Missing You on Netflix : ‘मिसिंग यू’ ही एक हॉलिवूड टीव्ही मालिका आहे, जी नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी म्हणजेच १ जानेवारी रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. यामध्ये तुम्हाला सस्पेन्सचा पूर्ण डोस मिळणार आहे.

एविसी- आई अॅम टिम

Avicii – I’m Tim on Netflix: ही एक डॉक्युमेंटरी असून ती ३१ डिसेंबर २०२४ रोजी ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. यामध्ये प्रेक्षकांना स्वीडिश DJ Avicii च्या आयुष्याबद्दल माहिती मिळणार आहे. या डॉक्युमेंटरीमध्ये प्रेक्षकांना तिच्या संघर्षाची आणि यशाची कहाणी घरबसल्या पाहता येईल.

हेही वाचा : लग्नाच्या वेळी अभिनेते रमेश भाटकरांकडे होता फक्त १६ रुपये बँक बॅलन्स; मृदुला भाटकर म्हणाल्या, “प्रेम असेल तर…”

ऑल वी इमॅजिन ॲज लाइट

All We Imagine As Light OTT Release : प्रतिष्ठेच्या कान २०२४ चित्रपट सोहळ्यात ‘ग्रां पी’ पुरस्कार जिंकणारा ऑल वी इमॅजिन ॲज लाइट आता प्रेक्षकांना घरबसल्या पाहता येणार आहे. हा चित्रपट ३ जानेवारीपासून डिस्ने+ हॉटस्टारवर प्रसारित होणार आहे. हा चित्रपट मुंबईतील दोन मल्याळी परिचारिकांच्या एकमेकांशी जोडलेल्या आयुष्याची कथा सांगतो. या चित्रपटाचे दिग्दर्शन पायल कपाडियाने केले आहे.

हेही वाचा : “लक्ष्मी हा माझा ड्रीम रोल…”, नव्या मालिकेविषयी काय म्हणाल्या हर्षदा खानविलकर? ‘ती’ इच्छा खरी ठरली…

गुनाह 2

Gunaah Season 2 Release Date: गश्मीर महाजनी (Gashmeer Mahajani), सुरभी ज्योती आणि झैन इबाद खान यांची वेब सीरिज ‘गुनाह’चा पहिला सीझन हिट झाला होता. त्यानंतर आता त्याचा दुसरा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ३ जानेवारीपासून हॉटस्टारवर ‘गुनाह 2’ डिस्ने+हॉटस्टारवर पाहता येईल. जर तुम्ही पहिला सीझन पाहिला आणि आवडला असेल तर तुम्ही दुसरा सीझन ओटीटीवर पाहू शकता.

Story img Loader