नोव्हेंबर महिना OTT चाहत्यांसाठी खास ठरणार आहे, कारण अनेक प्रतीक्षित चित्रपट, जे विविध कारणांमुळे ओटीटीवर प्रदर्शित होऊ शकलेले नाही, ते आता नोव्हेंबर महिन्यात ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. ‘नेटफ्लिक्स’, ‘प्राईम व्हिडीओ’, ‘जिओ सिनेमा’ यांसारख्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर हे चित्रपट चाहत्यांना पाहता येणार आहेत. या महिन्यात ‘थंगालन’, ‘द बकिंगहॅम मर्डर्स’ यांसारखे थ्रिलर चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होणार आहेत.

थंगालन

thangalaan on OTT: चियान विक्रम (chiyaan vikram) याची प्रमुख भूमिका असणारा बहुप्रतीक्षित तमिळ चित्रपट ‘थंगालन’ OTT वर रिलीज होणार होता, मात्र हा चित्रपट नेटफ्लिक्सवर नियोजित तारखेला प्रदर्शित झाला नाही. या चित्रपटाला प्रेक्षकांकडून मिश्र प्रतिसाद मिळाला असला तरी हा चित्रपट ओटीटी माध्यमांवर पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. अद्याप ‘थंगालन’च्या OTT रिलीजबाबत अधिकृत घोषणा झालेली नाही, परंतु हा चित्रपट नोव्हेंबर २०२४ मध्ये नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होण्याची शक्यता आहे.

Underrated Thriller Movies on OTT
‘अंधाधुन’ पाहिलाय? त्यापेक्षाही जबरदस्त ट्विस्ट असलेले ‘हे’ चित्रपट आहेत OTT वर, वाचा यादी
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Phullwanti on OTT
घरबसल्या पाहा प्राजक्ता माळीचा ‘फुलवंती’ सिनेमा; ‘या’ OTT प्लॅटफॉर्मवर आहे उपलब्ध
Psychological Thriller Films On Hotstar
‘दृश्यम’ पाहिलाय? त्याहूनही भयंकर आहेत हॉटस्टारवरील ‘हे’ चित्रपट, पाहा हादरवून सोडणाऱ्या सिनेमांची यादी
yek number OTT release update
तेजस्विनी पंडित निर्मित ‘येक नंबर’ घरबसल्या पाहता येणार, ‘या’ OTT प्लॅटफॉर्मवर होणार प्रदर्शित
Best Movies On Prime Video
दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये घरबसल्या पाहता येतील ‘हे’ चित्रपट; प्राइम व्हिडीओवरील उत्तम सिनेमांची यादी
biggest Flop bollywood Movie of 2024
बॉलीवूड कलाकारांची फौज, तब्बल ३५० कोटींचे बजेट; मात्र चित्रपट ठरला सुपरफ्लॉप, कमावले फक्त…
Indias most expensive film flopped after row over same sex kiss
दोन अभिनेत्रींमधील किसिंग सीनमुळे वाद, दिग्दर्शकाचं करिअर संपलं; तब्बल १० कोटींचे बजेट असलेल्या सिनेमाने कमावलेले फक्त…

हेही वाचा…OTT वर उपलब्ध आहेत ‘हे’ थरारक सस्पेन्स थ्रिलर सिनेमे, चित्रपटांच्या रहस्यमय कथा ठेवतील खिळवून; पाहा यादी

द बकिंगहॅम मर्डर्स

the buckingham murders on OTT: करीना कपूर खानची प्रमुख भूमिका असलेला ‘द बकिंगहॅम मर्डर्स’ हा चित्रपट १३ सप्टेंबर २०२४ रोजी चित्रपटगृहांत प्रदर्शित झाला होता. थिएटर रिलीजनंतर आता या चित्रपटाच्या ओटीटी प्रदर्शनाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. या चित्रपटात करीना कपूर खानने ब्रिटनमधील बकिंगहॅमशायरमध्ये एका लहान मुलाच्या खुनाचा तपास करणाऱ्या भारतीय-ब्रिटीश गुप्तहेराची भूमिका साकारली आहे. हा चित्रपट ८ नोव्हेंबर २०२४ रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.

मनमे

manamey on OTT: ‘मनमे’ या चित्रपटात राज कंदुकुरी, ताणिकेला भरानी, राहुल रामकृष्ण, राहुल रवींद्रन, आयेशा खान, वेंनेला किशोर आणि तुलसी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. टीजी विश्व प्रसाद निर्मित आणि हेशाम अब्दुल वहाब यांनी संगीतबद्ध केलेल्या या चित्रपटाला समीक्षकांकडून मिश्र प्रतिसाद मिळाला होता. या चित्रपटाचे ओटीटीवरील प्रदर्शन सतत लांबले आहे, मात्र आता हा चित्रपट नोव्हेंबर २०२४ मध्ये ओटीटीवर प्रदर्शित होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा…हॉरर चित्रपट पाहायला आवडतात? OTT वरील ‘हे’ भयपट पाहताना फुटेल घाम, भयंकर आहेत कथा

एजंट

agent on OTT : २०२३ चा तेलुगू भाषेतील ‘एजंट’ हा डिटेक्टिव्ह थ्रिलर चित्रपट अद्याप ओटीटीवर प्रदर्शित झालेला नाही. या चित्रपटात मल्याळम सुपरस्टार मम्मुट्टी आणि तेलुगू अभिनेता अखिल अक्किनेनी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. नवोदित अभिनेत्री साक्षी वैद्य आणि बॉलीवूड अभिनेता डिनो मोरिया यांनी या सिनेमातून तेलुगू चित्रपटात पदार्पण केलं आहे. अद्याप एजंटच्या ओटीटी रिलीजच्या तारखेबाबत अधिकृत घोषणा झालेली नाही. हा चित्रपट सोनी लिव्हवर प्रदर्शित होण्याची शक्यता आहे.

Story img Loader