आजच्या धावपळीच्या युगात अनेकांना चित्रपटगृहात जाऊन चित्रपट पाहणे शक्य होत नाही. ओटीटी(OTT) माध्यमांमुळे आता घरबसल्या स्वत:च्या वेळेनुसार असे चित्रपट पाहता येणे, शक्य झाले आहे. याबरोबरच, अनेक ओटीटी प्लॅटफॉर्म्स सध्या उपलब्ध आहेत. ओटीटी प्लॅटफॉर्म्सवर चित्रपटांबरोबरच वेब सीरीजदेखील पाहता येतात. या प्लॅटफॉर्म्सवर दर आठवड्याला विविध वेब सीरीज व चित्रपट प्रदर्शित होत असतात. जाणून घेऊयात आता या आठवड्यात कोणते वेब सीरीज व चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.तसेच कोणत्या दिवशी व कोणत्या प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहेत, हे जाणून घेऊयात.
मुफासा द लायन किंग
मुफासा द लायन किंग हा चित्रपट २६ मार्च २०२५ ला प्रदर्शित होणार आहे. ही गोष्ट एका हरवलेल्या सिंहाच्या छाव्याची आहे. जो एकटा पडलेला असतो. त्याची भेट एका सिंहाशी होते. त्याचे नाव टाका असते. या चित्रपटातील पात्रांना बॉलीवूडचा किंग खान शाहरूख खान त्याची दोन्ही मुले आर्यन खान व अबराम खान यांनी आवाज दिलेला आहे. जिओ हॉटस्टारवर या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. आता या चित्रपटाला ओटीटीवर कसा प्रतिसाद मिळणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
डेलुलू एक्सप्रेस
लोकप्रिय कॉमेडियन झाकिर खान त्याच्या नव्या शोमधून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. हा शो प्राईम व्हिडीओ या प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. २७ मार्चला हा शो प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. झाकिर खान त्याच्या कवितांसाठी तसेच त्याच्या विनोदांसाठी ओळखला जातो. त्याचा चाहतावर्ग मोठा आहे. आता या शोमधून तो काय कमाल करणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. आता ओटीटीवर त्याला कसा प्रतिसाद मिळणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
ओम काली जय काली
ओम काली जय काली ही वेब सीरीज आहे. दसरा या सणावर आधारित तामिळनाडूमधील ही गोष्ट आहे. ही वेब सीरीज जिओ हॉटस्टारवर २८ मार्चला प्रदर्शित होणार आहे.
विदुथलाई भाग २
विदुथलाईची ही गोष्ट एका शाळेतील शिक्षकाची आहे. ज्याला कठीण परिस्थितीचा सामना करावा लागतो. त्याची ती परिस्थिती त्याला अत्याचाराविरूद्ध बंड करण्यास प्रवृत्त करते. या सगळ्यात तो नेता बनतो. या चित्रपटात मोठी स्टारकास्ट आहे. विजय सेतूपती या चित्रपटात प्रमुख भूमिकेत आहे. विजय सेतूपतीबरोबरच भवानी श्रे, मंजू वॉरियर, सूरी आणि सूर्य सेतुपती यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. विदथलाई भाग २ झी ५ वर प्रदर्शित होणार आहे. २८ मार्चला प्रदर्शित होणार आहे.
मिस्टर हाऊसकिपिंग
मिस्टर हाऊसकिपिंग हा तमिळ चित्रपट २५ मार्चला टेंटकोट्टा या प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला आहे.