ओटीटी(OTT) प्लॅटफॉर्म्सवर नियमितपणे दर आठवड्याला वेब सीरिज, चित्रपट प्रदर्शित होत असतात. त्यामुळे अनेक जण चित्रपटगृहांमध्ये जाण्याऐवजी घरात बसूनच ओटीटी प्लॅटफॉर्मवर चित्रपट किंवा वेब सीरिज पाहणे पसंत करतात. मार्च महिन्याच्या सुरुवातीलाही प्रेक्षकांच्या भेटीला अनेक नवीन चित्रपट आणि वेब सीरिज येणार आहेत. त्यामध्ये कोणीही चुकवू नयेत असेही काही चित्रपट आहेत, ज्यामध्ये तमीळ, मल्याळम व हिंदीमधील कॉमेडी, अॅक्शनपासून ते भयपटापर्यंत वेगवेगळे पर्याय तुमच्यापुढे उपलब्ध असणार आहेत. या आठवड्यात नेमके कोणते नवीन चित्रपट आणि वेब सीरिज कोणत्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहेत, त्याबद्दल आपण थोडक्यात जाणून घेणार आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

विदामुयार्ची

विदामुयार्ची हा तमीळ चित्रपट असून, त्यामध्ये एका विवाहित जोडप्याची कथा दाखविण्यात आली आहे. हे जोडपे फिरायला जाते आणि त्यांच्या आयुष्याला एक वेगळेच वळण मिळते. या ट्रिपदरम्यान पत्नी बेपत्ता होते आणि पती तिचा शोध घेऊ लागतो; पण एक अनोळखी व्यक्ती त्यामध्ये अडथळा निर्माण करते. या चित्रपटात अजित कुमार, त्रिशा कृष्णन, अर्जुन सरजा, अर्जुन दास व अरुण विजय यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट नेटफ्लिक्सवर तमीळ, तेलुगू, हिंदी, मल्याळम व कन्नड या भाषांमध्ये उपलब्ध आहे. हा चित्रपट ३ मार्चला नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला आहे.

रेखाचित्रम

रेखाचित्रम हा एक मल्याळम चित्रपट असून, त्यामध्ये एका निलंबित पोलिसाची कथा दाखविण्यात आली आहे. सट्टेबाजी प्रकरणानंतर हा निलंबित पोलीस अधिकारी पुन्हा पोलीस ठाण्यात आपले काम सुरू करतो. या पोलिसाकडे ४० वर्षांपूर्वीचे एका हत्येचे प्रकरण सोपवले जाते, ज्यामध्ये पीडिताचा चेहराच गायब असतो. या चित्रपटात आसिफ अली, अनस्वरा राजन, मामूट्टी, भामा अरुण, जरीन शिहाब यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट सोनी लिव्हवर तमीळ, तेलगू, हिंदी, मल्याळम व कन्नड या भाषांमध्ये उपलब्ध असेल. रेखाचित्रम सोनी लिव्हवर ७ मार्चला प्रदर्शित होणार आहे.

दुपाहिया

दुपाहिया ही एक हिंदी वेब सीरिज आहे. त्यामध्ये एका गावात ते गाव २५ वर्षे गुन्हेगारीमुक्त राहिल्याचा वर्धापनदिन साजरा करण्याची तयारी सुरू आहे. पण, त्या गावात अचानक एक दुचाकी गायब होते आणि सर्व जण ही दुचाकी शोधण्याच्या कामाला लागतात. त्यामध्ये कोमल कुशवाहा, स्पर्श श्रीवास्तव, गजराज राव, रेणुका शहाणे व यशपाल शर्मा यांच्या प्रमुख भूमिका आहेत. ही वेब सीरीज ७ मार्चला प्राइम व्हिडीओवर प्रदर्शित होणार आहे.

नादानियाँ

नादानियाँ हा चित्रपट दिल्लीतील एका समाजसेविकेबद्दल आहे, जी अभ्यासात चांगला असलेल्या एका मध्यमवर्गीय मुलाला कॉलेजमध्ये तिचा बॉयफ्रेंड असल्याचे भासवण्यासाठी कामावर ठेवते. पण, त्यांचे नाते लवकरच वेगळे वळण घेते. या चित्रपटात इब्राहिम अली खान, खुशी कपूर, महिमा चौधरी, सुनील शेट्टी, जुगल हंसराज व दिया मिर्झा यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट ७ मार्चला नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.

द वॉकिंग ऑफ अ नेशन

द वॉकिंग ऑफ अ नेशन ही वेब सीरिज जालियनवाला बाग हत्याकांडाच्या पार्श्वभूमीवर आधारित आहे. हे हत्याकांड १३ एप्रिल १९१९ ला झाले होते. ही वेब सीरिज तुम्ही ७ मार्च रोजी सोनी लिव्ह या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहू शकता. या सीरिजमध्ये साहिल मेहता, मान सिंह करामाती, राज जादोन व तारुक रैना यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

थंडेल ( Thandel)

थंडेल (Thandel) हा तेलुगू चित्रपट असून, त्यामध्ये श्रीकाकुलममधील एका मासेमारी करणाऱ्या व्यक्तीची कथा दाखविण्यात आली आहे. या चित्रपटात नागा चैतन्य, साई पल्लवी, दिव्या पिल्लई, प्रकाश बेलावाडी, किशोर राजू वशिष्ठ व कल्पा लथा यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट ७ फेब्रुवारी २०२५ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला होता. आता ७ मार्चला हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.

दरम्यान, आता ओटीटीवर या वेब सीरीज व चित्रपटांना प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळणार का, हे पाहणे महत्वाचे आहे.