OTT Release This Week: मार्च महिन्याचा तिसरा आठवडा सुरू झाला आहे. या आठवड्यात ओटीटीवर मनोरंजनाचा धमाका होणार आहे. या आठवड्यात अनेक चित्रपट आणि सीरिज डिजिटल प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होण्यासाठी सज्ज आहेत. या आठवड्यात प्रेक्षकांना ॲक्शन, थ्रिलर, कॉमेडी आणि रोमान्ससह अनेक जॉनरच्या कलाकृती पाहायला मिळणार आहेत. या वीकेंडला कोणते चित्रपट आणि वेब सीरिज रिलीज होत आहेत, ते जाणून घेऊयात.

अकादमी अवॉर्ड्स २०२५ मध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार जिंकणारा चित्रपट आता ओटीटीवर घरबसल्या पाहता येणार आहे. त्याचबरोबर इतही काही चित्रपट या आठवड्यात ओटीटीवर रिलीज होत आहेत. या चित्रपटांची यादी पाहुयात.

अनोरा

Anora on OTT : ऑस्कर अवॉर्ड्स 2025 मध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटासह इतर 4 श्रेणींमध्ये पुरस्कार जिंकणारा हा हॉलीवूड चित्रपट आता ओटीटीवर रिलीज झाला आहे. जर तुम्ही हा चित्रपट अजून पाहिला नसेल, तर आता तुम्ही जिओ हॉटस्टारवर पाहू शकता. १७ मार्चला हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे.

खाकी- द बंगाल चॅप्टर

Khakee The Bengal Chapter : ‘खाकी- द बंगाल चॅप्टर’ची मागील काही दिवसांपासून खूप चर्चा आहे. ही सीरिज आता ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे. याआधी ‘खाकी- द बिहार चॅप्टर’ला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. त्यामुळेच आता निर्माते ‘खाकी- द बंगाल चॅप्टर’ ही सीरिज आणत आहेत. ही सीरिज तुम्हाला आज २० मार्चपासून ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर रिलीज होणार आहे.

ऑफिसर ऑन ड्यूटी

Officer On Duty on OTT : जीतू जोसेफ दिग्दर्शित ‘ऑफिसर ऑन ड्यूटी’ हा चित्रपट जेव्हा थिएटरमध्ये प्रदर्शित झाला तेव्हा त्याला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. थिएटरनंतर आता हा सिनेमा डिजिटल प्लॅटफॉर्मवर रिलीजसाठी सज्ज झाला आहे. मल्याळम भाषेत बनलेला हा ॲक्शन आणि सस्पेन्स थ्रिलर चित्रपट नेटफ्लिक्सवर आज २० मार्चपासून पाहता येईल.

कन्नेडा

Kanneda on OTT : ‘कन्नेडा’ ही वेब सीरिज आहे. यात परमीश वर्मासह अनेक स्टार्स आहेत. १९८४ च्या शीख दंगलीनंतर कॅनडाला गेलेल्या आणि गुंड बनलेल्या पंजाबी तरुणाची कथा या सीरिजमध्ये दाखवण्यात आली आहे. ही सीरिज २१ मार्च रोजी जिओ हॉटस्टारवर प्रदर्शित होणार आहे.

Story img Loader