OTT Release This Week: ऑक्टोबरच्या पहिल्या दोन आठवड्यात ओटीटीवर बऱ्याच कलाकृती पाहायला मिळाल्या. श्रद्धा कपूरचा ‘स्त्री २’, अक्षय कुमारचा ‘सरफिरा’, ‘खेल खेल में’ हे चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित झाले. बऱ्याच वेब सीरिजही या दोन आठवड्यात ओटीटीवर आल्या, ज्यांनी प्रेक्षकांचे मनोरंजन केले. आता या आठवड्यात पुन्हा एकदा प्रेक्षकांना क्राईम, थ्रिलर, कॉमेडी असे विविध प्रकरचे चित्रपट आणि वेब सीरिज पाहता येणार आहेत. या आठवड्यात ओटीटीवर प्रदर्शित होणाऱ्या चित्रपट व वेब सीरिजची यादी जाणून घेऊयात.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

रीता सान्याल

या सीरिजमध्ये बॉलीवूड अभिनेत्री अदा शर्मा मुख्य भूमिकेत आहे. ती यात एका वकिलाच्या भूमिकेत दिसणार आहे. ही क्राईम-थ्रिलर सीरिज अमित खानच्या प्रसिद्ध क्राईम कादंबरीवर आधारित आहे. या सीरिजमध्ये अदाबरोबर अंकुर राठी आणि माणिक पपनेजादेखील आहेत. ही सीरिज १४ ऑक्टोबरला हॉटस्टारवर प्रदर्शित झाली.

सुपरहिट सिनेमे, आघाडीच्या अभिनेत्यांशी अफेअर्स अन् शेवटी को-स्टारची तिसरी पत्नी झाली ‘ही’ बॉलीवूड अभिनेत्री

श्रिंकिंग सीझन २

श्रिंकिंग सीरिजचा पहिला सीझन खूप लोकप्रिय झाला होता. त्यानंतर आता निर्मात्यांनी या सीरिजचा दुसरा सीझन आणला आहे. हा १६ सीझन ऑक्टोबरला रिलीज होणार आहे. त्यामुळे पुन्हा एकदा चाहत्यांना त्यात जेसन सेगल आणि हॅरिसन फोर्ड, जिमी लेयर्ड आणि डॉ. पॉल रोड्स पाहायला मिळणार आहेत. तुम्ही ही सीरिज अॅपल टीव्हीवर पाहू शकता.

हेही वाचा – Bigg Bossच्या पहिल्याच एपिसोडला ऐतिहासिक TRP! अभिनेत्याची मोठी घोषणा; म्हणाला, “होस्ट म्हणून शेवटचा सीझन…”

आउटसाइड

अमेरिकन सायकोलॉजिकल हॉरर फिल्म ‘आउटसाइड’ १७ ऑक्टोबर रोजी नेटफ्लिक्सवर प्रसारित होणार आहे, यामध्ये झॉम्बींनी हल्ला केलेल्या कुटुंबाची गोष्ट दाखवण्यात आली आहे.

द लिंकन लॉयर

ही सीरिज एक कोर्टरूम ड्रामावर आधारित आहे. याचे दोन सीझन सुपरहिट झाले आणि आता या सीरिजचा तिसरा सीझन येणार आहे. ही सीरिज १७ ऑक्टोबर रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.

हेही वाचा – “माझे आई-वडील जलसामध्ये राहतात, मी…”, अमिताभ बच्चन-जया बच्चन यांच्याबरोबर राहत नाही अभिषेक बच्चन

1000 बेबीज

नझीमने दिग्दर्शित केलेली ही वेब सीरिज १८ ऑक्टोबर रोजी हॉटस्टारवर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात ज्येष्ठ अभिनेत्री नीना गुप्ता यांनी काम केलं आहे. ही सीरिज प्रेक्षकांना हिंदी, तमिळ, तेलुगू या भाषांमध्ये पाहता येईल.

फॅब्यूलस लाइव्ह्ज वर्सेस बॉलीवूड वाइव्स

‘फॅब्यूलस लाइव्ह्ज वर्सेस बॉलीवूड वाइव्स’ चा तिसरा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा शो तुम्हाला ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर पाहता येईल. यात तुम्हाला बॉलीवूड कलाकारांच्या पत्नींचे आयुष्य कसे असते ते पाहता येईल. या सीरिजमध्ये नीलम कोठारी, रिद्धिमा कपूर, कल्याणी साहा चावला व शालिनी पस्सीसह इतर काही लोकप्रय चेहरे झळकतील. ही सीरिज तुम्हाला १८ ऑक्टोबरला रीलिज होणार आहे.

मराठीतील सर्व ओटीटी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ott release this week reeta sanyal shrinking season 2 outside the lincoln lawyer fabulous lives of bollywood wives hrc