OTT Release this week :ओटीटीवर या आठवड्यात अनेक चित्रपट व सीरिज रिलीज होणार आहेत. या आठवड्यातील रिलीज होणाऱ्या कलाकृतींच्या यादीत ‘हिसाब बराबर’ या चित्रपटाचा समावेश आहे. तसेच मिथिला पालकरचाही एक सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. कोणते चित्रपट व सीरिज रिलीज होणार, त्याची यादी जाणून घेऊयात.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
हिसाब बराबर
Hisaab Barabar on OTT: आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये कौतुक झालेला आर माधवनचा ‘हिसाब बराबर’ हा चित्रपट या आठवड्यात ओटीटीवर प्रदर्शित होत आहे. हा एक डार्क कॉमेडी चित्रपट आहे जो हजारो कोटी रुपयांच्या आर्थिक फसवणूक आणि घोटाळ्यावर आधारित आहे. या चित्रपटात आर माधवन व नील नितीन मुकेश, कीर्ती कुल्हारी, रश्मी देसाई आणि अनिल पांडे यांच्या भूमिका आहेत. हा चित्रपट २४ जानेवारी २०२५ रोजी Zee5 वर प्रसारित होईल.
स्वीट ड्रीम्स
Sweet Dreams on OTT: अमोल पाराशर व मिथिला पालकर एका गोड लव्ह स्टोरीतून प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. ‘स्वीट ड्रीम्स’ ही केनी आणि दिया या दोन अनोळखी व्यक्तींची कथा आहे, जे खऱ्या आयुष्यात कधीही भेटले नाहीत. पण ते स्वप्नात एकमेकांना पाहतात. ही विचित्र घटना त्यांना एकमेकांना शोधण्यास भाग पाडते, जी पुढे एका जादुई प्रेमकथेत बदलते. हा रोमँटिक कॉमेडी चित्रपट २४ जानेवारी रोजी ओटीटी प्लॅटफॉर्म डिस्ने+ हॉटस्टारवर प्रदर्शित होत आहे.
द नाईट एजंट सीझन २
स्पाय-अॅक्शन-थ्रिलर ‘द नाईट एजंट’चा दुसरा सीझन आला आहे. या सस्पेन्स, थ्रिलर सीरिजमध्ये ब्रिटनी स्नो, बर्टो कोलन, लुईस हर्थम आणि टेडी सियर्स यांच्याही भूमिका आहेत. ही सीरिज मॅथ्यू क्विर्क यांच्या याच नावाच्या कादंबरीवर आधारित आहे. ‘द नाईट एजंट सीझन २’ आज २३ जानेवारीपासून ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर पाहता येईल.
हार्लेम सीझन 3
‘हार्लेम’ या वेब सीरिजचा तिसरा सीझन देखील या आठवड्यात ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. हा या सीरिजचा शेवटचा सीझन आहे. ‘हार्लेम सीझन ३’ आज २३ जानेवारी रोजी ओटीटी प्लॅटफॉर्म प्राइम व्हिडिओवर पाहता येईल.
द ट्रॉमा कोड : हिरोज ऑन कॉल
साऊथ कोरियन सीरिज ‘द ट्रॉमा कोड: हीरोज ऑन कॉल’ ही मेडिकल ड्रामा सीरिज २४ जानेवारीपासून नेटफ्लिक्सवर पाहता येईल. यात ऑपरेशन थिएटर व सर्जन्सचे जग दाखवण्यात आले आहे.
Dìdi
यात एका शाळकरी मुलाला एका मुलीवर क्रश असतो, तिच्यासाठी तो स्केटिंग सुरू करतो आणि स्केट कल्चर समजण्याचा प्रयत्न करतो. हा चित्रपट २६ जानेवारीपासून जिओ सिनेमावर पाहता येईल.
शाफ्टेड
‘शाफ्टेड’ हा स्पॅनिश कॉमेडी सीरिज ‘अल्फा मेल्स’चा फ्रेंच रिमेक आहे. ही कथा चार मध्यमवयीन मित्रांभोवती फिरते जे पॅरिसच्या आधुनिक जगात अनेक समस्यांचा सामना करत आहेत. ही सीरिज २४ जानेवारी रोजी ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होईल.
द सँड कॅसल
‘द सँड कॅसल’ हा एक लेबनीज थ्रिलर चित्रपट आहे. ही कथा एका कठीण परिस्थितीत अडकलेल्या कुटुंबाची गोष्ट आहे. या कुटुंबात चार लोक आहेत. नादिन लाबाकी, झियाद बाकरी, झैन अल रफीया आणि रॅमन अल रफीया यांनी या भूमिका केल्या आहेत. ते चौघेही जगापासून दूर एका वेगळ्या बेटावर अडकतात आणि जगण्यासाठी संघर्ष करतात. तिथे त्यांना अनेक भयंकर रहस्यांचा सामना करावा लागतो. हा चित्रपट २४ जानेवारीपासून नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होईल.