थिएटरमध्ये प्रदर्शित झालेले, गाजलेले सिनेमे ओटीटीवर प्रदर्शित होताना दिसतात. ज्यांना चित्रपटगृहात जाऊन चित्रपट पाहणे शक्य होत नाही ते चाहते सिनेमा ओटीटीवर प्रदर्शित होण्याची वाट पाहताना दिसतात. याबरोबरच अनेक नवीन वेब सीरिज, चित्रपट हे थेट ओटीटीवर प्रदर्शित होतात. आता या आठवड्यात कोणकोणते चित्रपट तसेच वेब सीरिज ओटीटी(OTT)वर प्रदर्शित होणार आहेत, हे जाणून घेऊयात.
डब्बा कार्टेल (Dabba Cartel)
गुन्हेगारीवर आधारित डब्बा कार्टेल ही वेब सीरिज २८ फेब्रुवारीला प्रदर्शित होणार आहे. नेटफ्लिक्सवर ही वेब सीरिज प्रदर्शित होणार आहे. पाच मध्यमवर्गीय महिलांची कहाणी यामध्ये पाहायला मिळणार आहे. एक डब्बा व्यवसाय धोकादायक ड्रग्ज सिंडिकेटमध्ये अडकतो व नियंत्रणाबाहेर जातो. या महिला त्यांच्या जवळच्या लोकांचे संरक्षण करण्यासाठी काय करतात, हे यामध्ये पाहायला मिळणार आहे. या वेब सीरिजमध्ये अॅक्शन सीनदेखील पाहायला मिळणार आहेत. हितेश भाटियाने या वेब सीरिजचे दिग्दर्शन केले असून शिबानी अख्तर, विष्णू मेनन यांनी पटकथा लिहिली आहे.
एक बदनाम आश्रम सीझन ३ – भाग २
बॉबी देओलची प्रमुख भूमिका असलेला एक बदनाम आश्रम ही वेब सीरिज २७ फेब्रुवारीला एमएक्स प्लेअरवर प्रदर्शित होणार आहे. बॉबी देओलने यामध्ये नकारात्मक भूमिका साकारली आहे. बाबा निराला असे त्याच्या पात्राचे नाव आहे. याआधीच्या दोन्ही सीझनला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाल्याचे पाहायला मिळाले. यामध्ये बॉबी देओलसह त्रिधा चौधरी, दर्शन कुमार, चंदन रॉय सान्याल हे कलाकार दिसणार आहेत.
लव्ह अंडर कन्स्ट्रक्शन
लव्ह अंडर कन्स्ट्रक्शन हा चित्रपट विनोद नावाच्या व्यक्तीवर आधारलेला आहे. विनोद त्याच्या स्वप्नातील घर बांधण्याचा निर्धार करतो. हे स्वप्न पूर्ण करताना त्याला अनेक आव्हानांचा सामना करावा लागतो, त्यामुळे त्याच्या वैयक्तिक तसेच व्यावसायिक आयुष्यात अनेक समस्या निर्माण होतात. हा चित्रपट जिओ हॉटस्टारवर २८ फेब्रुवारीला प्रदर्शित होणार आहे. विष्णू जी राघव यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.
संक्रांतिकी वास्तुनम (Sankranthiki Vasthunam)
अॅक्शन, सस्पेन्स, थ्रीलर यांचे मिश्रण असलेली संक्रांतिकी वास्तुनम ही वेब सीरिज झी ५ वर प्रदर्शित होणार आहे. एका हाय-प्रोफाइल अपहरणावर आधारित ही वेब सीरिज आहे. ही वेब सीरिज १ मार्चला प्रदर्शित होणार आहे. वेंकटेश दग्गुबाती, ऐश्वर्या राजेश, मीनाक्षी चौधरी, साई कुमार यांच्याबरोबरच मराठमोळा अभिनेता उपेंद्र लिमये यामध्ये दिसणार आहे.
सुझल : द व्होर्टेक्स सीझन २ (Suzhal: The Vortex Season 2)
तामिळनाडूतील एका लहानशा गावाला हादरवून टाकणाऱ्या एका भयानक हत्येचे रहस्य उलगडणारा ‘सुझल : द व्होर्टेक्स’चा दुसरा सीझन आहे. ही वेब सीरिज प्राइम व्हिडीओवर २८ फेब्रुवारीला प्रदर्शित होणार आहे.
जिद्दी गर्ल्स (Ziddi Girls)
जिद्दी गर्ल्स ही वेब सीरिज प्राइम व्हिडीओवर प्रदर्शित होणार आहे. समाजाच्या नियमांना आव्हान देणाऱ्या मुलींची गोष्ट यामध्ये पाहायला मिळणार आहे. २७ फेब्रुवारीला प्राइम व्हिडीओवर ही वेब सीरिज प्रदर्शित होणार आहे. नंदिता दास, रेवती, लिलेट दुबे, दिया दामिनी हे व इतर कलाकार या बेव सीरिजमध्ये प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत.