अलीकडच्या धकाधकीच्या जीवनात प्रेक्षक चित्रपटगृहांमध्ये जाण्यापेक्षा घरबसल्या ओटीटीवर सिनेमे किंवा वेबसीरिज पाहणं पसंत करतात. गेल्या काही वर्षांत ओटीटीची लोकप्रियता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. लागोपाठ सुट्ट्या आल्या की, एकतर बाहेर जायचं किंवा नेटफ्लिक्स अँड चिल हे समीकरण आजच्या तरुणाईचं ठरलेलं असतं. त्यामुळे मे महिन्याच्या या पहिल्या आठवड्यात प्रेक्षकांना घरबसल्या नेमक्या कोणत्या दहा सीरिज पाहता येतील जाणून घेऊयात…
शुक्रवार ३ मे २०२४ पासून नेटफ्लिक्स, प्राइम व्हिडिओ, डिस्ने+ हॉटस्टार, जिओसिनेमा, ZEE5 बरेच नवीन चित्रपट व वेबसीरिज लॉन्च करण्यात आल्या आहेत. यातील दहा निवडक कलाकृतींची यादी जाणून घेऊयात. यात अजय देवगणचा थरारक ‘शैतान’ चित्रपट पहिल्या स्थानावर आहे.
हेही वाचा : हृदयविकाराचा झटका कशामुळे आला? श्रेयस तळपदे म्हणाला, “करोनाची लस घेतल्यावर…”
१. शैतान
बॉक्स ऑफिसवर चांगलं कलेक्शन केल्यावर आता बहुचर्चित ‘शैतान’ चित्रपट ओटीटीवर दाखल झाला आहे. हा चित्रपट प्रेक्षकांना नेटफ्लिक्सवर पाहता येणार आहे. यामध्ये अजय देवगण, आर माधवन, ज्योतिका, जानकी बोडीवाला यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
२. ब्लॅक माफिया फॅमिली सीझन ३
ब्लॅक माफिया फॅमिली सीझनचा तिसरा भाग भारतात ‘लायन्सगेट प्ले’वर पाहता येणार आहे. ही कथा सत्य घटनेवर आधारित आहे. ड्रग्जचा व्यवसाय करणाऱ्या कुटुंबावर आधारित या सीरिजचं कथानक आहे.
हेही वाचा : ‘नवरी मिळे हिटलरला’ फेम अभिनेत्याच्या घरी चिमुकलीचं आगमन, पहिली झलक शेअर करत म्हणाला, “इतकं भारावून जाणं…”
३. क्लार्कसन फार्म सीझन ३
प्रसिद्ध इंग्रजी टेलिव्हिजन प्रस्तुतकर्ता आणि पत्रकार जेरेमी क्लार्कसन प्रेक्षकांसाठी एक नवीन माहितीपट घेऊन आले आहेत. ही सीरिज अमेझॉन प्राइमवर पाहता येणार आहे.
४. द ब्रोकन न्यूज २
‘द ब्रोकन न्यूज २’ ही सीरिज ब्रिटीश मालिका ‘प्रेस’चा रिमेक आहे. या न्यूजरुम ड्रामाच्या नव्या सीझनमध्ये प्रेक्षकांना जयदीप अहलावत, सोनाली बेंद्रे आणि श्रिया पिळगावकर यांसारखे कलाकार पाहायला मिळणार आहे. ही सीरिज नेटकऱ्यांना Zee 5 वर पाहता येईल.
५. Wonka ( वोंका )
टिमोथी चालमेटचा बहुचर्चिक वोंका चित्रपट ओटीटीवर रिलीज झाला आहे. हा चित्रपट प्रेक्षक जिओ सिनेमावर पाहू शकतात.
६. हीरामंडी – द डायमंड बाजार
संजय लीला भन्साळी दिग्दर्शित हीरामंडी सीरिज नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाली आहे. यामध्ये सोनाक्षी सिन्हा, मनीषा कोईराला, अदिती राव हैदरी, शेखर सुमन, फरदीन खान यांसारखे अनेक कलाकार आहेत.
७. हॅक्स सीझन ३
हॅक्स ही इंग्रजी कॉमेडी सीरिज प्रेक्षकांना जिओ सिनेमावर पाहता येणार आहे. यामध्ये जीन स्मार्ट, हाना आयनबाइंडर आणि कार्ल क्लेमन्स हॉपकिन्स यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
८. द ग्रेट इंडियन कपिल शो
द ग्रेट इंडियन कपिल शोचा सहावा भाग ४ मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. यावेळी या भागात देओल ब्रदर्स अर्थात बॉबी आणि सनी देओल यांनी उपस्थिती लावली होती. या भाग प्रेक्षकांना नेटफ्लिक्सवर पाहता येईल.
९. मॉन्स्टर्स एट वर्क
मॉन्स्टर्स एट वर्क ही कॉमेडी मालिका नेटकऱ्यांना डिस्ने प्लस हॉटस्टारवर पाहता येणार आहे.
१०. अनदेखी सीझन ३
अनदेखी या लोकप्रिय मालिकेचा तिसरा सीझन हिंदी व्यतिरिक्त तामिळ, तेलुगू, मल्याळम, कन्नड, बंगाली आणि मराठी भाषेत सोनी लिव्हवर प्रदर्शित होणार आहे. यामध्ये हर्ष छाया, नंदिश संधू, आंचल सिंग, दिव्येंदू भट्टाचार्य, सूर्या शर्मा, अंकुर राठी, अपेक्षा पोरवाल यांच्या प्रमुख भूमिका आहेत.