प्रसिद्ध कोरियन थ्रिलर वेब सीरिज ‘स्क्विड गेम’च्या पहिल्या सीझनला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला होता. लवकरच या सीरिजचा आता त्याचा दुसरा सिझन ओटीटी प्लॅटफॉर्मवर येणार आहे, फॅन्स त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. मात्र, दुसऱ्या सिझनच्या रिलीजला अजून काही काळ आहे. ‘स्क्विड गेम २’ला टक्कर देऊ शकतील अशा थ्रिलर वेबसीरिज नेटफ्लिक्सवर सहज उपलब्ध आहे. आज आम्ही तुम्हाला पाच थ्रिलर आणि सस्पेन्स असणाऱ्या वेबसीरिजची माहिती देणार आहोत, ‘स्क्विड गेम २’ येईपर्यंत तुम्ही या वेबसीरिजचा आस्वाद घेऊ शकता.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

द ग्लोरी

The Glory On Netflix : २०२२ मध्ये रिलीज झालेली ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. नेटफ्लिक्सवर उपलब्ध असलेली ही सीरिज विद्यार्थी जीवनावर आधारित आहे. यात एक सूडकथा असून ही थ्रिलर ड्रामाची कथा आहे. यात सॉन्ग हये-क्यो, लिम जी-योन यांसारख्या कलाकारांनी भूमिका साकारल्या आहेत. ‘स्क्विड गेम २’ येण्याआधी ही सीरिज एकदा नक्कीच पाहण्याजोगी आहे.

हेही वाचा…थिएटरमध्ये गाजलेले ‘हे’ सिनेमे OTT वर होणार प्रदर्शित, काही याच वीकेंडला पाहता येणार, वाचा यादी

माय नेम

My Name On Netflix : ‘माय नेम’ ही एक अॅक्शन-थ्रिलर सिरीज आहे, याचा पहिला सिझन २०२१ मध्ये प्रदर्शित झाला होता. यामध्ये हान सो-ही, आह्न बो-ह्यून आणि चांग रयूल यांसारख्या कलाकारांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. या सीरिजमध्ये एक महिला आपल्या वडिलांच्या हत्येचा सूड घेण्यासाठी गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या बॉसच्या मार्गदर्शनाखाली पोलिस दलात सामील होते. नेटफ्लिक्सवर उपलब्ध असलेली ही सीरिज थ्रिलरप्रेमींना नक्कीच आवडेल.

द नाईट एजंट

The Night Agent On Netflix : ‘द नाईट एजंट’मध्ये एक एफबीआय एजंट एका इमर्जन्सी कॉलला प्रतिसाद देताना व्हाईट हाऊसमध्ये चालणाऱ्या एका घातक षडयंत्रात अडकतो. मैथ्यू क्विर्कच्या कादंबरीवर आधारित या एक्शन-थ्रिलर सिरीजमध्ये गेब्रियल बासो, लुसियान बुकानन आणि हांग चाऊ यांनी भूमिका केल्या आहेत. ही सीरिजही नेटफ्लिक्सवर उपलब्ध आहे आणि थ्रिलर श्रेणीतील उत्कृष्ट सिरीज म्हणून गणली जाते.

हेही वाचा…या आठवड्यात OTT वर पाहा जबरदस्त अ‍ॅक्शन असलेल्या स्पाय सीरिज, खिळवून ठेवणाऱ्या कथेसह मिळेल रोमांचक अनुभव; वाचा यादी

विन्सेन्जो

Vincenzo On Netflix : ‘विन्सेन्जो’ ही कोरियन ड्रामा थ्रिलर सिरीज आहे. यात एका गँगस्टरची गोष्ट आहे. २०२१ मध्ये रिलीज झालेल्या या सीरिजला प्रेक्षकांकडून चांगलीच पसंती मिळाली आहे. ‘स्क्विड गेम २’ येण्यापूर्वी नेटफ्लिक्सवर हिंदीमध्ये उपलब्ध असलेली ही सीरिज नक्कीच पाहता येईल.

हेही वाचा…थिएटरमध्ये रिलीज झाले, पण ओटीटीवर रखडलं प्रदर्शन; अखेर घरबसल्या पाहता येणार ‘हे’ गाजलेले चित्रपट

फूल मी वन्स

Fool Me Once On Netflix : ‘फूल मी वन्स’ या सीरिजची कथा माया या माजी सैनिक असलेल्या पात्रावर आधारित आहे, मायाच्या नवऱ्याचा काही काळापूर्वी मृत्यू झाला असतो. तरी तिला ती एका कॅमेऱ्यात आपल्या पतीला पाहते, यानंतर तिच्या आयुष्यात ज्या अनपेक्षित घटना घडतात त्या या सीरिजमध्ये दाखवण्यात आल्या आहेत.

मराठीतील सर्व ओटीटी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ott top thriller netflix series the glory my name the night agent vincenzo fool me once psg