जया बच्चन यांची सून ऐश्वर्या राय बच्चन आहे. पण आणखी एक लोकप्रिय अभिनेत्री नात्यात जया बच्चन यांची सून आहे. ही अभिनेत्री नुकतीच ‘पाताल लोक 2’ मध्ये दिसली होती. ही अभिनेत्री ओटीटी क्वीन असून तिच्या दमदार अभिनयासाठी ओळखली जाते. ती अभ्यासासाठी दोन वर्षे तुरुंगातही राहिली होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ही अभिनेत्री नेमकी कोण? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. विविधांगी भूमिका साकारून प्रेक्षकांचं मनोरंजन करणारी तिलोत्तमा शोम ही जया बच्चन यांची सून आहे. तिलोत्तमा ही जया बच्चन यांची बहीण निता भादुरी यांचा मुलगा कुणाल रॉसची पत्नी आहे. जया बच्चन या तिलोत्तमाच्या मावस सासू आहेत. तिलोत्तमा शोमचा पती कुणाल जाहिरात क्षेत्रात काम करतो. तो ‘द इंडियन बीन’चा संस्थापक आहे. त्याचे शालेय शिक्षण मध्य प्रदेशातील इंदूर येथून झाले. त्यानंतर त्याने हॉटेल मॅनेजमेंटचे शिक्षण घेतले आणि व्यवसाय सुरू केला.

तिलोत्तमा शोम (फोटो – इन्स्टाग्राम)

तिलोत्तमा-राहुलच्या लग्नाला गेले होते बच्चन कुटुंबीय

तिलोत्तमा व राहुल या दोघांनी २०१५ मध्ये लग्न केलं. गोव्यात बंगाली रितीरिवाजानुसार हा विवाहसोहळा पार पडला होता. बच्चन कुटुंबानेही या लग्नाला हजेरी लावली होती. अमिताभ बच्चन, जया बच्चन, श्वेता बच्चन, ऐश्वर्या-अभिषेक आणि आराध्यादेखील या लग्नाला उपस्थित होते.

तिलोत्तमाने आत्तापर्यंत तिच्या करिअरमध्ये ‘मेंटलहुड’, ‘दिल्ली क्राइम’, ‘कोटा फॅक्टरी’, ‘द नाईट मॅनेजर’ यांसारख्या अनेक सीरिजमध्ये काम केलं आहे. आपल्या दमदार अभिनयाने तिलोत्तमाने इंडस्ट्रीत स्वतःचं स्थान निर्माण केलं आहे. ती ओटीटी क्वीन आहे. तिलोत्तमा शेवटची ‘पाताल लोक 2’ मध्ये दिसली होती. यामध्ये तिने नागालँडमधील पोलीस अधिकारी मेघना बरुआची भूमिका केली होती.

तिलोत्तमा उच्च शिक्षीत आहे. तिने न्यूयॉर्कमध्ये कैद्यांवर सायकोलॉजीचा अभ्यास केला. तिने न्यूयॉर्क येथील रिकर्स आयलंड जेलमध्ये अभ्यासाठी जवळपास दोन वर्षे घालवली. यावेळी ती हत्येचा आरोप असलेल्या अनेक कैद्यांना भेटली होती. तिलोत्तमानच्या मते ती जेलमध्येच अभिनय शिकली. तिने अभिनयाचा कोणताही कोर्स केलेला नाही. तुरुंगात तिने कैद्यांना जवळून पाहिलं, त्यांच्या भेटी घेतल्या. त्यामुळे मानवी वर्तणूक कळते, असं तिलोत्तमाने एका मुलाखतीत सांगितलं होतं.

मीरा नायरच्या ‘मान्सून वेडिंग’ या चित्रपटातून तिने अभिनयाला सुरुवात केली होती. ‘सर’ मधील तिच्या भूमिकेसाठी तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा फिल्मफेअर क्रिटिक्स अवॉर्डही मिळाला होता. तिने ‘ए डेथ इन द गुंज’, ‘लस्ट स्टोरीज 2’ सारख्या चित्रपटांमध्ये काम केलं आहे.