Paatal Lok Season 2 : प्रसिद्ध वेब सीरिज ‘पाताल लोक’चा दुसरा सीझन येणार आहे. यात जयदीप अहलावत पुन्हा एकदा ‘हाथीराम चौधरी’च्या भूमिकेत दिसणार आहे. या पर्वामध्ये हाथीराम चौधरी समोरील आव्हाने वाढणार आहे. प्राइम व्हिडीओ इंडियाने इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या या छोट्या व्हिडीओ क्लिपमध्ये “द डोअर टू हेल ओपन सून” (नरकाचा दरवाजा लवकरच उघडणार आहे) अशी टॅगलाइन आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
प्रोमोमध्ये हाथीरामला एका रहस्यमय गेटचे रक्षण करताना आणि हल्लेखोरांशी झुंजताना दाखवले आहे. प्रोमोच्या एका शॉटमध्ये त्याच्या मानेवर XV.XII.XCVII म्हणजेच (१५ डिसेंबर १९९७) अशी तारीख लिहिलेली दिसते. यामुळे चाहत्यांमध्ये नवे प्रश्न निर्माण झाले आहेत. ही तारीख पाहून नेटकरी विविध चर्चा करत आहेत. एका युजरने “१५ डिसेंबर १९९७ ला काय झालं होतं?” अशी कमेंट एका चाहत्याने केली आहे. तर आणखी एका युजरने ही “XV.XII.XCVII ही १५ डिसेंबर १९९७ च तारीख आहे ना?” अशी कमेंट केली आहे.
‘पाताल लोक २’चा प्रोमो
प्राइम व्हिडीओने इन्स्टाग्रामवर प्रोमो शेअर करत लिहिले आहे, “हवामान बदलणार आहे. पाताल लोक पुढे आहे.” पुढे याच कॅप्शनमध्ये सावधगिरी बाळगण्याची सूचना दिली जाते.”या पोस्टमुळे ‘पाताल लोक’च्या नवीन सीझनबद्दल प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्साह वाढला आहे. ‘पाताल लोक’चा दुसरा सीझन जानेवारी २०२५ मध्ये रिलीज होण्याची शक्यता आहे.
दुसऱ्या सीझनमध्ये हाथीराम (जयदीप अहलावत) त्याचा विश्वासू सहकारी इम्रान अन्सारी (इश्वाक सिंग)बरोबर पुन्हा एकत्र काम करणार आहे. दुसऱ्या सीझनमध्ये हाथीरामची पत्नी म्हणून गुल पनाग पुन्हा झळकणार आहे. तसेच तिलोत्तमा शोम आणि अनुराग अरोरा यात दिसणार आहेत. अमेझॉन प्राइम व्हिडीओने यापूर्वी सांगितलं होतं की, या सीझनमध्ये काही नवीन कॅरेक्टर्स येणार आहेत. चाहते या शोच्या पुनरागमनाची वाट पाहत आहेत.
हेही वाचा…ना ‘मिर्झापूर’ ना ‘पंचायत’…; जगभरातील लोकांनी Google वर ‘या’ भारतीय वेब सीरिजला सर्वाधिक केलं सर्च
‘पाताल लोक १’ची कथा तरुण तेजपाल यांच्या २०१० मध्ये आलेल्या ‘द स्टोरी ऑफ माय असॅसिन्स’ या कादंबरीवर आधारित आहे. यात जयदीप अहलावत यांनी साकारलेला इन्स्पेक्टर हाथीराम चौधरी एका उच्चस्तरीय खटल्याचा तपास करताना दिसतो, ज्यात एका पत्रकाराच्या अपयशी हत्येच्या कटामध्ये चार संशयित सामील असतात. तपासाच्या दरम्यान हातीराम गुन्हेगारी जगतात गुंतत जातो आणि भयावह सत्य उघड करतो.
हेही वाचा…अनपेक्षित कल्पना आणि खिळवून ठेवण्याऱ्या कथा, OTT वरील घोटाळ्यांवर आधारित ‘हे’ चित्रपट पाहिलेत का?
२०२० मध्ये आलेली ‘पाताल लोक’ ही वेब सीरिज खूप लोकप्रिय ठरली होती. मे २०२० मध्ये अॅमेझॉन प्राइम व्हिडीओवर प्रदर्शित झालेल्या या सीरिजला प्रभावी कथा, पात्रे, ग्रामीण भारतातील वास्तववादी चित्रण आणि बारकाईने मांडलेल्या तपशिलांसाठी प्रेक्षकांकडून प्रशंसा मिळाली होती.