‘पाताल लोक’चा दुसरा सीझन प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित अशा या सीरिजचा दुसरा सीझन पाच वर्षांनी प्रदर्शित झाला आहे. ट्रेलरमध्ये दमदार अभिनयाची झलक दाखवणाऱ्या जयदीप अहलावतची ही सीरिज पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक असून या सीरिजचे रिव्ह्यूज आले आहेत. ‘इंडियन एक्सप्रेस’च्या शुभ्रा गुप्ता यांनी या सीरिजचा रिव्ह्यू लिहिला आहे.
हाथीराम चौधरी या सीरिजमध्ये म्हणतो, “आपण तर पाताल लोकचे कायमचे रहिवासी आहोत,” तेव्हा तो केवळ मालिकेतील पात्राला उद्देशून बोलत नाही, तर आपल्याला पुन्हा त्या अंधारकोठडीच्या दुनियेत खेचतो, आणि आपणही त्यात संपूर्णपणे हरवून जातो.
हेही वाचा…Video: जबरदस्त अॅक्शन आणि थरारक स्टंट; मार्व्हलच्या Daredevil: Born Again चा ट्रेलर प्रदर्शित
२०२० साली प्रदर्शित झालेल्या ‘पाताल लोक’ या वेबमालिकेच्या पहिल्या पर्वाची सुदीप शर्मा यांनी निर्मिती केली होती तर अविनाश अरुण यांनी त्याचे दिग्दर्शन केले होते. हत्या आणि उच्चस्तरीय भ्रष्टाचाराच्या प्रकरणांचा तपास करणारा धाडसी पण आदर्शवादी पोलिस, या पार्श्वभूमीवर सादर केलेली अनोखी कथा आणि प्रभावी पात्रांमुळे या वेबमालिकेने प्रेक्षकांच्या मनात घर केले.
‘पाताल लोक’च्या दुसऱ्या सीझनमध्ये, पहिल्या पर्वाप्रमाणेच पोलिस तपास, यातील पात्र त्यांचे वैशिष्ट्ये, पात्रांपुढे असणारी आवाहने या गोष्टी पूर्वीप्रमाणेच असून यावेळी कथेनुसार या सगळ्या गोष्टी अधिक चांगल्या पद्धतीने हाताळल्या आहेत. यामुळे हा सीझन आणखी दमदार झाला आहे.
‘पाताल लोक’च्या दुसऱ्या सीझनचे कथानक पहिल्या सीझनप्रमाणे जुनाट पोलीस ठाण्यात नाही तर नागालँडमधील निसर्गरम्य स्थळांवर घडते. नागालँड राज्याच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या एका व्यापारी परिषदेचा (बिझनेस समिटचा) प्रमुख भाग असलेल्या एका नागा व्यक्तीची(राजकीय नेत्याची) दिल्लीतील नागालँड सदनात निर्घृण हत्या होते. त्याच वेळी, एक संशयास्पद तरुणी त्या इमारतीमधून बाहेर पडताना दिसते. या प्रकरणात अमली पदार्थांचा समावेश आहे. तसेच, नागालँड राज्यातील स्वतःच्या व्यावसायिक हितासाठी कार्यरत असलेल्या आणि आपल्या संभाव्य भागीदारांशी संघर्ष करणाऱ्या श्रीमंत उद्योगपती रेड्डी (नागेश कुकुनूर) याचा देखील यात सहभाग आहे. या भागीदारांमध्ये नागालँडच्या हक्कांसाठी दीर्घकाळ संघर्ष करणाऱ्या उर्वरित गटांचे प्रतिनिधीही सामील आहेत.
‘पाताल लोक २’ मध्ये ईशान्य भारतातील कथानक दाखवण्याचा आव्हानात्मक निर्णय दिग्दर्शकाने घेतला आहे. या शोचे खऱ्या अर्थाने हे यश आहे की, आठ भागांमध्ये शोने नागालँडच्या बाहेरच्या लोकांविरुद्ध नागालँडमधील लोकांचा असणारा संघर्ष विचारपूर्वक मांडण्याची स्पेस दिली आहे. तसेच, या राज्याच्या गुंतागुंतीच्या इतिहासाला आणि तिथल्या अंतर्गत संघर्षांना स्पर्श केला आहे. याशिवाय, नागालँडच्या शेजारील भागांमधील विविधतेचे चित्रण केले आहे, जे नागालँडपेक्षा खूप वेगळे आहेत.
हेही वाचा…‘पाताल लोक २’ प्रदर्शित होण्याआधी अभिनेता जयदीप अहलावतच्या वडिलांचे निधन
पहिल्या सीझनमधील नवखा एसीपी इम्रान अन्सारी (इश्वाक सिंग) आता हाथीराम चौधरीचा वरिष्ठ अधिकारी झाला आहे. हाथीराम मात्र तिथेच आहे, तो आपल्या दुचाकीवरून कामावर जातो आणि घरी त्याची प्रेमळ पत्नी रेनू (गुल पनाग) हिच्या जवळ परततो. गुल पनागच्या पात्राची चांगल्या आयुष्याची असलेली महत्त्वाकांक्षा आणि तिचा पती हाथीरामच्या नोकरीत तिचे न पूर्ण होणारे स्वप्न याची जाणीव असून सुद्धा तिचे तिच्या नवऱ्यावर असणारे प्रेम यात दाखवले आहे. यात निकीता ग्रोव्हरने, सीसीटीव्ही फुटेज ट्रॅक करण्यात कुशल असलेल्या अधिकाऱ्याची भूमिका साकारली आहे.
‘पाताल लोक’च्या नव्या सीझनमध्ये नव्या कथेसह नवीन चेहरे असायला हवेत असे वाटते आणि कथेनुसार असे अनेक चेहरे यात आहेत. कथानकाची सुरुवात करणारा एक व्यसनी व्यक्ती, रेड्डीची पत्नी, एक अंमली पदार्थांच्या जगातील माफिया यासह हाथीराम आणि अन्सारीला त्यांच्या भागात तपास करणे पसंत नसलेले स्थानिक पोलीस, तसेच वृद्ध नागा नेते (जाह्नु बोरुआ), आणि जीवघेण्या सत्तासंघर्षात अडकलेला मृत व्यक्तीचा मुलगा (एल. सी. सेखोसे, प्रसिद्ध रॅपर) हे पात्र आणि त्यांची कास्टिंग कथानकाला ताजेपणा आणि वास्तविकता देतात.
हेही वाचा…Baby John Ott Release : वरूण धवनचा ‘बेबी जॉन’ ओटीटीवर पाहता येणार, कुठे आणि कधी? जाणून घ्या
यातील एकमेव बाब जी अनावश्यक आणि ताणलेली वाटते ती म्हणजे दक्षिण दिल्लीतील व्यसनाधीन नाइटक्लब मालक आणि त्यांचे संशयास्पद साथीदार यांचे भाग (सीन्स) यासह या सीरिजच्या विस्तृत आणि गहन असल्याने कथानकाचे काही भाग पुरेसे विकसित झालेले वाटत नाहीत. उदाहरणार्थ, तिल्लोत्तमा शोमच्या पात्राला अधिक ठळकपणे मांडता आले असते. बरुआ आणि तिच्या सहा वर्षांच्या मुलाचे कथानकातील भाग खूप सुंदर आहेत, आणि त्याविषयी अधिक जाणून घ्यायची इच्छा राहते. मुख्य पात्रांपैकी एक मध्यावर गायब होतो, ज्यामुळे त्याची उणीव जाणवते.
‘पाताल लोक’च्या नव्या सीझनमध्ये दाखवण्यात आलेली राजकीय हत्या, ज्यामुळे त्या ठिकाणाच्या राजकारणाचा खोलात जाऊन तपास होतो, ‘पाताल लोक २’ ही वेबमालिका केवळ गुन्हेगारी घटना मांडत नाही, तर त्याबरोबरच ती सामाजिक आणि राजकीय पैलूही उलगडते. दमदार कथा आणि प्रखर सादरीकरणाने प्रेक्षकांना खिळवून ठेवता येते हे अविनाश अरुण आणि सुदीप शर्मा यांनी पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. वर्षाच्या सुरुवातीला आलेली ही वेब सीरिज २०२५ च्या सर्वोत्तम वेब सीरिज पैकी एक सीरिज ठरू शकते.
हेही वाचा…या आठवड्यात OTT वर रिलीज होणाऱ्या कलाकृतींची यादी, वाचा…
कलाकार आणि रेटिंग
कलाकार : जयदीप अहलावत, इश्वाक सिंग, गुल पनाग, तिलोत्तमा शोम, जानू बरुआ, नगेष कुकुनूर
दिग्दर्शक : अविनाश अरुण
रेटिंग : ४ स्टार