२०२० मध्ये आलेली ‘पाताल लोक’ ही वेब सीरिज खूप लोकप्रिय ठरली होती. आता या वेब सीरिजचा लवकरच दुसरा भाग येणार आहे. मे २०२० मध्ये अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडीओवर प्रदर्शित झालेल्या या सीरिजला प्रभावी कथा, पात्रे, ग्रामीण भारतातील वास्तववादी चित्रण आणि बारकाईने मांडलेल्या तपशिलांसाठी प्रेक्षकांकडून प्रशंसा मिळाली होती.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दुसऱ्या सीझनची घोषणा आणि पोस्टर

‘पाताल लोक’च्या दुसऱ्या सीझनच्या अधिकृत घोषणेमध्ये अभिनेता जयदीप अहलावतचा चेहरा वरून खाली अशा प्रकारे दाखवण्यात आला असून त्याच्या डोळ्याजवळ धारदार चाकू ठेवलेला असून त्यावर रक्ताचे डाग आहेत. या पोस्टरने प्रेक्षकांची उत्सुकता वाढवली आहे. या वेब सीरिजच्या घोषणेच्या पोस्टमध्ये, “हातोड्याचा वापर करून इंटरनेट ब्रेक करणार आहोत, पाताल लोकचा नवा सीझन लवकरच येणार आहे” अशी कॅप्शन दिली आहे.

हेही वाचा…ना शाहरुख ना सलमान…; या भारतीय सेलेब्रिटींना जगभरातील लोकांनी Google वर केलं सर्वाधिक सर्च

चाहत्यांच्या प्रतिक्रिया

‘पाताल लोक’ दुसऱ्या सीझनच्या घोषणेनंतर सोशल मीडियावर चाहत्यांनी प्रतिक्रिया दिल्या. एकाने लिहिले, “हथोडा त्यागी इज बॅक.” दुसऱ्या युजरने लिहिले, “फायनली वेट इज ओव्हर”, तर आणखी एका युजरने लिहिले, “किती वाट पाहायला लावली, आता थेट तारीख सांगा.”

एकाने लिहिले, “अरे भाईसाब, काय बातमी घेऊन आलात!” तर दुसऱ्याने लिहिले, “शेवटी बेस्ट इंडियन सीरिजचा दुसरा सीझन परत येतोय.” दुसऱ्या चाहत्याने लिहिले, “आता मजा येईल, हथोडा त्यागी परत आलाय.”

‘पाताल लोक’च्या दुसऱ्या सीजनच्या घोषणेनंतर सोशल मीडियावर चाहत्यांनी प्रतिक्रिया दिल्या. (Photo Credit – Jaideep Ahlawat Instagram)

हेही वाचा…‘हा’ दाक्षिणात्य सुपरस्टार साकारू शकतो शक्तिमानची भूमिका, मुकेश खन्ना यांनी मांडले मत; म्हणाले, “त्याच्यात ती…”

जयदीप अहलावतचा यशस्वी प्रवास

‘पाताल लोक’च्या पहिल्या सीझनच्या यशामध्ये जयदीप अहलावतची भूमिका महत्त्वाची ठरली होती. ‘पिंकविला’च्या अहवालानुसार, पहिल्या सीझनसाठी त्याला फक्त ४० लाख रुपये मानधन मिळाले होते. मात्र, दुसऱ्या सीझनसाठी त्याचा पगार तब्बल ५० पटींनी वाढवून २० कोटी रुपयांपर्यंत पोहोचला आहे.

दुसऱ्या सीझनची कास्ट आणि कथा

दुसऱ्या सीझनसाठीची कास्ट अजून गुप्त ठेवण्यात आली आहे. पहिल्या सीझनमध्ये जयदीप अहलावत (इन्स्पेक्टर हातीराम चौधरी) आणि इश्वाक सिंग (कॉन्स्टेबल अन्सारी) यांच्या भूमिका होत्या. ‘झीझेस्ट’च्या अहवालानुसार, दुसऱ्या सीझनसाठी जहानू बरुआ, तिलोत्तमा शोम, नागेश कुकुनूर, गुल पनाग आणि अनुराग अरोरा हे कलाकार असणार आहेत.

हेही वाचा…ना शाहरुख ना सलमान…; या भारतीय सेलेब्रिटींना जगभरातील लोकांनी Google वर केलं सर्वाधिक सर्च

‘पाताल लोक’ची कथा तरुण तेजपाल यांच्या २०१० मध्ये आलेल्या ‘द स्टोरी ऑफ माय असॅसिन्स’ या कादंबरीवर आधारित आहे. यात जयदीप अहलावत यांनी साकारलेला इन्स्पेक्टर हातीराम चौधरी एका उच्चस्तरीय खटल्याचा तपास करताना दिसतो, ज्यात एका पत्रकाराच्या अपयशी हत्येच्या कटामध्ये चार संशयित सामील असतात. तपासाच्या दरम्यान हातीराम गुन्हेगारी जगतात गुंतत जातो आणि भयावह सत्य उघड करतो.

मराठीतील सर्व ओटीटी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Paatal lok season 2 announced jaideep ahlawat returns psg