२०२५ या नवीन वर्षाच्या पहिल्याच महिन्यात बहुचर्चित ‘पाताल लोक’ वेब सीरिजचा दुसरा सीझन प्रदर्शित होण्यासाठी सज्ज झाला आहे. या क्राईम थ्रिलर शोमध्ये जयदीप अहलावत, इश्वाक सिंग, तिलोत्तमा शोम आणि गुल पनाग यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. ‘पाताल लोक सीझन २’ चा ट्रेलर आता प्रदर्शित झाला असून त्यात यात एका अपरिचित स्थळी घडलेल्या खून प्रकरणाचा तपास दाखवण्यात आला आहे.

आज, ६ जानेवारी २०२५ रोजी, आगामी मालिका ‘पाताल लोक सीझन २’ चा ट्रेलर निर्मात्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लॉन्च केला. २ मिनिटे आणि ४२ सेकंदांच्या या ट्रेलरमध्ये जयदीप अहलावत पोलिस अधिकारी हाथीराम चौधरी काही गुंडाबरोबर मारामारी करताना दिसतोय.

black warrant the sabarmati report on OTT
या आठवड्यात OTT वर रिलीज होणाऱ्या कलाकृतींची यादी, वाचा…
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
actor gurmeet choudhary diet plan
दीड वर्षापासून भात, पोळी, साखर काहीच खाल्लं नाही; बॉलीवूड अभिनेत्याचा खुलासा, म्हणाला…
IND vs NZ Harbhajan Singh Statement
IND vs NZ : ‘भारतासाठी ‘ती’ गोष्ट शत्रू ठरतेय…’, मायदेशात पहिल्यांदाच कसोटीत व्हाइट वॉश झाल्यानंतर हरभजन सिंगचे मोठे वक्तव्य
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट नावच सांगितलं; म्हणाले…
Donald Trump Won US Presidential Election 2024
Donald Trump Won US Election 2024: जागतिक महासत्तेच्या चाव्या पुन्हा डोनाल्ड ट्रम्प यांच्या ताब्यात; अमेरिकेत मोठ्या विजयासह सत्तारूढ होणार!
iim bangalore student death
२९ वा वाढदिवस साजरा केला आणि विद्यार्थ्याचा काही तासातच झाला मृत्यू; IIM बंगळुरुमधील धक्कादायक घटना
delegation met the Governor on Monday
मुंडेंना अजितदादांचे अभय; पुरावा मिळेपर्यंत कारवाई न करण्याची भूमिका

हेही वाचा…दीड वर्षापासून भात, पोळी, साखर काहीच खाल्लं नाही; बॉलीवूड अभिनेत्याचा खुलासा, म्हणाला…

ट्रेलर थोडा पुढे गेल्यावर दिल्ली पोलीस एका खुनाच्या प्रकरणाचा तपास करीत नागालँडमध्ये पोहोचतात असे दाखवले आहे. गेल्या सीझनमध्ये जयदीप अहलावतच्या हाथीराम चौधरी या पात्राबरोबर असणारे इश्वाक सिंगचे अन्सारी हे पात्र आता या सीझनमध्ये हाथीराम चौधरीचे सिनिअर पोलीस असल्याचे दाखवले आहे.

जयदीप अहलावतचे हाथीराम चौधरी हे पात्र नागालँडमध्ये खुनातील प्रकरणाचा शोध घेण्यासाठी जाते असे ट्रेलरमध्ये दाखवले आहे, नागालँडमध्ये हाथीराम चौधरीसाठी असणारी नवी जागा, तिथे गेल्यावर अनेक गूढांचा शोध याचे त्याला साजेस बॅकग्राउंड म्युझिक (पार्श्वसंगीत) मुळे ट्रेलरमधील थ्रिल जाणवतो. ट्रेलरमध्ये तीन मृत देहांवर रोमन अंकात एकसारखाच टॅटू असल्याचे दाखवण्यात आले असून ती एक तारीख आहे, ती गूढ तारीख काय आहे आणि हाथीराम चौधरी ती तारीख कशी शोधून काढतो? याचे उत्तर १७ जानेवारीला २०२५ ला प्राईम व्हिडीओवर ‘पाताल लोक २’ प्रदर्शित झाल्यावर मिळणार आहे.

हेही वाचा…वीकेंडला पाहता येतील गुगलवर सर्वाधिक सर्च झालेले ‘हे’ १० चित्रपट, ओटीटीवर आहेत उपलब्ध

ट्रेलर जस जस शेवटाकडे जातो तेव्हा हाथीराम चौधरीचे वरिष्ठ अधिकारी त्याला “हम गली क्रिकेट के लौंढे है यहा तो वर्ल्डकप चल राहा है” असा डायलॉग म्हणून पाताल लोकच्या पहिल्या सिझनपेक्षा हा सीझन अधिक रोमांचक आणि थरारक असणार आहे हे दर्शवतो. ट्रेलर संपताना शेवटी हाथिराम चौधरीला एक व्यक्ती “सर पाताल लोकमे इतना मत घुसिये के मेरे तरह निकल ना पाओ” असे म्हणतो, तेव्हा हाथिराम चौधरी त्याला “टेन्शन मत ले मे पाताल लोक का पर्मनन्ट निवासी हू” असा डायलॉग मारतो. यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता ताणली गेली आहे.

हेही वाचा…जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात OTT वर काय पाहायचं? वाचा दमदार कलाकृतींची यादी!

क्लीन स्लेट फिल्म्झ आणि यूनोया फिल्म्सच्या सहकार्याने निर्मित, ही मालिका सुदीप शर्मा यांनी तयार केली असून तेच एक्झिक्युटिव्ह प्रोड्यूसर आहेत. आठ एपिसोड्सची ‘पाताळ लोक सिझन २’ मालिका अविनाश अरुण धवरे यांनी दिग्दर्शित केली आहे आणि ती १७ जानेवारी २०२५ पासून Amazon Prime Video वर स्ट्रीम होणार आहे.

Story img Loader